Home /News /lifestyle /

Paytm चं नवं फिचर; आता Credit Card मार्फतही देता येणार घरभाडं

Paytm चं नवं फिचर; आता Credit Card मार्फतही देता येणार घरभाडं

ई-वॉलेट कंपनी पेटीएम (Paytm) ने देखील क्रेडिट कार्डवरून घरभाडं (Room rent) देण्याची सुविधा सुरू केली आहे.

    मुंबई, 04 डिसेंबर : सध्या अनेक जण क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरताना दिसून येतात. प्रामुख्यानं क्रेडिट कार्डने शॉपिंग, रिचार्ज आणि बिल पेमेंट त्याचबरोबर रेल्वेचं तिकीट बुकिंग आणि विमानाचं तिकीट बुकिंग किंवा ऑनलाईन पेमेंट करताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का क्रेडिट कार्डमार्फत तुम्ही घरभाडंही देऊ शकता. सामान्यपणे असं भाडं देणं शक्य होत नाही कारण घरमालक दुकानदारांसारखे पेमेंट गेटवेचा वापर करत नाही. मात्र तुम्ही क्रेडिट कार्ड मार्फतही घरभाडं भरू शकता. मार्केटमध्ये तुम्ही क्रेड (CRED), नो ब्रोकर (Nobroker), पेझॅप (Payzapp), रेड जिराफ (RedGirraffe) यांसारख्या काही मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून क्रेडिट कार्डवरून घरभाडं देऊ शकता. त्यानंतर आता देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएम (Paytm) ने देखील क्रेडिट कार्डवरून भाडं देण्याची सुविधा सुरू केली आहे. आतापर्यंत पेटीएमवरून यूपीआय (UPI), डेबिट कार्ड (Debit Card) आणि नेटबँकिंग (Net banking) ह्या माध्यमातून भाडं देण्याची सुविधा सुरू होती. हे वाचा - Whatsapp युझर्ससाठी महत्त्वाचं! अटी स्वीकारा नाहीतर डिलीट करावं लागणार अकाऊंट पेटीएम ॲपवरून तुम्ही भाडं दिल्यास तुम्हाला 2 टक्के अधिक चार्ज द्यावा लागणार आहे. मात्र तुम्हाला कॅशबॅक किंवा रिवार्ड पॉईंट्स देखील मिळू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला 10 हजार रुपये भाडं द्यायचं असल्यास क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 10,200 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर डेबिट कार्ड नेटबँकिंग आणि यूपीआय मधून पेमेंट केल्यास कोणताही अधिक चार्ज द्यावा लागणार नाही. Paytm ॲपवरून असं करा रेंट पेमेंट 1)सर्वात आधी Paytm ॲप अपडेट करा. 2) Paytm उघडून All Service वर क्लिक करा. 3) यानंतर Monthly Bills वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Inroducing Rent Paytment हा पर्याय दिसेल. 4) Inroducing Rent Paytment वर क्लिक करा. त्यानंतर Proceed वर क्लिक करा. हे वाचा - Weekend धमाल! आज रात्री 12 वाजल्यापासून फ्रीमध्ये पाहता येणार Netflix 5) त्यानंतर घरमालकाचे बँक डिटेल्स टाका. त्यानंतर Proceed करून घरमालकाचा बँक अकाउंट नंबर कन्फर्म करा. 6) त्यानंतर भाड्याची रक्कम टाका. 7) पेमेंट मोड सिलेक्ट करून क्रेडिट कार्ड, यूपीआय, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगच्या मदतीने पेमेंट करा. 8) पुढील 2 ते 3 दिवसांत घरमालकाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल. क्रेडिट कार्डवरून भाडं देण्याचे फायदे 1) क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही तुमच्याकडून कॅशची बचत करू शकता. क्रेडिट कार्डचे बिल हे सामान्यपणे 45 ते 50 दिवसांनी भरावं लागतं. भाड्याची रक्कम तुम्ही कुठेही गुंतवून अधिक फायदा मिळवू शकता. 2) क्रेडिट कार्डवरून केलेलं ट्रान्झॅक्शन तुम्ही सोप्या हफ्त्यांच्या रूपात देखील फेडू शकता. त्यामुळे अशाप्रकारे तुम्ही भाडंदेखील हफ्त्यांमध्ये भरू शकता. 3) क्रेडिट कार्डवरून केलेल्या पेमेंटवर तुम्हाला कॅशबॅक किंवा रिवार्ड पॉईंट्स देखील मिळू शकतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Paytm, Paytm offers, Technology

    पुढील बातम्या