न्यायाधीश पदाच्या मुलाखतीत विचारलं, 4 मित्र मर्डर करायला जातात त्यापैकी एकाकडून खून झाला तर आरोपी कोण?

न्यायाधीश पदाच्या मुलाखतीत विचारलं, 4 मित्र मर्डर करायला जातात त्यापैकी एकाकडून खून झाला तर आरोपी कोण?

न्यायाधीशांसाठीच्या मुलाखीतत काही उमेदवारांना विचारण्यात आलेले प्रश्न सर्वसामान्यांसाठी किती कठीण आणि गुंतागुंतीचे होते याची कल्पना येईल.

  • Share this:

स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्यात सध्या असलेली जीवघेणी स्पर्धाच डोळ्यासमोर येते. या परीक्षा पास होण्यासाठी दिवस-रात्र विद्यार्थी अभ्यास करत असतात. आता न्यायाधीशाच्या मुलाखतीसाठी विचारण्यात आलेले काही प्रश्न व्हायरल होत आहेत. न्यायाधीशांसाठीच्या मुलाखीतत काही उमेदवारांना विचारण्यात आलेले प्रश्न सर्वसामान्यांसाठी किती कठीण आणि गुंतागुंतीचे होते याची कल्पना येईल.

प्रश्न - चार लोक एका व्यक्तीचा मर्डर कऱण्यासाठी जात आहेत. पण त्या चारपैकी एकाकडून हत्या होते तर तुम्ही खूनाचा आरोपी कोणाला म्हणाल?

उत्तर - या प्रकरणात खूनाचा खटला त्या चारही व्यक्तींवर चालवला जाईल. कारण चारही जण त्या वेळी खून करण्याच्या तयारीत होते. यासाठी भारतीय दंडविधान कलम 302 नुसार 4 जणांवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला जाईल.

प्रश्न - खून करणारा स्वत: पोलिस स्टेशनबाहेर शस्त्रासह आला आणि त्याने आत्मसमर्पण केलं तर त्याला काय शिक्षा झाली पाहिजे?

उत्तर - अशा प्रकऱणात आत्मसमर्पण करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याआधी अधिक तपास कऱण्याची गरज असेल. कारण ती व्यक्ती एखाद्या प्रलोभनाला बळी पडून, दबावाखाली खोटं बोलत असण्याची शक्यता असते. यासाठी केसमध्ये पोलिस सुरुवातीला चौकशी करेल त्यानंतर जर आरोप सिद्ध झाले तर त्याच्यावर खूनाचा चार्ज लावला जाईल. जर यात सिद्ध झालं की, त्याने हत्या केलेली नाही तर पोलिसांची दिशाभूल केल्याचा खटला त्याच्यावर चालवला जाईल.

प्रश्न - पत्नी नोकरी करते आणि तरीही पतीकडून निर्वाह भत्ता मिळावा अशी मागणी करत असेल तर तसा अधिकार आहे का?

उत्तर : पतीने जर न्यायालयात हे सिद्ध केले की पत्नी नोकरी करत असून तिला मिळणारे वेतनातून तिचा खर्च सहज भागतो तर पतीने पत्नीला पैसे द्यायची गरज नाही.

प्रश्न - राज्यपालांच्या कारमुळे कोणाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कोणावर खटला चालवणार?

उत्तर - संविधानातील कलम 361 नुसार राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे काही खास अधिकार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही खटला चालवला जात नाही.

Published by: Suraj Yadav
First published: December 3, 2019, 10:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading