Home /News /lifestyle /

Parenting tips : बोर्डिंग स्कूल सिंड्रोम म्हणजे काय? या स्थितीत मुलं का होतात एकटी?

Parenting tips : बोर्डिंग स्कूल सिंड्रोम म्हणजे काय? या स्थितीत मुलं का होतात एकटी?

तुम्ही तुमच्या मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये टाकण्याचा विचार करत असाल किंवा तुमचे मुल बोर्डिंग स्कूलमध्ये असेल तर तुम्हाला बोर्डिंग स्कूल सिंड्रोमविषयी (Boarding School Syndrome) माहिती असणे आवश्यक आहे.

    मुंबई, 5 जुलै : आपल्या पाल्यानं मोठं होऊन खूप सन्मान आणि नाव कमावावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. यामुळेच पालक मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता ठेवत (Parenting tips) नाही. मग मुलाबद्दल कडक वृत्ती अंगीकारण्याचा विषय असो किंवा त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये (Boarding School) पाठवण्याचा विषय असो. हे पाऊल मुलासाठी जितके कठीण वाटते तितकेच पालकांसाठी ते तितकेच कठोर असते. ज्या पालकांनी आपल्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले आहे किंवा ज्यांना पाठवायचे आहे त्यांना बोर्डिंग स्कूल सिंड्रोमबद्दल (Boarding School Syndrome) माहिती असणे आवश्यक आहे. मुलाला स्वतःपासून दूर नेण्यापूर्वी पालकांनी या सिंड्रोमबद्दल (What is boarding school syndrome?) जाणून घेणे गरजेचे आहे. तुमचे मूल या सिंड्रोमचा बळी तर नाही ना हे तुम्ही नक्की जाणून घेतले पाहिजे. बोर्डिंग स्कूल सिंड्रोम म्हणजे काय? हा शब्द प्रथम मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविश्लेषक प्रोफेसर जॉय स्कावेरियन यांनी वापरला होता. ही वैद्यकीय स्थिती मानली जात नाही. परंतु या स्थितीत मुलाचे मन तणाव आणि चिंतांनी (stress and anxiety) भरलेले असते. मानसोपचारतज्ज्ञ निक डफेल यांच्या मते मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्यावर त्यांना जाणवणारा हा ट्रॉमा (Boarding School Trauma) आहे. बोर्डिंग स्कूल सिंड्रोममध्ये मुलांना काय वाटते? एकटेपणा : जेव्हा मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले जाते तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि विचार येतात. यात त्याला एकटेपणा जाणवतो. राहण्यासारखी घरासारखी दुसरी कोणतीच जागा नाही असे त्याला वाटू लागते. आता अज्ञात लोकांसोबत राहून जुळवून घ्यावे लागेल की काय अशी भीती त्याच्या मनात असते. Hair Care : केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर मिळून-मिसळून वागत नाही : बोर्डिंग स्कूल सिंड्रोमग्रस्त मुलांना परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेता येत नाही. कोणाशीही बोलणे, मैत्री वाढवणे किंवा इतरांमध्ये मिसळणे यात त्यांचे मन लागत नाही. ते एकटे आणि गप्प राहतात. प्रियजनांपासून दूर राहिल्याने होतो आघात : ज्यांच्यासोबत तुम्ही आयुष्याची बरीच वर्षे घालवलीत त्यांची साथ अचानक सोडली तर वडीलधारी मंडळीही निराश होतात. ही तर मुलं असतात. त्यांच्या मनात आई-वडील, भावंडं आणि इतर नातेवाईकांपासून विभक्त झाल्याचा आघात घर करून बसतो. Plastic Side Effects: सिंगल यूज प्लास्टिकबाबत या चुका आपण दररोज करतोय; गंभीर आजारांचा धोका मन शांत होऊ लागते : घरी खेळून खेळून गोंधळ घालणाऱ्या मुलाला अचानक दुसऱ्या ठिकाणी पाठवले तर नक्कीच त्याच्या मनात भिती घर करू शकते. या भीतीने मुलाचा स्वभाव शांत होऊ लागतो. कोणाशीही बोलणे, मुलांसोबत खेळणे त्याला आवडत नाही. कारण कुटुंबापासून वेगळे होण्याची बाब त्याच्या मनात फिरत राहते.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Parents and child

    पुढील बातम्या