लॉकडाऊनमध्ये झोपायला जास्त वेळ मिळत असूनही झोप पूर्ण का होत नाही?

लॉकडाऊनमध्ये झोपायला जास्त वेळ मिळत असूनही झोप पूर्ण का होत नाही?

तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनमध्ये झोपेची वेळ वाढली आहे मात्र झोपेची गुणवत्ता खराब झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून : कोरोनाव्हायरसमुळे आपल्या जीवनशैली बरीच बदलली आहे. कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन घेण्यात आला. त्यानंतर अनेक जण घरातून ऑफिसचं काम करू लागले. प्रवासाचा वेळ वाचू लागला आणि विशेष म्हणजे ऑफिसला जात असताना जी झोप (sleep) आपली अपूर्ण राहायची ती झोप आता पुरेशी घेण्यासाठी वेळ मिळू लागला. अनेक जण या दिवसांत जास्त वेळ झोपू लागलेत, मात्र तरीदेखील त्यांची झोप पूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटत नाही, असं का?

झोपेची वेळ जरी वाढली असली तरी झोपेची गुणवत्ता सुधारलेली नाही, असं एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

स्वित्झर्लंडच्या बासेल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात दिसून आलं की लोकांनी आपल्या झोपेची वेळ वाढवली मात्र ती त्यांच्यासाठी हानीकारक ठरत आहे, कारण यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.

हे वाचा - WORK FROM HOME करताना तहान लागेना? अशी भरून काढा शरीरातील पाण्याची कमतरता

23 मार्च ते 26 एप्रिल असे सहा आठवडे ऑनलाइन सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनीतील  435 लोकांचा या सर्वेक्षणात समावेश होता.  लॉकडाऊनमध्ये ते जास्त वेळ झोपत होते. मात्र त्यानंतर त्यांची झोपेची गुणवत्ता बिघडल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्व्हेक्षणाचे प्रमुख अभ्यासक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. क्रिस्टीन ब्लू म्हणाले, "लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात अनेक तणाव निर्माण झालेत. त्यांना आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि मुलांची देखभाल यापासून ते भविष्याची चिंता लागून राहिली आहे आणि त्याचा परिमाण झोपेवर होतो आहे"

हे वाचा - अनलॉकनंतर ऑफिसला जायची हिंमत होईना; स्वत:ला पुन्हा कसं तयार कराल?

तज्ज्ञांच्या मते, व्यायाम किंवा शारीरिक हालचालच झोपेची गुणवत्ता सुधारण्याचा मार्ग आहे. यामुळे थकवा येईल, तसंच मेंदूत एंडोर्फिन्सची निर्मितीही होईल, जे सकारात्मक भावना वाढवण्यास मदत करतं. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन? महाराष्ट्रातील सिरो सर्व्हेचा रिपोर्ट जाहीर

First published: June 15, 2020, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading