मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमचं मुलांकडे लक्षं आहे? पालकांच्या दुर्लक्षतेमुळे मुलांच्या ई-सिगरेट सेवनात वाढ-रिपोर्ट

तुमचं मुलांकडे लक्षं आहे? पालकांच्या दुर्लक्षतेमुळे मुलांच्या ई-सिगरेट सेवनात वाढ-रिपोर्ट

तुमची मुलं कुठं जातात, कुणाच्या संगतीत राहतात याची माहिती नसेल तर त्याचे परिणाम होऊ शकतात गंभीर.

तुमची मुलं कुठं जातात, कुणाच्या संगतीत राहतात याची माहिती नसेल तर त्याचे परिणाम होऊ शकतात गंभीर.

तुमची मुलं कुठं जातात, कुणाच्या संगतीत राहतात याची माहिती नसेल तर त्याचे परिणाम होऊ शकतात गंभीर.

  • Published by:  Priyanka Gawde

कॅलिफोर्निया, 07 ऑक्टोबर : तुमची मुलं कुठं जातात, कुणाच्या संगतीत राहतात याकडे लक्ष देणं ही पालकांची जबाबदारी असते. पालक तसा अटोकाट प्रयत्नही करतात. पण अनेकदा लाडांमुळे किंवा मुलांना सूट देण्याच्या इच्छेमुळे पालकांचं त्यांच्याकडे दुर्लक्षही होतं. अमेरिकेत मुलांच्या व्यसनांबाबत एक संशोधन करण्यात आलं आहे. मुलं सिगरेट ओढत असतील तर अनेक पालकांना ते माहिती असतं किंवा तसा संशय असतो पण जर त्यांची मुलं इलेक्ट्रॉनिक-सिगरेट ओढत असतील तर त्यांच्या पालकांना याबाबत थांगपत्ता नसतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेलं संशोधन पेडिअट्रिक्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

इलेक्ट्रॉनिक सिगरेटला ई-सिगरेट म्हटलं जातं. सिगरेट ओढली की त्याचा वास किंवा त्याचे छातीवर झालेले परिणाम मुलांची अस्वस्थता या सगळ्या गोष्टी पालकांच्या लक्षात येतात पण ई-सिगरेटमध्ये तसे परिणाम लगेच दिसत नाहीत. जेव्हा या संशोधकांनी पालकांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्यांच्या मुलांनी ई-सिगरेट किंवा स्मोकलेस तंबाखूचा वापर केला आहे त्यांच्या पालकांना याची कल्पनाही आलेली नाही. आपल्या पाल्यानी ई-सिगरेट ओढल्याचा संशयही न आल्याचं या पालकांनी संशोधकांना सांगितलं.

वाचा-तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर फक्त करा छोटंसं काम; आरोग्यावर होणार नाही दुष्परिणाम

जेव्हा कुटुंबातील कोणीही तंबाखूजन्य पदार्थांचं सेवान करायचं नाही असे कडक नियम घरात लागू केले तेव्हा त्या कुटुंबातील मुलांनी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केलं नाही किंवा अशा कुटुंबातील सेवन करणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे मुलांना केवळ तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका असं नुसतं सांगून उपयोग नाही तर कडक शब्दांत ताकीद दिली तर परिणाम होतो, असंही या संशोधनातून लक्षात आलं आहे.

या संशोधनात अमेरिकेतील 12 ते 15 वयोगटातील 23 हजारांहून अधिक मुलांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. व्यसनांबाबत कडक नियम असलेल्या कुटुंबांतील मुलं आणि तशी बंधनं नसलेल्या घरांतील मुलं यांची तुलना केली तर ज्यांच्या घरात नियम आहेत त्या घरांतील मुलं तंबाखूचं कुठल्याही प्रकारे सेवन करण्याचं प्रमाण 20 ते 26 टक्क्यांनी कमी असतं, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

वाचा-आधी वाटला ट्युमर पण... तरुणीच्या डोकेदुखीचं खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

‘मुलांना धुम्रपानापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त घरं निर्माण करणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे हे आम्हाला माहीत आहे. तंबाखूचं व्यसन नसणारी घरं इतर व्यसनांशी कसा लढा देतात तसंच तंबाखू न खाण्याबाबात या घरांमध्ये जे नियम केलेले असतात ते सिगरेट ओढण्याव्यतिरिक्त इतर तंबाखूजन्य उत्पादनांच्या व्यसनांना रोखण्यासाठी कितपत उपयोगी ठरतात, याचा आम्ही या संशोधनात अभ्यास केलेला नाही, ’ असं कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन फ्रॅन्सिस्को स्कूल ऑफ डेंटिस्ट्रीमधील असिस्टंट प्रोफेसर आणि या संशोधनातील वरिष्ठ संशोधक बेंजामिन कॅफे यांनी सांगितलं.

वाचा-हळदीइतकंच गुणकारी आहे हे तेल; त्वचेच्या समस्या होतील दूर, सौंदर्यही खुलवेल

सिगरेट आणि ई-सिगरेटसोबतच या संशोधनात सिगार, पाइप्स, हुक्का आणि बिड्यांच्या सेवनाचं आणि स्नफ, तंबाखू चघळणं आणि विरघळणारी तंबाखू यासारख्या स्मोकलेस तंबाखूच्या मुलांनी केलेल्या व्यसनांचाही अभ्यास करण्यात आला. आईवडिल मी शिकलेले असतील, तो मुलगा तंबाखू खाणाऱ्यांच्या संगतीत आला असेल प्रौढ असेल तर मुलगा निकोटिन असलेलं व्यसन करतो किंवा तंबाखू खातो अशी शंका त्याच्या पालकांना होती असंही लक्षात आलं आहे. आईवडिलांपैकी कुणाला मुलांच्या व्यसनाबद्दल माहीत होतं असं विचारलं तर वडिलांपेक्षा आयांना मुलांच्या व्यसनांबाबत शंका होती किंवा त्यांना माहिती होतं की त्यांचा मुलगा किंवा मुलगी व्यसन करते.

First published: