लसीकरणाच्या कार्डचे पालन करणे का महत्त्वाचे आहे?

लसीकरणाच्या कार्डचे पालन करणे का महत्त्वाचे आहे?

लसीकरणाचे कार्ड लसीकरणाच्या वेळापत्रकाचे नियोजन तर करतेच पण त्याचबरोबर अशा लसी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

  • Share this:

लसीकरणाचे कार्ड म्हणजे पालकांना त्यांच्या मुलांच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचा लेखाजोखा ठेवून त्यांना अनेक वर्षे रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करणारा एक स्मार्ट मार्गदर्शक आहे. हा त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीचा पासपोर्ट आहे.

या महामारीमुळे आपल्या खूप साऱ्या आरोग्यविषयक सवयी बदलल्या आहेत. हे विशेषकरून लहान मुलांच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाला अगदी तंतोतंत लागू पडते. एखाद्या बालकाच्या जीवनातील सुरुवातीच्या पाच वर्षांत, त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्याच्या टप्प्यांना अनुरूप असलेल्या अनेक लसी देण्याचे नियोजन केले जाते. मुलांना डांग्या खोकला, हेपेटायटीस ए, मेनिंजायटीस व पोलिओ यांसारख्या बालपणीच्या भयंकर रोगांपासून संरक्षण देण्यासाठी या लसी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पालक आपल्या मुलांच्या 1 ते 2 वर्षे वयामध्ये अत्यंत काळजीपूर्वक लसीकरण करून घेतात, पण हेच लसीकरण त्यांना मोठे झाल्यावरही त्यांना कवच देते. मुले मोठी झाली तरीही या आजारांचा धोका टळत नाही हे पालकांनी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वय वर्षे 1 ते 5 मध्ये दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या लसींमध्ये हेपेटायटीस-ए, कांजिण्या, एमएमआर, मेनिंजायटीस एसीडब्ल्यूवाय लस, डीटीपी-एचआयबी-हेपेटायटीस बी बूस्टर, पीसीव्ही बूस्टर, वार्षिक शीतज्वरासाठीचे लसीकरण, इ. लसींची शिफारस केली जाते.

या लसींपैकी कोणतीही एक लस घेण्याचे राहून गेल्यास त्याचे आपल्या बालकाच्या आरोग्याशी निगडीत असे दूरगामी परिणाम होऊ शकतात. म्हणूनच बालरोगतज्ञ पालकांना मुलांच्या चांगल्या आरोग्याचा पासपोर्ट अर्थात लसीकरणाचे कार्ड देतात. लसीकरणाचे कार्ड लसीकरणाच्या वेळापत्रकाचे नियोजन तर करतेच पण त्याचबरोबर अशा लसी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते. पालक आपल्या भविष्यातील कृतींचे नियोजन करण्यासाठी आणि राहून गेलेल्या लसी देण्यासाठी याचा वापर करू शकतात.

सध्या जगात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलेला असताना लसीकरणाच्या कार्डचे महत्त्व वाढले आहे. लसीकरणाचे कार्ड आपल्या बालकाच्या आरोग्य आणि रोगप्रतिकारकतेच्या इतिहासातील चांगल्या नोंदी वाढवते. हे शाळांमध्ये प्रवेश घेताना किंवा प्रवासी परवान्यासाठी अर्ज करताना उपयोगी ठरू शकते. याचा उपयोग डॉक्टरांना बालकाच्या रोगप्रतिकारकतेची स्थिती आणि बाकी राहिलेल्या अन्य लसींची माहिती मिळण्यासाठी होतो.

पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, हे लसीकरणाचे कार्ड अत्यंत गंभीर बालरोगांच्या विरोधात कोणत्याही बालकाला सर्वसमावेशक संरक्षण देत असल्याविषयी जनजागृती करते. यामुळे पालकांना कोणत्याही चुकीमुळे लसीकरणास विलंब होऊ शकतो आणि रोगप्रतिकारकतेला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव होऊन बालकाच्या जीवनातील सुरुवातीच्या वर्षांत योग्य नियोजन पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने तयार केलेले इम्युनाईझ इंडिया हे अॅप अशीच एक सेवा पुरवते. असेच अन्य काही प्लॅटफॉर्म्स आहेत जे पालकांना त्यांच्या बालकाच्या लसीकरणाचे कार्ड आणि नोंदी डिजीटाईझ करण्याची मुभा देतात.

या फायद्यांचा विचार करता, लसीकरणाच्या कार्ड आणि बालरोगतज्ञांनी शिफारस केलेल्या वेळापत्रकाचे पालन करणे सर्व पालकांसाठी अनिवार्य आहे. आपल्या बालकाला कोणती लस कधी द्यावी याविषयी ते अचूक मार्गदर्शन करतात. आपल्या बालरोगतज्ञांच्या सल्ल्याने हे लसीकरण पुढे अधिक सुलभ करता येऊ शकते. आणि अगदी तसेच लसीकरणाच्या कार्डचे अगदी तंतोतंत पालन करून आपल्या पाल्याच्या रोगप्रतिकारकता आणि सुरक्षेचा अचूक पाया निर्माण करता येतो.

सूचना: GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited, डॉ. अॅनी बेझंट रोड, वारली, मुंबई 400 030, भारत. चा हा एक जनजागृतीसाठीचा एक उपक्रम आहे. या सामग्रीमध्ये दिलेली माहिती ही केवळ सर्वसाधारण जनजागृतीसाठी आहे आणि कोणताही वैद्यकीय सल्ला देत नाही. आपल्या आरोग्याच्या स्थितीविषयी अधिक माहितीसाठी, कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास, कृपया आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. लसींनी प्रतिबंध करता येण्याजोग्या रोगांच्या संपूर्ण सूची आणि प्रत्येक रोगासाठी लसीकरणाचे संपूर्ण वेळापत्रक यांसाठी आपल्या बालरोगतज्ञांचे मार्गदर्शन घ्या. कोणत्याही GSK उत्पादनाचे दुष्परिणाम आढळल्यास कृपया कंपनीला india.pharmacovigilance@gsk.com येथे कळवा.

NP-IN-MLV-OGM-200018, DOP Dec 2020.

First published: January 27, 2021, 5:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या