मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आता Cataract झाल्यास ऑपरेशनची गरज नाही; नवा उपाय सापडला

आता Cataract झाल्यास ऑपरेशनची गरज नाही; नवा उपाय सापडला

मोतीबिंदू झाल्यावर ऑपरेशन करावं लागतं आणि अनेकांना ऑपरेशनची भीती वाटते.

मोतीबिंदू झाल्यावर ऑपरेशन करावं लागतं आणि अनेकांना ऑपरेशनची भीती वाटते.

मोतीबिंदू झाल्यावर ऑपरेशन करावं लागतं आणि अनेकांना ऑपरेशनची भीती वाटते.

  मुंबई, 22 नोव्हेंबर : उतारवयातल्या बहुतांश नागरिकांना जाणवणारी एक समस्या म्हणजे मोतिबिंदू (Cataracts). यामुळे दृष्टी कमकुवत होऊन हळूहळू दिसणं बंद होतं. मोतिबिंदूवर वेळेत इलाज (Cataracts treatment) झाला नाही, तर दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असते. कित्येक वेळा नागरिक ऑपरेशनच्या (Cataracts operation) भीतीने यावर इलाज करण्यास नकार देतात; मात्र संशोधकांनी आता अशा गोष्टीचा शोध लावला आहे, ज्यामुळे मोतिबिंदूच्या प्रत्येक रुग्णाला (Cataracts patient) शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही (Cataracts treatment without surgery).

  नेक्युटी फार्मास्युटिकल्स (Necuti Pharmaceuticals) या अमेरिकेतल्या फार्मा कंपनीने एका इम्प्लांटचा (Implant for Cataract) शोध लावला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, याचं नाव एनपीआय-002 (NPI-002) असं आहे. बंदुकीच्या छर्र्‍याप्रमाणे (Pellet to reverse traces of Cataracts) दिसणारं हे इम्प्लांट डोळ्यातला मोतिबिंदू वाढू देत नाही. यामुळेच ऑपरेशनची गरज बरीच कमी होते, असा दावा या कंपनीने केला आहे. लवकरच याची मानवी चाचणी (NPI-002 Human trial) सुरू करण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं.

  हे वाचा - बटाटा खाल्ल्याने खरंच आपण लठ्ठ होतो का?

  वयाची पन्नाशी पार केल्यानंतर शरीरातल्या अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण कमी होऊ लागतं. यासोबतच डोळ्यांमध्ये कॅल्शियम (Calcium in eyes) जमा होऊ लागतं. यामुळे डोळ्यांची जी नैसर्गिक लेन्स (Natural lens in eyes) असते ती खराब होऊ लागते. डोळ्यांमध्ये मोत्याप्रमाणे पांढरा असा ठिपका दिसू लागतो. यामुळे मोतिबिंदू झालेल्या व्यक्तीला सर्व धूसर दिसू लागतं आणि काही दिवसांनी ऑपरेशनची गरज भासते. ऑपरेशनची जोखीम कमी करण्यासाठी आपलं प्रॉडक्ट अगदीच फायदेशीर ठरणार असल्याचं या कंपनीनं म्हटलं आहे.

  एनपीआय-002 हे इम्प्लांट डोळ्यात थेट इंजेक्ट (Pellet injected in eye) केलं जातं. ते थोड्या-थोड्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स सोडत राहतं. अशा प्रकारे ते डोळ्यांतला कॅल्शियमचा स्तर वाढण्यापासून थांबवतं. त्यामुळे बऱ्याच जणांना शस्त्रक्रियेची गरजच भासत नाही किंवा काहींना शस्त्रक्रियेवेळी कमी जोखीम पत्करावी लागते, असा दावा कंपनीने केला आहे. याच्या मानवी चाचणीसाठी 65 वर्षांहून अधिक वयाच्या 30 व्यक्तींना सहभागी केले जाईल, असं कंपनीने स्पष्ट केलं.

  हे वाचा - टाइप 2 मधुमेह असलेल्यांसाठी खास डाएट प्लॅन, 15 किलोपर्यंत कमी होईल वजन

  मोतिबिंदूचा विचार करायचा झाल्यास, जगभरात यामुळे सुमारे दोन कोटी व्यक्तींची दृष्टी (Cataracts patients in world) गेली आहे. यामध्ये ५ टक्के अमेरिकी, 60 टक्के दक्षिण आफ्रिकेतल्या आणि दक्षिण अमेरिकेतल्या व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेत मोतिबिंदूंच्या रुग्णांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे. तसंच एकूण रुग्णांपैकी 68 टक्के रुग्ण 80 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. भारताबाबत बोलायचं झाल्यास, देशातल्या 1.2 कोटी दृष्टिहीन नागरिकांपैकी 66.2 टक्के व्यक्तींची दृष्टी जाण्याचं कारण मोतिबिंदू (Cataracts in India) आहे. दर वर्षी देशात मोतिबिंदूच्या 20 लाख नव्या रुग्णांची नोंद होते.

  या इम्प्लांटची मानवी चाचणी यशस्वी झाल्यास हा एक मोठा शोध ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जगभरातल्या मोतिबिंदूच्या रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास या कंपनीचं म्हणणं योग्य असल्याचं लक्षात येते. त्यामुळे या इम्प्लांटच्या चाचणीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Eyes damage, Health, Lifestyle, Surgery