Home /News /lifestyle /

मोबाईल-मोबाईल-मोबाईल... दिवसभरात तुमचा इतका वेळ जातोय त्या मोबाईलमध्ये, माहीत तरी आहे का?

मोबाईल-मोबाईल-मोबाईल... दिवसभरात तुमचा इतका वेळ जातोय त्या मोबाईलमध्ये, माहीत तरी आहे का?

People spending 4.8 hours of Day on smart phones : भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या 2021 मध्ये सातत्याने वाढून 448 दशलक्ष झाली आहे, मुख्यत्वे संपूर्ण भारतभर स्मार्टफोनच्या व्यापक वापरामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सुमारे 624 दशलक्ष झाली आहे

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोनाच्या काळात तर जणू आपलं सगळं जगच मोबाईलमय झालंय. बाहेर जाणं कमी झालंय, आमच्या मित्रांना व्हिडिओ कॉलद्वारे किंवा कॉनकॉलद्वारे भेटण्यापासून ते ऑफिस मीटिंगलाही ऑनलाईन उपस्थित राहतोय. कामासाठीही आणि टाईमपाससाठीही फोनच हातात येत असल्याने त्यावर जाणारा वेळ खूप वाढला आहे. आरोग्यतज्ञ वेळोवेळी फोनवर घालवलेल्या वेळेबद्दल गंभीर इशारा देत आहेत. जगभरात लोक किती वेळ मोबाईल वापरतात याबाबत एक धक्कादायक संशोधन अहवाल समोर आला आहे. अॅप अॅनी (App Annie) च्या नुकत्याच जारी झालेल्या स्टेट ऑफ मोबाइल रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 2021 मध्ये जागतिक स्तरावर वापरकर्त्यांनी मोबाइलवर विक्रमी 3.8 लाख कोटी तास घालवले आहेत. अहवालानुसार, लोक दररोज सरासरी 4.8 तास मोबाईल फोनवर घालवत आहेत. हा कालावधी त्यांच्या जागे असण्याच्या तासांच्या एक तृतीयांश इतका (People spending 4.8 hours of Day on smart phones) आहे. 2021 पर्यंत यूकेमध्ये दररोज फोनवर घालवलेला सरासरी वेळ चार तासांचा होता, जो जागतिक सरासरी 4.8 तासांपेक्षा कमी आहे. परंतु, तेथे मोबाइलचा वापर 2019 मधील दिवसाच्या तीन तासांवरून 2020 मध्ये दिवसाच्या 3.7 तासांपर्यंत वाढला आहे. तज्ञ काय म्हणतात अॅप अॅनीच्या (App Annie) अहवालात असे म्हटले आहे की, 2021 हे वर्ष 'रेकॉर्ड ब्रेकिंग' ठरले. टीव्हीसारख्या मोठ्या स्क्रीनपेक्षा मोबाईलचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अॅप अॅनीचे सीईओ टेड क्रँट्झ म्हणाले की, वेळ घालवण्यासाठी मोबाईल वापरणे, माहिती डाउनलोड करणे आणि व्यवसाय-बिझनेस यासह जवळजवळ प्रत्येक श्रेणीमध्ये मोबाईल वापरण्याचे रेकॉर्ड होत आहे. मोठ्या स्क्रीन आता जवळपास हद्दपार होऊ लागतील. हे वाचा - EPFO Account : घरबसल्या UAN मध्ये बँक डिटेल्स अपडेट करा, फॉलो करा सोप्या स्टेप्स भारत चौथ्या क्रमांकावर आहे तुम्हाला माहिती आहे का की, भारतीय लोक सोशल मीडियावर दिवसाचे सरासरी 2.25 तास घालवतात, जे जागतिक सरासरी प्रतिदिन 2.5 तासांपेक्षा किंचित कमी आहे. भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या 2021 मध्ये सातत्याने वाढून 448 दशलक्ष झाली आहे, मुख्यत्वे संपूर्ण भारतभर स्मार्टफोनच्या व्यापक वापरामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सुमारे 624 दशलक्ष झाली आहे, ही संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 45 टक्के इतकी आहे. हे वाचा - आम्ही दोघी एकत्रच राहणार, Live-in ची कागदपत्रेच बनवली; लेस्बियन लग्नाची Inside story अॅप अॅनीच्या डेटानुसार, 2021 मध्ये भारतीयांनी स्मार्टफोनवर दिवसाचे सरासरी 4.7 तास घालवले. 2021 मध्ये मोबाईल फोन वापरण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. ब्राझील आणि इंडोनेशिया 5.4 तासांसह पहिल्या स्थानावर आहेत. 5 तासांसह दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानावर आणि 4.8 तासांसह मेक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीयांनी 2021 मध्ये 2600 कोटी वेळा मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड केले होते, त्यापैकी 100 कोटी फक्त UPI, बँक, स्टॉक, लोन ऍप सारखे आर्थिक अ‌ॅप्लिकेशन होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mobile, Mobile Phone

    पुढील बातम्या