मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरबसल्या फक्त दोन मिनिटांत मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज; कसं ते वाचा

घरबसल्या फक्त दोन मिनिटांत मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज; कसं ते वाचा

दिवसाचे 24 तास अगदी सुट्टीच्यादिवशीही तुम्हाला लोन (loan) मिळू शकतं.

दिवसाचे 24 तास अगदी सुट्टीच्यादिवशीही तुम्हाला लोन (loan) मिळू शकतं.

दिवसाचे 24 तास अगदी सुट्टीच्यादिवशीही तुम्हाला लोन (loan) मिळू शकतं.

मुंबई, 06 जानेवारी :  कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्त कर्ज (loan) हवं असेल तर तुमच्यासाठी पेटीएमनं (Paytm) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पेटीएम (Paytm)या भारतातील आघाडीच्या डिजिटल फायनान्स सेवा पुरवठादार (Digital Finance Service Provider) कंपनीनं तिच्या दहा लाख ग्राहकांच्या सेवेसाठी नवीन इंस्टंट पर्सनल लोन (Instant Personal Loan) योजना दाखल केली असून, ग्राहकांना अवघ्या दोन मिनिटांत दोन लाखापर्यंतचं कर्ज मिळू शकणार आहे. ही सेवा वर्षाचे 365 दिवस अखंड 24 तास उपलब्ध राहणार असून, अगदी सार्वजनिक सुट्यांच्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशीही ही सेवा उपलब्ध असेल, असं पेटीएमनं या योजनेची घोषणा करताना म्हटलं आहे.

पेटीएम ही बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचा (NBFC) तंत्रज्ञान आणि वितरण भागीदार आहे. पगारदार, छोटे व्यावसायिक आणि अन्य व्यावसायिकांपर्यंत (Professionals)या वित्तीय संस्थांना पोहोचता यावं, कर्ज वितरण व्यवसाय वाढवता यावा यासाठी पेटीएम त्यांना मदत करते, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

पेटीएमच्या या योजनेत कर्जाच्या मागणी अर्जावरील प्रक्रिया आणि कर्जपुरवठा करण्याचं काम खासगी वित्तीय संस्था आणि बँका करणार आहेत. यामुळं नव्यानं कर्ज घेणारे ग्राहक औपचारिक वित्तीय बाजारपेठेत येतील आणि लहान शहरं, गावामधील लोकांना कर्जासाठी बँकाकडे जाण्याची सोय  नसते अशा लोकांना योग्य पर्याय उपलब्ध होतील. पेटीएमने कर्जाचा अर्ज भरण्यापासून ते कर्ज वितरणापर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटाईज (Digitise) केली आहे. यामध्ये कोणतीही कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागत नाही. पेटीएमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सेवेमुळे बँका आणि वित्तीय संस्था यांना कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास अवघी दोन मिनिटं लागतात. या योजनेअंतर्गत नोकरदार, छोटे व्यावसायिक आणि प्रोफेशनल्स यांना दोन लाखापर्यंतचं कर्ज मिळू शकतं.

हे वाचा - घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! नाही भरावी लागणार Stamp Duty

कर्जफेडीसाठी 18 ते 36 महिन्यांचा कालावधी असून त्यानुसार मासिक हप्ता ईएमआय (EMI) ठरवला जातो. पेटीएम अॅपवरील फायनान्शियल सर्व्हिसेस विभागात पर्सनल लोन टॅबवरून ग्राहक या सेवेचा वापर करू शकतात. कंपनीनं यासाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्थांशी भागीदारी केली आहे. योजनेच्या बीटा फेजमध्ये कंपनीनं 400 निवडक ग्राहकांना कर्ज पुरवठा केला आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.

हे वाचा - 2021 मध्ये हे IPO तुम्हाला करतील मालामाल, या कंपन्यांमध्ये करू शकता गुंतवणूक

पेटीएमच्या कर्ज विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता म्हणाले, स्वयंरोजगार करणारे, तरुण व्यावसायिक, प्रथमच कर्ज घेणारे, ज्यांना तातडीच्या गरजेसाठी अल्प किंवा मध्यम अवधीसाठी कर्ज हवे असते, त्यांना कर्ज देण्यासाठी आम्ही ही योजना आणली आहे. ज्यामुळं त्यांची स्वप्न, महत्त्वाकांक्षा अडून राहणार नाहीत. देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान देणाऱ्या भारतातील तरुण व्यावसायिकांना स्वावलंबी करणं हे आमचं ध्येय आहे. नवीन कर्जदारांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी आम्ही सतत नाविन्यपूर्ण आणि डिजिटाईज सुविधा आणत राहू, असंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Pay the loan, Paytm