• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुमच्या बाळाला नवीन दात येण्याची असतात ही 3 लक्षणं; त्याला होणारा त्रास असा करा कमी

तुमच्या बाळाला नवीन दात येण्याची असतात ही 3 लक्षणं; त्याला होणारा त्रास असा करा कमी

Symptoms Of Teething : दात येण्याची काही लक्षणं असतात, ती आज आपण (Symptoms Of Teething) पाहुयात. यावरून तुमचे बाळ दात येत असल्याने रडत आहे किंवा नाही हे तुम्हाला समजू शकेल आणि त्यावर उपाय काय हेही पाहुया.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : मुलांमध्ये दात येण्याची (Teething) प्रक्रिया ही एक सामान्य गोष्ट आहे आणि प्रत्येक मुलाला या प्रक्रियेतून जावं लागतं. पण काही वेळा काही मुलांना या काळात खूप त्रास सहन करावा लागतो. वास्तविक, या दरम्यान मुलांच्या हिरड्या दुखत असतात. कधीकधी या वेदनांमुळे मूल खूप चिडचिडं होतं असतं. अशावेळी मूल एवढं का रडतंय हे पालकांनाही समजत नाही. त्यामुळे पालकांचेही टेन्शन वाढते आणि घरात एकमेकांवर चिडचिडही होते. परंतु, अशावेळी तुम्हाला हे समजणे आवश्यक आहे की, हे दात येण्याचे लक्षण असू शकते आणि त्या वेदनांमुळे ते रडत असू शकतो. दात येण्याची काही लक्षणं असतात, ती आज आपण (Symptoms Of Teething) पाहुयात. यावरून तुमचे बाळ दात येत असल्याने रडत आहे किंवा नाही हे तुम्हाला समजू शकेल आणि त्यावर उपाय काय हेही पाहुया. दात येण्याची ही लक्षणे आहेत 1. संध्याकाळी किंवा रात्री अचानक बाळ रडते अनेक वेळा मूल झोपेत असताना रात्री जागे होते आणि विनाकारण रडायला लागते. असेच ते संध्याकाळ झाल्यानंतरही करू शकते. दात येण्याच्या प्रक्रियेत त्याच्या हिरड्यांना वेदना होत असतात आणि या वेदनांमुळे त्याची झोप मोडत असून ते जागे होते. असे होत असेल तर तुम्ही नाराज न होता, त्याचे लक्ष कुणीकडे तरी विचलित करण्याचा प्रयत्न करा. तसेच तुम्ही स्वच्छ बोटांनी त्याच्या हिरड्यांना मसाज करू शकता. 2. लूज मोशन दात येताना जुलाबाची समस्या खूप सामान्य आहे. अशा परिस्थितीत, त्याला डिहायड्रेट होऊ देऊ नका आणि भरपूर पातळ पदार्थ खायला द्या. जर अतिसार, जुलाब 2-3 दिवस टिकला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याची गरज असते. हे वाचा - कसं शक्य आहे? म्हणे, ‘जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत’, महिलेची विचित्र Saving Tips 3. सर्व काही तोंडात टाकणे अनेक मुले जे काही सापडेल ते सर्व काही आपल्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात. याचे कारण नवीन दात येणे हे देखील असू शकते. हिरड्यांमधील वेदना दूर करण्यासाठी, मूल रबरी खेळणी किंवा बोट चघळते. इतकंच नाही तर कधी कधी त्याला जे हातात सापडेल ते तोंडात घालते. हिरड्यांमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तो असे करतो. हे वाचा - नियमित पेन्शन हवी असल्यास पूर्ण करा हे काम, 30 नोव्हेंबर आहे डेडलाइन हा उपाय करा जर तुमच्या मुलाला दात येण्यामुळं वेदना होत असतील तर तुमचे हात साबणाने स्वच्छ करा आणि आपल्या बोटांनी त्याच्या हिरड्यांना हलके मसाज करा. यामुळे त्याला आराम मिळेल. (या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: