Parle G कंपनीत काम करणाऱ्या 10 हजार लोकांची जाऊ शकते नोकरी, काय आहे पूर्ण प्रकरण

Parle G कंपनीत काम करणाऱ्या 10 हजार लोकांची जाऊ शकते नोकरी, काय आहे पूर्ण प्रकरण

GST लागू झाल्यानंतर कराचे दर 5 टक्क्यापर्यंत येतील असं वाटलं होतं. मात्र सरकारने GST लागू केलं आणि बिस्किटांना 18 टक्क्याच्या स्लॅबमध्ये टाकण्यात आलं.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट- भारतात असं एकही गाव, शहर किंवा गल्ली नसेल जिथे Parle G बिस्किट माहीत नसेल. आजही अनेकजण हे बिस्कीट आवडीने खातात. अनेकांना असं वाटतं की या बिस्किटाचा खप शहरांमध्ये कमी आणि खेडेगावात जास्त होतो. पण असं काही, या बिस्किटाचा खप हा शहरांमध्येही त्याच प्रमाणात होत होता. पण आता या बिस्किटांचं उत्पादन करणारी कंपनी आता कमी मागणीमुळे चिंतेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पार्ले जीचा खप कमी झाल्यामुळे पार्ले प्रोडक्ट आठ ते 10 हजार लोकांना कामावरून कमी करू शकते.

इकोनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कंंपनी 100 रुपये प्रती किलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्किटांवरील GST कमी करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने या कंपनीची मागणी पूर्ण केली नाही तर त्यांना फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या सुमारे 8 ते 10 हजार लोकांना कमी करावं लागेल. कारण विक्री कमी झाल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वसामान्यपणे पार्ले जी हे बिस्कीट 5 रुपये किंवा त्याहून कमी किंमतीच्या पॅकमध्ये विकले जातात.

पारले जी प्रोडक्टचा सेल 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीचे एकूण 10 प्लान्ट आहेत. यात जवळपास 1 लाख कर्मचारी काम करतात. याशिवाय कंपनी 125 थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग यूनिटही ऑपरेट करता. या कंपनीची अर्ध्याहून जास्त मिळकत ही ग्रामीण बाजार पेठेतून येते.

काय आहे प्रकरण- मीडिया रिपोर्टनुसार, आधी 100 रुपये प्रती किलोपेक्षा कमी बिस्किटांवर 12 टक्के कर लागायचा. GST लागू झाल्यानंतर कराचे दर 5 टक्क्यापर्यंत येतील असं वाटलं होतं. मात्र सरकारने GST लागू केलं आणि बिस्किटांना 18 टक्क्याच्या स्लॅबमध्ये टाकण्यात आलं.

यामुळे कंपनीचा खर्च वाढला. यामुळे बिस्किटांचे दर वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय कंपनीकडे राहिला नाही. पण याचा कंपनीच्या विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला. यामुळे पारले जी कंपनीचा खप कमी होत आहे.

एफएमसीजी क्षेत्रातील मागणी घटण्याचा अंदाज- गेल्या महिन्यात मार्केट रिसर्च कंपनी नीलसनने देशाच्या FMCG सेक्टरशी निगडीत एक रिपोर्ट जारी केला होता. यात त्यांनी या वर्षाच्या ग्रोथचा अंदाज 9-10 टक्के लावला आहे. याआधी ग्रोथचा अंदाज हा 11-12 टक्के दिला होता. रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, आर्थिक मंदीचा परिणाम खाद्य व्यवसायावरही दिसत आहे. या क्षेत्रात बिस्किट, मसाले, साबण आणि पॅकेटवाल्या चहावर दिसत आहे.

रात्री चांगली झोप घेण्यात भारतीय अव्वल- आंतरराष्ट्रीय सर्व्हे

प्रेमात सीरियस नसतात या राशीची लोकं, जोडीदाराची करू शकतात सहज फसवणूक

रुबाब म्हणून नव्हे तर पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी 10 फायदे!

फक्त 3 ते 4 हजारांमध्ये फिरू शकता या जागा

VIDEO : उदनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 21, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या