मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /देवी सरस्वतीची मूर्ती दिसताच प्रदक्षिणा घालू लागले मोर; पाहतच राहावा असा VIDEO VIRAL

देवी सरस्वतीची मूर्ती दिसताच प्रदक्षिणा घालू लागले मोर; पाहतच राहावा असा VIDEO VIRAL

देवी सरस्वतीभोवती (goddess saraswati) प्रदक्षिणा घालणाऱ्या या मोरांच्या (peacocks) व्हिडीओनं अनेकांची मनं जिंकली आहेत.

देवी सरस्वतीभोवती (goddess saraswati) प्रदक्षिणा घालणाऱ्या या मोरांच्या (peacocks) व्हिडीओनं अनेकांची मनं जिंकली आहेत.

देवी सरस्वतीभोवती (goddess saraswati) प्रदक्षिणा घालणाऱ्या या मोरांच्या (peacocks) व्हिडीओनं अनेकांची मनं जिंकली आहेत.

मुंबई, 06 जानेवारी :  शंकरदेवाच्या पिंडीभोवती नाग डुलताना, हनुमानाच्या मूर्तीसमोर माकड नतमस्तक, गणपतीच्या पायाशी उंदीर खेळत असताना अशी काही दृश्यं फिल्ममध्ये किंबहुना क्वचित प्रसंगी प्रत्यक्ष आयुष्यातही पाहिली आहेत. असाच आणखी एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होतो आहे. ज्यामध्ये देवी सरस्वतीभोवती (Mata Saraswati) मोरांनी (Peacock) परिक्रमा घातल्या आहेत.

सरस्वती म्हटलं की हातात वीणा आणि शेजारी मोर अशी प्रतीमा आपल्यासमोर येते. हेच मोर देवी सरस्वतीभोवती प्रदक्षिणा घालताना (Peacock doing Parikrama of goddess Saraswati) दिसले.

@Itishree001 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी देवी सरस्वतीची मूर्ती आहे. आजूबाजूला काही मोरही आहेत. तीन मोर मागोमाग या मूर्तीभोवती फिरत आहेत. जणू काही ते या देवीला प्रदक्षिणाच घालत आहे. व्हिडीओ पाहताच अगदी प्रसन्न वाटतं. या व्हिडीओनं अनेकांची मनं जिंकली आहे. हा व्हिडीओ ट्वीटर, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर शेअर केला जातो आहे.

असं बऱ्याचवेळा घडतं जेव्हा देवदेवतांचे वाहन असलेले हे प्राणी-पक्षी प्रत्यक्षातही आपल्या या देवासमोर नतमस्तक होताना दिसतात. त्यांची मूर्ती दिसतात किंवा फोटो पाहताच अशी काही लीला हे मुके जीव दाखवतात जणू काय ते आपल्या देवाचे आशीर्वादच घेतात.

First published:

Tags: Social media viral, Viral, Viral videos