मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शरीरावर दिसत आहेत काही निराळ्याच खुणा? लवकर तपासून घ्या, कर्करोगाचा असू शकतो धोका

शरीरावर दिसत आहेत काही निराळ्याच खुणा? लवकर तपासून घ्या, कर्करोगाचा असू शकतो धोका

वयाप्रमाणे त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. पुरूषांमध्ये केस गळणं, पांढरे होणं, त्वचेवर सुरकुत्या येणं, डाग उठणं असे त्रास होतात. पण, स्किन कॅन्सर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वयाप्रमाणे त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. पुरूषांमध्ये केस गळणं, पांढरे होणं, त्वचेवर सुरकुत्या येणं, डाग उठणं असे त्रास होतात. पण, स्किन कॅन्सर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कर्करोग हा छुपेपणानं शरीरावर आक्रमण करतो. उपचारापेक्षा वेळीच लक्षणं ओळखत केलेला प्रतिबंध या रोगात महत्त्वाचा ठरतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 डिसेंबर : मेलानोमा, बेसल सेल कार्किनोमा आणि स्क्वामस सेल कार्किनोमा सारखे स्किन कॅन्सर्स अर्थात त्वचेचे कर्करोग तुमच्या शरीरात झालेल्या नकोशा बदलांमुळे सुरू होतात. त्वचेवर (skin) दिसणारे या प्रकारचे बदल कॅन्सर नसतात. मात्र हे स्किन कॅन्सरचं (skin cancer)  कारण नक्कीच बनू शकतात.

एका अभ्यासानुसार, उजळ त्वचेच्या (fair skin) साधारण 65 वर्षीय 40 ते 50 टक्के लोकांना कॅन्सरचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्वचेवर दिसणाऱ्या कुठल्याही डाग किंवा वणाकडे दुर्लक्ष करू नका. स्किन कॅन्सरला पहिल्या स्टेजवरच रोखलं नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

एक्टोनिक कॅराटोसिस - शरीरावर हे छोटे छोटे डाग सूर्यकिरणांच्या (sun rays) अधिक संपर्कात आल्यानं येऊ शकतात. अशा खुणा आपलं डोकं, नाक, हात किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर असू शकतात. तसं पाहता हे सांगणं अवघड आहे, की अशा खुणा किती काळानंतर कॅन्सरचं स्वरूप धारण करतात. याची शक्यता खूप कमी असते मात्र तरीही डॉक्टर तपासणी करण्याचा सल्ला देतात. उजळ त्वचा, लाल केस किंवा निळ्या-हिरव्या डोळ्यांच्या व्यक्तींना या कॅन्सरचा धोका अधिक असतो.

एक्टिनिक चेइलिटीस - सुद्धा स्किन कॅन्सरची एक प्राथमिक अवस्था असते. ही साधारणतः खालच्या ओठावर होते. यात ओठ लालीसह कडकपण किंवा खडबडीतपण येऊ शकतं. काही केसेसमध्ये ओठावर सूज, त्वचेच्या आणि ओठांच्या कडांवरही याचा प्रभाव पडू शकतो. वेळेवर इलाज नाही मिळाला, तर एक्टिनिक चेइलिटिस हा धोकादायक स्क्वेमस सेल कार्सिनोमाचं रूप घेऊ शकतो.

क्युटेनियस हॉर्न - क्युटेनियस हॉर्न हा त्वचेवर एखाद्या शिंगासारखा उगवतो. याचा खालचा भाग लाल असतो. हा किरॅटिननं बनलेला असतो. किरॅटिन म्हणजे तेच प्रोटिन ज्यातून आपली नखे बनलेली असतात. तसं तर या शिंगाचा आकार कसाही असू शकतो मात्र याची लांबी बहुतांश वेळा मिलीमीटरमध्ये असते. सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये याचा धोका अधिक असतो.

हे वाचा-तुमच्या किचनमधील फक्त 3 पदार्थही हेल्दी ठेवतील तुमची किडनी

तीळ - शरीरावर दिसणारे तीळ आकार बदलत असतील तर त्याकडेही दुर्लक्ष करायला नको. यातून स्किन कॅन्सर उद्भवू शकतो. आकार बदललेले तीळ मेलानोमा कॅन्सरचं कारण बनतात. स्किन कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होणारे तीळ बहुतेकदा अनियमित आकाराचे असतात. हे कुठल्याही रंगाचे असू शकतात. यांचा आकार नेहमीपेक्षा बराच मोठाही असू शकतो.

डायप्लास्टिक नेवी - शरीरावर जन्मापासून असणारे तीळ कॅन्सर नसतात मात्र ते कॅन्सर बनू शकतात. सूर्याच्या सर्वाधिक किंवा सर्वात कमी संपर्कात येणाऱ्या अवयवांमध्ये यांची शक्यता खूप असते. हे आकाराने खूप मोठे आणि अनियमित असू शकतात. यांची किनार थोडी अस्पष्ट असते. हे गुलाबी, लाल किंवा ब्राऊन रंगाचे असतात.

कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला?

तसं तर शरीरावर तीळ असणं सामान्य गोष्ट आहे. मात्र तिळाची बॉर्डर तुकड्यांमध्ये दिसत असेल आणि त्याचा आकार अनियमित होत असेल तर डर्मिटॉलॉजिस्ट अर्थात त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घेत तपासणी करून घ्या.

First published:

Tags: Cancer, Skin