मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अजब प्रथा, 'या' देशात ख्रिसमसनंतर सेलिब्रेट केला जातो बॉक्सिंग डे

अजब प्रथा, 'या' देशात ख्रिसमसनंतर सेलिब्रेट केला जातो बॉक्सिंग डे

या देशात  ख्रिसमसचा दुसरा दिवस हा बॉक्सिंग डे (Boxing Day) म्हणून साजरा केला जातो.

या देशात ख्रिसमसचा दुसरा दिवस हा बॉक्सिंग डे (Boxing Day) म्हणून साजरा केला जातो.

या देशात ख्रिसमसचा दुसरा दिवस हा बॉक्सिंग डे (Boxing Day) म्हणून साजरा केला जातो.

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 26 डिसेंबर: ख्रिसमसच्या आनंदाची, उत्साहाची खुमारी टिकून रहावी यासाठी युरोपात एक अजब प्रथा पाळली जाते. ती म्हणजे ख्रिसमसचा दुसरा दिवस हा बॉक्सिंग डे (Boxing Day) म्हणून साजरा केला जातो. पण हा बॉक्सिंग डे (Boxing Day) म्हणजे तुम्ही समजता तसा बॉक्सिंग खेळायचा दिवस नाही, तर बॉक्स देण्याच्या प्रथेवरून याला बॉक्सिंग डे असं नाव पडलं आहे. ब्रिटन (Britain) आणि ब्रिटीश कॉमनवेल्थ देशांमध्ये आजही ही प्रथा आवर्जून पाळली जाते. त्यामुळं इथं ख्रिसमसच्या (Khristmas) दुसऱ्या दिवशीही सुट्टी असते. आजकाल हा दिवस सेल डे (Sale Day)म्हणूनही ओळखला जातो. कारण या दिवशी या देशांमध्ये अनेक वस्तू स्वस्त किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. बॉक्सिंग डेचा इतिहास : ‘बॉक्सिंग डे’चा पहिला उल्लेख 1833 मध्ये प्रथम ऑक्सफर्ड डिक्शनरीत (Oxford Dictionary)आढळला. अर्थात याला अधिक प्रसिद्धी मिळाली ती चार वर्षांनतर चार्ल्स डिकन्स (Charles Dickens) यांच्या दी पिकविक पेपर्स (The Picwick Papers) या कादंबरीत याचा उल्लेख आल्यावर. ही प्रथा पडण्यामागे अनेक दंतकथा आहेत. सगळ्यात प्रचलित असलेली कथा अशी आहे की, शेकडो वर्षांपूर्वी मालक आपल्या नोकरांना ख्रिसमस बॉक्स (Christmas Box) देत असत, यात केक, मिठाई, पैसे अशा गोष्टी असत आणि याच दिवशी नोकरांना आपल्या घरी जाण्यासाठी सुट्टी दिली जात असे. या बॉक्सवरून या दिवसाला हे नाव मिळालं. दुसरी एक कथा अशी आहे की, पूर्वी प्रत्येक चर्चमध्ये एक चॅरिटी बॉक्स (Charity Box) असायचा. तो 26 डिसेंबरलाच उघडला जायचा आणि गरीबांना त्यातील पैसे वाटले जायचे. यावरूनही या दिवसाला हे नाव पडलं असं मानलं जातं. हा दिवस ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, हाँगकाँग, केनिया, दक्षिण आफ्रिका, जमैका, थायलंड आणि अमेरिकेतील काही राज्यांमध्ये साजरा केला जातो. हे वाचा-VIDEO - काय म्हणावं या चिमुरड्याला; पालकांवर संतापला, थेट पोलिसांनाच फोन लावला काही देशांमध्ये याला सेकंड ख्रिसमस (Second Christmas) असंही म्हटलं जातं. या दिवशी ख्रिसमसचा उरलेला केक खाणं ही देखील एक परंपरा आहे. हा दिवस आपलं कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासोबत घालवण्याचा दिवस आहे. याच दिवशी ख्रिसमसला मिळालेल्या भेटवस्तू उघडल्या जातात. उरलेलं जेवण संपवलं जातं आणि खरेदीही केली जाते. ब्रिटनमधील लोक तर अजब साहसांमध्येही सहभागी होतात. काही लोक या दिवशी बर्फासारखं थंड पाणी असलेली इंग्लंडची खाडी पार करण्यासाठी यात उडी मारतात. काही लोक धावण्याची शर्यत लावतात. फुटबॉल (Football)आणि सॉकर (Soccer)हे खेळही मोठ्या प्रमाणात खेळले जातात. या दिवशी खरेदीचं प्रस्थ तर आता इतकं वाढलं आहे की हा दिवस आता शॉपिंग डे (Shopping Day) म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी अनेक मोठे ब्रँडस भरपूर सूट जाहीर करतात. त्यामुळं मॉल्स, दुकानांमध्ये लोकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. हे वाचा-Rajinikanth Health Update: रजनीकांत यांची प्रकृती स्थिर, इतक्यात डिस्चार्ज नाहीच अनेकदा या गर्दीमुळं अपघातही झाले आहेत. यामुळं बॉक्सिंग डे साजऱ्या होणाऱ्या देशांमध्ये या दिवसाच्या काही दिवस आधीपासूनच गर्दी करू नये असं आवाहन करणारे संदेश पोस्टर्स, रेडिओ यांच्याव्दारे प्रसारित केले जातात. फार पूर्वी ब्रिटनमध्ये या दिवशी शिकारीला जाण्याचीही प्रथा होती. मात्र 2004 मध्ये शिकार बंदी कायदा आल्यावर ही प्रथा मागे पडली. अर्थात शिकार करायला आवडणारे लोक आता प्रत्यक्ष शिकार करत नाहीत, पण वेगळ्याच पद्धतीनं ही प्रथा पाळतात. जंगलाकडे जाणाऱ्या वाटांवर ते शिकाऱ्याच्या वेशात नटून-सजून फेरी काढतात.
First published:

पुढील बातम्या