Home /News /lifestyle /

तुमच्याही बाळाची Height कमी वाटतेय का? आहारात या Super foods चा समावेश करून Magic पाहा

तुमच्याही बाळाची Height कमी वाटतेय का? आहारात या Super foods चा समावेश करून Magic पाहा

Parenting Tips: उंची न वाढण्यासाठी काही वेळा अनुवांशिक कारणं जबाबदार असतात. शिवाय, आपल्या खाण्याच्या सवयी आणि त्याची गुणवत्ता यावरही बरंच काही अवलंबून असतं.

    मुंबई, 21 जानेवारी : मुलांची उंची वाढत नसेल तर ती पालकांसाठी समस्या बनते. कारण व्यक्तिमत्व सुधारण्यात शरीराच्या उंचीचा महत्त्वाचा वाटा असतो. उंची न वाढण्यासाठी काही वेळा अनुवांशिक कारणं जबाबदार असतात. शिवाय, आपल्या खाण्याच्या सवयी आणि त्याची गुणवत्ता यावरही बरंच काही अवलंबून असतं. आपण आपल्या मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर वाढत्या मुलांची उंची वाढवण्यासाठी हे खूप (How to increase height of kids) प्रभावी ठरू शकतं. अशाच काही सुपर-फूड्सबद्दल (Super Foods) जाणून घेऊया, ज्यांचा समावेश तुमच्या वाढत्या मुलांच्या आहारात करून तुम्ही त्यांच्या शारीरिक विकासाला गती देऊ शकता. यामुळं तुमच्या मुलांची उंची वाढते आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. तुरट आणि लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करा तुरट आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वं, खनिजं आणि इतर फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात. ते आपल्या वाढत्या मुलांची उंची वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. यामध्ये आढळणारं 'क' जीवनसत्त्व आपल्या शरीरात कोलेजन तयार करतं आणि मुलांची उंची वाढवण्यास मदत करतं. शरीरातील पेशींच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठीही (creation and healing) हे खूप फायदेशीर आहे. म्हणून, आपण वाढत्या मुलांच्या आहारात तुरट आणि लिंबूवर्गीय फळंदेखील समाविष्ट केली पाहिजेत. रताळं वाढत्या मुलांसाठी रताळं हे सुपर फूडच ठरतं. हे आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवतं. तसंच यामध्ये आढळणारं 'अ' जीवनसत्त्व आपल्या हाडांचं आरोग्य चांगलं राखतं. हे मुलांची उंची वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय रताळ्यामध्ये विद्राव्य आणि अघुलनशील असे दोन्ही प्रकारचे फायबर आढळतात. ते पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. अंडी खायला द्या अंडी हा देखील दुधासारखा संपूर्ण आहार मानला जातो. प्रथिनांसह, कॅल्शियम आणि खनिजंदेखील यामध्ये आढळतात. ही वाढत्या वयातील मुलांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत. म्हणूनच मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांनी दररोज अंड्याचं सेवन केलं पाहिजे. हे वाचा - कमी उंची असलेले पुरुष असता जास्त Sexually Active, संशोधनातून माहिती उघड आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा मुलांची उंची वाढवण्यासाठी हिरव्या आणि पालेभाज्या महत्त्वाच्या असतात. त्यात आढळणारी जीवनसत्त्वं आणि खनिजं आपल्या हाडांची घनता वाढवतात आणि त्यांना मजबूत करतात. त्यामुळं वाढत्या मुलांसाठी हिरव्या पालेभाज्या खूप फायदेशीर ठरतात. हे वाचा - ‘ही’ सिमकार्ड्स आजपासून होणार बंद, यामध्ये तुमचा नंबर तर नाही ना? वाचा काय आहे कारण सॅल्मन फिश खा तुम्ही आणि तुमचं मूल मांसाहार करत असाल तर त्यांच्या आहारात सॅल्मन फिशचा नक्कीच समावेश करा. यामध्ये आढळणारं ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदयविकार आणि वाढत्या मुलांसाठी अतिशय गुणकारी आहे. याशिवाय यामध्ये प्रथिनं आणि अनेक खनिजंदेखील आढळतात, यामुळं मुलांची वाढ चांगली होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Parents, Parents and child

    पुढील बातम्या