लसीकरणाचे कार्ड: आपल्या बाळासाठी अत्यंत गरजेचे

लसीकरणाचे कार्ड: आपल्या बाळासाठी अत्यंत गरजेचे

लसीकरणामुळे नवजात बाळाचे या घातक रोगांपासून रक्षण होते; पण तुमच्या कुटुंबातील सदस्य व मित्रांचेही संरक्षण होते.

  • Share this:

पालकत्व हे जितके आनंददायी असते, तितकेच ते थकवणारे नसले तरी व्यस्त असते. आपल्या मुलांच्या संदर्भातील कोणताही निर्णय घेताना आपण नेहमीच काळजी घेणे आवश्यक असते. दर येत्या दिवसाला त्यांना अधिक चांगले द्यावे आणि त्यांनी मजबूत आणि तंदुरुस्त व्हावे असेच आपल्याला वाटत असते.

बालपणीच्या सुरुवातीच्या दिवसांत, नवजात बालकाची प्रतिकारशक्ती विकासाच्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्याही संसर्ग किंवा रोगाचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो; पण ते चांगली स्वच्छता, पोषण व योग्य वेळी केलेल्या लसीकरणाने टाळता येऊ शकतात. वेळच्या वेळी केलेल्या लसीकरणामुळे आपल्या बालकाचे पोलिओ, धनुर्वात, गोवर, डांग्या खोकला, मेनिंजायटीस यांसारख्या धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी मदत करते. या लसी आपल्या रोगांच्या प्रतीजैविकांपासून बनविल्या जातात व ती या रोगांच्या विरोधात प्रतिजैविके निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाचे शरीर तयार करते. परिणामी, आपल्या मुलांची रोगप्रतिकारकक्षमता वाढवते व आपल्या मुलांना या प्राणघातक रोगांपासून वाचवते.

शिवाय, लसीकरणामुळे नवजात बाळाचे या घातक रोगांपासून रक्षण होते; पण तुमच्या कुटुंबातील सदस्य व मित्रांचेही संरक्षण होते. यामुळे भावी पिढ्या सुरक्षित होतात. नियमित लसीकरण करून, आपण या घातक रोगांचे प्रमाण कमी करू शकतो किंबहुना त्यांचे समूळ उच्चाटन करू शकतो. आपण काही शतकांपूर्वी प्राणघातक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी या रोगाच्या बाबतीत याचा अनुभव घेतला आहे.

तरीही, आपल्या बाळाला केवळ लस देणे एवढेच पुरेसे नाही. या लसी आपल्या बालकाला तज्ञांनी मंजूर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लसीकरणाचे कार्ड आपल्याला अगदी हीच मदत करते. हे आपल्याला आपल्या बालकाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाच्या नोंदी ठेवण्यास मदत करते, त्यामुळे आपल्याला पुढील लास कधी द्यायची आहे हे कळते.

सामान्यतः हे लसीकरणाचे कार्ड आपले बालरोगतज्ञ आपल्याला देतात, ज्यामध्ये वयाच्या 18 वर्षांपर्यंतसाठी शिफारस केल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या लसी समाविष्ट असतात.

आपल्या बालकासाठी लसीकरणाचे कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे का आहे याची कारणे खाली दिली आहेत:

  • सुरक्षित आणि प्रभावी लसीकरणाचे वेळापत्रक

लसीकरणाच्या कार्डावर बालकाच्या लसीकरणाचे वेळापत्रक दिलेले असते, जे महत्त्वपूर्ण संशोधन करून बनवण्यात आले आहे. यातील प्रत्येक लास आपल्या बालकाच्या विकासाला अनुलक्षून नियोजित करण्यात आली आहे. लसी देण्यामधील अंतर हे विकसित होणाऱ्या बालकाच्या विशिष्ट वयामध्ये किंवा वेळेमध्ये असलेल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या गरजांशी अनुरूप अशा देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय महामंडळाने शिफारस केलेले हे लसीकरणाचे वेळापत्रक आपल्या नवजात अर्भकासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे.

  • आपल्या बालकाच्या वैद्यकीय नोंदी म्हणून काम करते

तुमच्या बालकाचे लसीकरणाचे कार्डावर तुमच्या मुलांच्या वैद्यकीय नोंदींचा संपूर्ण इतिहास असेल. जेव्हा आपण क्लिनिक्स, शहरे किंवा राज्ये बदलतो तेव्हाही आपण लसीकरणाच्या कार्डच्या मदतीने बालकाचे लसीकरण वेळच्या वेळी करू शकता. सर्व इलेक्ट्रॉनिक डेटा ट्रान्स्फर होऊन त्यानंतर त्याचे पालन करण्याची काहीही गरज नाही. तो इतिहास त्यावेळी अगदी आपल्या हातात असेल.

  • पालक म्हणून आपल्यासाठी फायदेशीर

लसीकरण रेकॉर्ड ठेवल्याने पाळणाघर चालवणारे, शाळा, वैद्यकीय तज्ञ किंवा इमिग्रेशन ऑफिसर यासारख्या अधिकार्‍यांना आपल्या मुलाचे लसीकरण वेळच्या वेळी झाल्याचे व ते इतर मुलांच्या सान्निध्यात राहण्यासाठी सुरक्षित असल्याचे लक्षात येईल. याव्यतिरिक्त, लसीकरण कार्ड असणे पालकांना त्यांच्या मुलाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाच्या सहजपणे नोंदी ठेवण्यास मदत करते.

  • लस देणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त

लसीकरणाच्या कार्डात आपल्या मुलाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल तपशीलवार माहिती असते. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कोणत्याही वेळी माहितीचा हा फायदेशीर स्त्रोत आहे. या लसीकरणाचे कार्डच्या मदतीने  त्यांना कोणत्या लसी आधीच मुलाला दिल्या गेल्या आहेत किंवा त्यांना आधीच्या डोसमुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी झाली असल्यास त्याबाबत माहिती मिळण्यास मदत होते.

आम्ही वेळच्या वेळी लसीकरण करण्याचे फायदे आणि त्यांच्या नोंदी ठेवण्याचे महत्त्व येथे नमूद केले आहे. लसीकरणाच्या कार्डच्या मदतीने आपल्या मुलाच्या लसीकरणाच्या प्रभावीपणे नोंदी ठेवा.

 सूचना: GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited, डॉ. अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400 030, भारत द्वारे जनजागृतीकरिता एक पाऊल. या सामग्रीमध्ये दिलेली माहिती केवळ जनजागृतीसाठी देण्यात आली आहे. या सामग्रीमधून कोणताही वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला नाही. जर आपल्याला आपल्या कोणत्याही स्थितीबद्दल प्रश्न किंवा चिंता असेल तर किंवा अधिक माहितीसाठी कृपया आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या. लसीने प्रतिबंधित करण्याजोगया आजारांची सूची आणि प्रत्येक आजारासाठीच्या संपूर्ण लसीकरणासाठीचे वेळापत्रक यांसाठी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही GSK उत्पादनांच्या बाबतीत प्रतिकूल घटना घडल्यास कृपया कंपनीला  india.pharmacovigilance@gsk.com येथे कळवा.

एनपी-इन-एमएलव्ही-ओजीएम-200016, डीओपी डिसेंबर 2020.

First published: January 27, 2021, 5:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या