मुंबई, 13 जानेवारी :: झपाट्याने बदलणाऱ्या जगात पालकांपासून मुलांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या गतीने धावत आहे. कामाचा वाढता ताण आणि स्पर्धा करताना पुढे जाण्याची इच्छा यामुळे कुटुंबाकडे हवे तितुके लक्ष देणे अवघड झाले आहे. त्याचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर तितकाच होताना दिसतो. वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये हल्ली लोक एकच मूल होऊ देण्याचा विचार करतात.
वेळेअभावी मुलांची जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे निभावली जातेच असे नाही. त्यामुळे पालक एकच अपत्य सांभाळणे सोयीचे मानतात. याशिवाय वाढत्या गरजा आणि खर्चादरम्यान एकापेक्षा जास्त मुलांचे संगोपन करणे कठीण होऊ शकते, हेदेखील पालक मान्य करतात. मात्र WeHavKids च्या मते, एकच मूल असण्याचे काही फायदे आहेत, पण त्याचे काही तोटेही आहेत. याबाबत पालकांना माहिती असणे आवश्यक आहे. एकट्या मुलाच्या समस्या काय आहेत, जाणून घेऊया.
मुलांसमोर पालकांनी या 6 गोष्टी बोलू नयेत; त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो चुकीचा परिणाम
एकट्या मुलांच्या या असतात समस्या
एकटेपणा जाणवणे - मुलाला त्याच्या वयाचा एकही सदस्य घरी सापडत नाही, ज्याच्याशी तो त्याच्या गोष्टी शेअर करू शकेल आणि खेळू शकेल. त्यामुळे त्याला एकटेपणा जाणवतो.
मूल हट्टी होते - मूल जेव्हा एकटे असते आणि त्याचे सर्व म्हणणे मान्य केले जाते, तेव्हा ते हट्टी होण्याची शक्यता असते. हे पालक आणि मूल दोघांसाठीही वाईट ठरू शकते.
पालकांच्या अपेक्षा वाढतात - जेव्हा मूल एकटे असते, तेव्हा पालकांच्या सर्व अपेक्षा एकट्या मुलावर अवलंबून असतात, ज्यामुळे कधीकधी पालक आणि मूल दोघेही निराश होतात.
मूल उदास होऊ शकते - पालकांच्या वाढत्या दबावामुळे मुलावर अतिरिक्त ओझे वाढते, ज्यामुळे मूल नैराश्यग्रस्त होऊ शकते.
आव्हानं न झेपणे - पालकांचे एकुलते एक मूल असल्याने पालक त्याची प्रत्येक गरज आणि मागणी पूर्ण करतात, त्यामुळे मूल आव्हानांसाठी तयार होत नाही.
आत्मविश्वास कमी होणे - घरी एकटे असल्यामुळे, मूल कोणाशीही जास्त बोलत नाही. त्याला सार्वजनिक ठिकाणी आत्मविश्वासाची कमतरता जाणवते, कारण त्याचे शाळेव्यतिरिक्त इतर मुलांशी जास्त संभाषण होत नाही.
Parenting Tips: रात्रीच्या वेळी तुमची मुलं तासनतास इंटरनेटवर काय पाहतात? वेळीच द्या लक्ष, नाहीतर...
मूल शेअरिंग शिकत नाही - एकटे राहिल्यामुळे मुलाला स्वतःसाठी सर्व सुविधा मिळतात आणि प्रत्येक वस्तू त्याच्या एकट्यासाठी असते. त्यामुळे बऱ्याचदा मूल त्याच्या वस्तू आणि खेळणी इतरांसोबत शेअर करत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Mental health, Parents and child