मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमचीही लहान मुलं स्वतःच्या हाताने जेवत नाहीत? मग 'या' टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर

तुमचीही लहान मुलं स्वतःच्या हाताने जेवत नाहीत? मग 'या' टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर

मुलांना अशी लावा सवय

मुलांना अशी लावा सवय

तीन वर्षाच्या मुलानं स्वतःच्या हातानं व्यवस्थित खावं, यासाठी त्याला काही सवयी लावणं गरजेचं आहे. पालकांनी स्वतःमध्ये काही छोटे बदल केल्यास या वयोगटातील मुलांना स्वतःच्या हातानं आणि नीट अन्न खाण्याची सवय लागू शकते

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर:    बाळाचं संगोपन हे पालकांसाठी काहीसं आव्हानात्मक असतं. बाळाचं पोषण योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी पालक विशेष प्रयत्नशील असतात. बाळाचा मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास योग्यरितीनं व्हावा यासाठी काही पालक तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतात. बाळाचा आहार हा पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असतो. मूल जेव्हा तीन वर्षाचं होतं, तेव्हा त्यानं स्वतःच्या हातानं खाणं अपेक्षित असतं. पण तीन वर्षानंतर मूल स्वतःच्या हातानं खात नाही, अशी तक्रार काही पालक करत असतात. तसंच वयाच्या या टप्प्यावर मुलं अन्न कमी प्रमाणात खातात आणि जास्त प्रमाणात वाया घालवतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो अशीही तक्रार पालक करतात. त्यामुळे तीन वर्षाच्या मुलानं स्वतःच्या हातानं व्यवस्थित खावं, यासाठी त्याला काही सवयी लावणं गरजेचं आहे. पालकांनी स्वतःमध्ये काही छोटे बदल केल्यास या वयोगटातील मुलांना स्वतःच्या हातानं आणि नीट अन्न खाण्याची सवय लागू शकते. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयी माहिती दिली आहे.

आज जागतिक रेबीज डे, फक्त कुत्राच नव्हे हे प्राणी चावल्यानेही होतो जीवघेणा आजार

जेव्हा तुमचं मूल स्वतःच्या हातानं खायला सुरुवात करतं, तेव्हा त्याच्या आरोग्यात मोठे बदल दिसू लागतात. पण मुलं स्वतः खाताना बरंचसं अन्न वाया घालवतात. यामुळे नकळत त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर तुमचं मूल स्वतःहून अन्न खात असेल आणि खाताना अन्न सांडलं तर त्याला खाली पडलेलं अन्न खाऊ नये, असं समजावून सांगा. काही वेळा मुलांना खायला देऊन पालक आपल्या कामात व्यस्त होतात. अशा वेळी मुलं खाली सांडलेलं अन्न खातात. यामुळे त्याचं आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याचा धोका अधिक असतो.त्यामुळे पालकांनी मुलांजवळ बसून अन्न कसं खावं हे शिकवलं पाहिजे. तसंच खाली पडलेलं अन्न न खाण्याचा सल्लाही दिला पाहिजे.

मुलांच्या आरोग्यासाठी पालक काही खास पदार्थ बनवतात. असे पदार्थ आरोग्यदायी असले तरी त्याला चव नसते. त्यामुळे मोठी माणसं असो अथवा लहान मुलं चव आवडली नाही तर असे पदार्थ खाणं टाळतात. मुलांना स्वतःच्या हातानं जेवायची सवय लावायची असेल तर त्याच्यासाठी खास पदार्थ बनवावेत जे आरोग्यदायी आणि चविष्ट असतील. तुम्ही यासाठीचे पर्याय ऑनलाइन सर्च करू शकता.

या प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर

वयाच्या तिसऱ्या वर्षी मुलं निश्चितपणे आपले पालक काय करतात, याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. मुलांना स्वतःच्या हातानं अन्न खाण्याची सवय लावू इच्छित असाल, तर तुम्ही त्यांच्यासमोर स्वतः जेवण करा. जेवण कसं करायचं याविषयी मुलांना माहिती द्या. असं केल्यानं कदाचित नवीन गोष्ट म्हणून ते लगेच स्वीकारतील आणि त्यांना त्याची सवयही लागून जाईल. पालकांनी स्वत: प्रात्यक्षिक करून दाखवणं हे त्या वयात सर्वांत महत्त्वाचं असतं. तसं केलं तर मुलं लवकर शिकतात. त्यामुळे ती पद्धत उपयुक्त ठरेल.

First published: