भारतातून निघताना टेस्ट निगेटिव्ह; वुहानमध्ये पोहोचताच Air India च्या विमानातले प्रवासी Corona Positive

एअर इंडियाच्या (Air india) विमानातून चीनमध्ये गेलेले प्रवासी वुहान विमानतळावर उतरताच कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळले आहेत.

एअर इंडियाच्या (Air india) विमानातून चीनमध्ये गेलेले प्रवासी वुहान विमानतळावर उतरताच कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळले आहेत.

  • Share this:
    बीजिंग, 02 नोव्हेंबर : प्रवास करताना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे आपण कोरोना निगेटिव्ह असल्याचं सर्टिफिकेट आहेत, त्यांनाच प्रवास केला जातो आहे. दरम्यान असंच कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट असलेले आणि भारतातून एअर इंडियाच्या (Air india) विमानातून चीनमध्ये (china) गेलेले प्रवासी वुहान (wuhan) विमानतळावर उतरताच कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारताच्या वंदे भारत (Vande Bharat) मिशनअंतर्गत 30 ऑक्टोबरला एअर इंडियाचं विमान भारतातून चीनमध्ये गेलं. चीनच्या वुहान विमानतळावर उतरताच या विमानातील प्रवाशांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी 19 प्रवाशांना कोरोना असल्याचं निदान झालं. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील सर्व प्रवाशांचं सर्टिफिकेट तपासण्यात आलं होतं. त्यांच्यकडे कोरोना नेगिटिव्ह सर्टिफिकेट होतं, अशी माहिती एअर इंडिया प्रशासनानं दिली आहे. हे वाचा - राज्याचं कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण पहिल्यांदाच गेलं 90 टक्यांच्या वर दरम्यान यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हे सर्टिफिकेट खोटं असल्याचं किंवा टेस्टिंग नीट न झाल्याचा दावा केला जातो आहे. दरम्यान काही जणांनी यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. वुहानच्या हवेतच कोरोना असावा, भारतानं चेकमेट केलं, भारतानं परत उत्तर दिलं. अशा कमेंट यावर येऊ लागल्या आहेत.
    Published by:Priya Lad
    First published: