मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Parenting Tips : अशा पद्धतीने मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवा, मुलं होतील कॉन्फिडन्ट आणि मॅच्युअर

Parenting Tips : अशा पद्धतीने मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवा, मुलं होतील कॉन्फिडन्ट आणि मॅच्युअर

लहानपणी मुलांचे ज्ञान कमी असते आणि विचार प्रगल्भ नसतात. आपले मूल मोठे होऊन हुशार आणि स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम व्हावे ही सर्व पालकांची इच्छा असते. मात्र यासाठी लहानपणापासूनच मुलांना निर्णय घेण्याची कौशल्ये शिकवणे अत्यंत आवश्यक आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 9 ऑगस्ट : बालपणात जवळपास सर्वच मुलं अतिशय निरागस आणि जगाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. अशा परिस्थितीत मुलांशी संबंधित सर्व निर्णय त्यांचे पालक घेतात. पण त्याच वेळी सर्व पालकांना असे वाटते की त्यांचे मूल हुशार आणि मॅच्युअर झाले पाहिजे. तसेच त्याच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घ्यायला शिकले पाहिजे. अशावेळी आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन मुलांना सहजपणे स्वतःचे निर्णय घेण्यास शिकवू शकता. लहानपणी अनेक वेळा पालक मुलांना प्रेमाने निर्णय घेण्याच्या टिप्स देण्याचे टाळतात. त्यामुळे लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी मुलं पालकांच्या निर्णयावर अवलंबून असतात. परंतु मुलांना जीवनात आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर त्यांना लहानपणापासूनच प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मुलांना प्रशिक्षण देण्याच्या टिप्स शेअर करणार आहोत. आत्मविश्वास वाढवा मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी सर्वप्रथम त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक नवीन कामात मुलांचे मत घेण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलांच्या इच्छेला महत्त्व द्या. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल.

Baby Oral Hygiene : बाळाच्या तोंडाची स्वच्छता असते खूप गरजेची; आजार टाळण्यासाठी अशाप्रकारे स्वच्छ करा बाळाची जीभ

मुलांशी मैत्री करा काही पालक आपल्या मुलांशी अतिशय कठोरपणे वागतात. त्यामुळे मुले पालकांसमोर मोकळेपणाने बोलण्यास टाळाटाळ करू लागतात. त्यामुळे मुलांशी मित्रासारखे वागण्याचा प्रयत्न करा. ज्याच्या मदतीने मुलं तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतील आणि त्यांना योग्य-अयोग्य ओळखण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. प्रेमाने समजावून सांगा मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच त्यांचे छोटे-छोटे निर्णय घेऊ द्या. त्यामुळे मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित होईल. दुसरीकडे, मुलांच्या चुकीच्या निर्णयांवर त्यांना फटकारण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन भविष्यात मुले पुन्हा ती चूक करणार नाहीत. पचनशक्ती मजबूत करण्यासाठी फॉलो करा या टिप्स; बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर मुलांना प्रोत्साहित करा अर्थात, मुलांना योग्य निर्णय घेण्यास आणि सर्वकाही सर्वोत्तम करण्यास शिकवणे आवश्यक आहे. पण मुलाने प्रत्येक गोष्ट परिपूर्णतेने करावी असे नाही. मुलांकडूनही चुका होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी त्यांच्या चुका मोजण्याऐवजी त्यांना त्यांचा पराभव स्वीकारून जीवनात पुढे जाण्यास प्रोत्साहित करा.
First published:

Tags: Lifestyle, Mental health, Parents and child

पुढील बातम्या