मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रयत्न करूनही या महिलेच्या कपाळवरच्या सुरकुत्या जाता जाईनात! ट्रोलिंगचा करावा लागतोय सामना

प्रयत्न करूनही या महिलेच्या कपाळवरच्या सुरकुत्या जाता जाईनात! ट्रोलिंगचा करावा लागतोय सामना

 या महिलेला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं होतं

या महिलेला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं होतं

चा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी तिला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.

  मुंबई, 30 डिसेंबर: कपाळावर पडलेल्या नाराजीच्या आठ्या किंवा त्वचेला पडलेल्या सुरकुत्या (Wrinkle on Face) कुणालाच खास करून महिलांना आवडत नाहीत. कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पाहायला गेलं तर तणावामुळे आणि वाढत्या वयासोबत कपाळावर सुरकुत्या (Wrinkle Lines on Forehead) दिसू लागतात. सुरकुत्या येणं हे वृद्धत्वाचं लक्षण आहे. एका ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणं ही सामान्य बाब आहे. पण काही लोकांच्या चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात. असंच झालं आहे किम होल्टे (Kim Hoeltje) या महिलेसोबत. या महिलेच्या चेहऱ्यावर खूपच कमी वयात सुरकुत्या दिसून आल्या आहेत. भुवया उंच केल्या किंवा नाही केल्या, चेहरा सरळ ठेवला तरी कपळावर सुरकुत्या कायम असतात.

  किम होल्टेचं वय 36 वर्ष असून ती टिकटॉक तसंच इन्स्टाग्रामवरही खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर ती खाण्यापिण्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पण, कपाळावर पडलेल्या सुरकुत्यांमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, किमने नुकताच टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करत कपाळावरील सुरकुत्यांवरून (Woman trolled for Forehead Wrinkles) लोक तिला कसे टोमणे मारतात आणि चिडवतात, हे सांगितले आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी तिला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.

  Cancer उपचारांमध्ये व्हायग्राचा वापर होण्याची शक्यता, जाणून घ्या, अधिक माहिती

  व्हिडिओमध्ये किमने म्हटलं, की कपाळावरील सुरकुत्या घालवण्यासाठी अनेकांनी मला बोटॉक्स घेण्यास आणि चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्यास सांगितले. तसेच बऱ्याच जणांनी मला वयाबद्दल विचारणा केली. तसेच मी माझ्या वयापेक्षा जास्त मोठी दिसते, असेही अनेकांनी म्हटल्याचे किमने सांगितले. याशिवाय, मी इस्त्रीखाली चेहरा ठेवला होता असे वाटत असल्याचेही अनेकांनी म्हटलं. मी या ट्रोलला घाबरत नाही आणि त्यांच्या बोलण्याने मला काहीच फरक पडत नाही, असे किम म्हणाली. काही लोकांनी ट्रोल केले असले तरी बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केला असून माझ्या कामाचं कौतुक केल्याचं किमने सांगितलं.

  एका व्यक्तीने किमचं कौतुक करत तिला सुंदर म्हटलं आहे. तसंच कोणाचं शरीर कसं आसावं किंवा त्यांच्या शरीरावर टिप्पणी करणं चुकीचं आहे, असं एका व्यक्तीने किमला सपोर्ट करत म्हटलं आहे. मी कशाप्रकारे वृद्ध होत चालली आहे, हे लोकांनी पाहिले, तरी मला फरक पडत नाही, असे किम म्हणाली. आपण स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे, असा सल्ला किमने दिला आहे. जर तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर स्वतःला कमी समजू नका. सर्वांत आधी स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका आणि स्वतःला आहे तसं स्वीकारा.

  First published:

  Tags: Lifestyle, Video viral