Home /News /lifestyle /

इतका गोंगाट असूनही प्रवासात बसल्या बसल्या कशी लागते शांत गाढ झोप, माहिती आहे का?

इतका गोंगाट असूनही प्रवासात बसल्या बसल्या कशी लागते शांत गाढ झोप, माहिती आहे का?

एरवी झोपताना थोडा जरी आवाज झाला तरी अनेकांना त्रास होतो, पण प्रवासात मात्र ते शांत झोपतात.

मुंबई, 30 सप्टेंबर : कामानिमित्त, पर्यटनासाठी किंवा अन्य काही कारणांनी आपण प्रवास (Travel) करत असतो. आपण प्रवासाकरिता अंतरानुसार वाहनाची निवड करतो. आपला प्रवास कार, रेल्वे किंवा बसने होतो. प्रवास करताना (Travelling) अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतो. याच प्रवासात तुम्हाला एक गोष्ट जाणवली आहे का? की एरवी झोपताना बिलकुल आवाज सहन होत नसताना (Sleeping in travelling), शांततेत झोप हवी असताना प्रवासात मात्र अगदी गोंगाटातही बसल्या बसल्या झोप लागते (Sleeping during travelling). लांब अंतराचा प्रवास असेल तर आपल्याला कोणतीही गादी, उशी सोबत नसतानाही, तसंच आसापास गाड्यांचे, माणसांचे प्रचंड आवाज येत असतानाही बसल्याबसल्या नकळत झोप (Sleep) लागते. गाड्यांचे आवाज, माणसांचे आवाज येत असतानाही अशी नकळत पण शांत झोप कशी लागू शकते, असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात आलाच असेल. हे वाचा - गरम की थंड, अंघोळीसाठी कोणतं पाणी आहे योग्य? संशोधकांनी सांगितलं याचं हे उत्तर कार किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना झोप लागण्याची अनेक कारणं सांगितली जातात. जेव्हा तुम्ही प्रवास करत असता, तेव्हा तुमचं मन शांत असतं आणि त्यामुळे तुम्हाला नकळत झोप लागते, असं काही जणांचं म्हणणं आहे. प्रवासादरम्यान चेहऱ्यावर वारा लागतो, त्यामुळे माणसाला नकळत पण चांगली झोप लागते, असं काही लोक सांगतात. परंतु, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर यामागे रॉकिंग सेन्सेशन हे एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं. प्रवासात जेव्हा तुम्ही एकाच प्रवाहात हलकेपणानं हलता तेव्हा त्याला रॉकिंग सेन्सेशन (Rocking Sensation) म्हणतात. यामुळे तुमच्या मेंदूला सिक्रोनायझिंग इफेक्ट ( Synchronizing Effect) जाणवतो आणि तुम्हाला नकळत झोप लागते. याला स्लो रॉकिंग (Slow Rocking) असंही म्हटलं जातं. या स्लो रॉकिंगमुळे मनात झोपण्याची इच्छा निर्माण होते आणि हळूहळू झोप लागते, असं तज्ज्ञ सांगतात. हे वाचा - Cardiac Arrest म्हणजे Heart Attack नव्हे; नेमका काय असतो फरक समजून घ्या एखादं लहान बाळ पाळण्यात झोपलं असेल आणि त्याला जर झोका दिला तर ते पटकन झोपतं. अगदी तसंच प्रवासादरम्यान आपलं शरीर हलक्या प्रमाणात झोका दिल्यासारखं हलत असतं. त्यामुळे प्रवासात नकळतपणे शांत झोप लागते, असं तज्ज्ञ सांगतात. एका संशोधनादरम्यान, काही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या बेड्सवर झोपण्यास सांगण्यात आलं. त्यात झोक्यासारख्या झुलणाऱ्या बेडवरच्या लोकांना पटकन झोप लागल्याचं स्पष्ट झालं.
First published:

Tags: Lifestyle, Sleep, Travelling

पुढील बातम्या