Home /News /lifestyle /

Parenting Tips: पालकांनी वेळीच बदलायला हव्यात ‘या’ 4 सवयी, नाहीतर पोरं वाया गेलीच म्हणून समजा

Parenting Tips: पालकांनी वेळीच बदलायला हव्यात ‘या’ 4 सवयी, नाहीतर पोरं वाया गेलीच म्हणून समजा

Parenting Tips: पालकांनी वेळीच बदलायला हव्यात ‘या’ 4 सवयी, नाहीतर पोरं वाया गेलीच म्हणून समजा

Parenting Tips: पालकांनी वेळीच बदलायला हव्यात ‘या’ 4 सवयी, नाहीतर पोरं वाया गेलीच म्हणून समजा

Parenting Mistakes: मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या पालकांचं योगदान सर्वाधिक असते. मुलं त्यांच्या पालकांकडून जास्तीक जास्त गोष्टी शिकत असतात. पालक कळत नकळत मुलांसमोर अशा काही चुका करतात, ज्या त्यांना किरकोळ वाटतात, परंतु लहान मुलांवर मात्र या गोष्टींचा खूप खोल परिणाम होतो.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जून : लहान मुलं (Children) त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून शिकत असतात. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींचे ते सूक्ष्म निरीक्षण करत असतात आणि त्याचे ते अनुकरण करत असतात. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या पालकांसोबत (Parents) घालवत असतात. साहजिकच मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या पालकांचं योगदान सर्वाधिक असते. मुलं त्यांच्या पालकांकडून जास्तीत जास्त गोष्टी शिकत असतात. पालक कळत नकळत मुलांसमोर अशा काही चुका करतात, ज्या त्यांना किरकोळ वाटतात, परंतु लहान मुलांवर मात्र या गोष्टींचा खूप खोल परिणाम होतो. पालकांना वाटतं की आपलं मुल लहान आहे, त्याला काय समजणार आहे? परंतु असा विचार करणे ही पालकांची सर्वात मोठी चूक आहे. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलाची शिकण्याची शक्ती खूप वेगवान असते. अशा परिस्थितीत ते जे काही पाहते, ऐकते, ते त्याच्या मनात घर करून बसते. त्यामुळे पालकांनी आपल्या काही वाईट सवयींना (Parenting Mistakes) आळा घालणे आवश्यक आहे, जेणेकरून मुलाला कोणत्याही वाईट सवयीचे व्यसन लागू नये. चला तर मग जाणून घेऊया पालक म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे. हेही वाचा- Diabetes Tips : तुमच्या आहारात समाविष्ट करा मेथीची भाजी, Blood sugar राहते नियंत्रित पालकांनी या 4 वाईट सवयी सुधारल्या पाहिजेत - 1. मुलांसमोर वाद घालणं टाळा- एखाद्या गोष्टीवरून वाद होत असतील तर मूलासमोर शिवीगाळ करू नका. नाहीतर मूलही तसंच बोलू लागतील. त्यामुळे अपशब्द वापरू नयेत हे लक्षात ठेवा. मुले या सर्व भाषा लवकर शिकतात. कोणतीही गोष्ट शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा बंद खोलीत चर्चा करा. 2. मुलांसमोर दारू पिऊ नका- मूल लहान असेल तर त्याच्यासमोर दारू पिणे ही तुमची चूक असू शकते. लहान मुलांनाही या गोष्टींबद्दल समजू शकते. म्हणूनच एकतर दारू पिऊ नका, दारू प्यायलात तरी त्यांच्यासमोर पिऊ नका आणि प्यायलात तरी त्यांच्यापुढे जावू नका. हेही वाचा- Parenting Tips : लहान मुलांचं मानसिक आरोग्य जपणं आहे एक आव्हान, 'या' उपायांनी मुलं राहतील आनंदी 3.जेवताना फोन वापरू नका- जर तुम्ही मुलाला जेवताना फोन वापरण्यास किंवा टीव्ही पाहण्यास मनाई केली असेल तर स्वतःही ते पाळा. जर तुम्ही तसं केलं तर मुलंही तुमचं ऐकणार आहेत. मग मुलंही हट्ट करू लागतील आणि तुम्हालाही नाईलाजास्तव फोन किंवा टीव्हीचा रिमोट द्यायला भाग पाडलं जाईल. 4. शिव्या देणे टाळा- अनेकदा स्त्रिया एकत्र बसतात तेव्हा त्या शेजाऱ्यांबद्दल वाईट साईट बोलू लागतात. काहींना टोमणे मारण्याचीही वाईट सवय असते. या सर्व गोष्टी मुलांच्या मनातही घर करतात. तोही तुमचं अनुकरण करू शकतो. त्यालाही असं बोलणं चांगलं वाटू शकते आणि तोही त्याच्या आयुष्यात त्याचा अवलंब करण्यास सुरवात करेल जे त्याच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत या सवयी सुधारण्याची नितांत गरज आहे.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Parents, Parents and child

    पुढील बातम्या