Home /News /lifestyle /

Parenting Tips : तुम्ही मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवता? मग आत्ताच बदला सवय; असा होतो परिणाम

Parenting Tips : तुम्ही मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवता? मग आत्ताच बदला सवय; असा होतो परिणाम

मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करण्याची सवय असते. सहसा, पालकदेखील (Parenting Tips) मुलांच्या प्रेमापोटी त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवतात. मात्र पालक सीमा ठरवत नाहीत, ज्यामुळे मूल अधिक हट्टी होते.

  मुंबई, 26 जून : प्रत्येक पालकाची आपल्या मुलाबद्दल काही स्वप्ने असतात आणि मुलांनी आपले नाव अभिमानाने वाढवावे अशी पालकांची इच्छा असते. परंतु त्यासाठी जर आपण मुलाबद्दलच्या सर्व गोष्टी आंधळेपणाने करू लागलो तर त्याचे काही चांगले किंवा वाईट परिणाम देखील होऊ शकतात. खरंतर मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करण्याची सवय असते. सहसा, पालकदेखील (Parenting Tips) मुलांच्या प्रेमापोटी त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवतात. ParentsCircle.com च्या मते, सर्व गोष्टींना हो म्हणणे (Saying Yes To Kids) हेदेखील एक पालकत्व तंत्र (Parenting Technic) आहे आणि या तंत्रात पालक जाणूनबुजून मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणतात. जेणेकरून त्यांना कशाचीही कमतरता भासू नये आणि मुले त्यांच्या पालकांशी जास्त घट्ट जोडली जावी. यामध्ये मुलांना जखडल्यासारखे वाटू नये म्हणून त्यांना हवे ते करू दिले जाते. यामुळे त्यांच्यात काही कौशल्ये विकसित करता येतात. मात्र प्रत्येक गोष्टीला हो म्हणणेही चांगली गोष्ट नाही. त्याच्या फायद्यांसोबतच अनेक तोटेही दिसतात. त्यामुळे मुले खूप हट्टी होऊ शकतात. आज आपण मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण केल्यामुळे होणारे फायदे आणि नुकसान याबद्दल बोलणार आहोत. मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करण्याचे फायदे - मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण केल्याने त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि ते त्यांच्या पालकांशी अधिक अधिक घट्टपणे (Parent Child Relationship) जोडले जातात. - यामुळे मुलांना पुढे जाण्यासाठी आणि नवीन स्किल्स आत्मसात (Skill Development) करण्यासाठी मदत होते.

  केस गळतीचे कारण तुमची हेयर वॉशची चुकीची पद्धत तर नाही ना? हे आहेत उपाय

  - असे केल्यामुळे मुले लपून किंवा खोटे बोलून कोणतेही काम करत नाहीत आणि त्यामुळे ते चुका आणि खोडसाळपणाही कमी करतील. मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण केल्यामुळे होणारे नुकसान - पालक सीमा ठरवत नाहीत, ज्यामुळे मूल अधिक हट्टी होते. - मुलाला अनावश्यक गोष्टींसाठीदेखील हट्ट करण्याची सवय होते. त्यामुळे ते अधिक हट्टी (Stubborn Child) आणि आक्रमक होऊ लागतात. - यामुळे मुलांना असे वाटू शकते की, त्यांना आता आयुष्यात कुणाचीही गरज नाही आणि त्यामुळे ते इतरांनीही त्याच्या म्हणन्यानुसारच चालावे अशी अपेक्षा करू शकतात. मात्र ते शक्य नसते.

  सूर्यास्तानंतर ही कामं करण्याची चूक कधीही करू नये; वाईट बातम्या कळतात

  - पालकांसाठी मुलाची प्रत्येक मागणी पूर्ण करणे खूप महाग आणि अधिक तणावपूर्ण काम असू शकते. यामुळे मुलंही पैशाला महत्त्व देण्यास कमी शिकतात आणि प्रत्येक जिद्द पूर्ण करणे हे पालकांचे कर्तव्य समजू लागतात. - यामुळे मुले प्रत्येक काम करताना नखरे करतात आणि स्वतःला त्रास होईल, कष्ट पडतील अशा गोष्टी करणे टाळू लागतात. त्यामुळे मुले कामचुकार (Lazy Child) होण्याची शक्यता असते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Mental health, Parents and child

  पुढील बातम्या