Elec-widget

पठाणी मुलाचा नवीन व्हिडीओ व्हायरल, TikTok वर पुन्हा एकदा दिसला त्याचा स्वॅग!

पठाणी मुलाचा नवीन व्हिडीओ व्हायरल, TikTok वर पुन्हा एकदा दिसला त्याचा स्वॅग!

त्याच्या या डायलॉगमुळे तो एका रात्रीत सोशल मीडियाचा स्टार झाला होता. त्याची प्रसिद्धी एवढी वाढली की अनेक जाहिरात कंपन्यांमध्ये त्याला घेण्याची शर्यत सुरू झाली.

  • Share this:

टिकटॉकवर (TikTok) दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही ते शेअर करतात. नुकताच TikTok वर पाकिस्तानमधील त्या पठाणी मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मुलाचं नाव अहमद शहा (Ahmed Shah) असून 'पीछे देखो पीछे...' या त्याच्या डायलॉगमुळे तो चर्चेत आला होता. त्याच्या या डायलॉगमुळे तो एका रात्रीत सोशल मीडियाचा स्टार झाला होता. त्याची प्रसिद्धी एवढी वाढली की अनेक जाहिरात कंपन्यांमध्ये त्याला घेण्याची शर्यत सुरू झाली. सध्या टिकटॉकवरील त्याचा हा नवा व्हिडीओही फार आवडीने पाहिला जात आहे.

अहमद शाहचा नवा व्हिडीओ-

यात पठाणी मुलगा त्याच्या आईला 'पीछे देखो पीछे...' बोलताना दिसतो. सध्या अहमदचा हा व्हिडीओ फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आवडीने पाहिला जात आहे. अनेक जाहिरातींमध्ये आता तो हमखास दिसतो. त्याचा हा नवा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आलं नाही तर नवल. टिकटॉकवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला लोक फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत.

अहमद शाहचा पहिला व्हिडीओ भारतात तुफान व्हायरल झाला होता. यूट्यूब, टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावरील अॅपवर अनेक प्रकारे व्हायरल झाला होता. अहमद दक्षिण वजीरिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या डेरा इस्माईल खान शहरात राहतो. अवघ्या चार वर्षांच्या अहमदला प्रसिद्ध करण्यात त्याचा मामा दानियालचा फार मोठा वाटा आहे. दानियाल अहमदचे व्हिडीओ 'पीर अहमद शाह' (Peer Ahmad Shah) या फेसबुक पेजवर अपलोड करतो.

Loading...

खूप केलं ट्रोल- 

असंही म्हटलं जातं की, अहमदला पाकिस्तानमधील 'गुड मॉर्निंग पाकिस्तान' या टीव्ही शोवर बोलावण्यात आलं होतं. यावरुन काही लोकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या शोची होस्ट निदा यासीरने अहमदला तिच्या ओठांवर किस करायला सांगितलं होतं. पण अहमदने लाजत असं काही करण्यास नकार दिला होता. यानंतरच त्या शोमधील सर्वांनाच ट्रोल करण्यात आलं होतं.

नियमितपणे करताय व्यायाम तर चुकूनही करू नका डाएटिंग, शरीराचं होईल मोठं नुकसान

Iron च्या कमतरतेमुळे होऊ शकता हा आजार, दुर्लक्ष केलं तर जाऊ शकतो जीव!

वेळीच व्हा सावध, या आजाराची लक्षणं कळत नाहीत आणि अचानक होतो मृत्यू

...म्हणून मुलं त्यांच्याहून जास्त वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...