मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

किती महिन्यानंतर बाळांच्या आहारात मसाले-तिखट वापरावे; या टिप्स आहेत उपयुक्त

किती महिन्यानंतर बाळांच्या आहारात मसाले-तिखट वापरावे; या टिप्स आहेत उपयुक्त

'मसाला' म्हणजे फक्त लाल किंवा काळी मिरी असा अर्थ नाही तर त्यात लसूण, आलं, हिंग, जिरे, बडीशेप, धणे, मोहरी, मेथी आणि हळद इत्यादी सगळं आलं. हे मसाले बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त मानले जातात. पण, कधीपासून खावेत?

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 ऑगस्ट : दूध सोडल्यानंतर, बाळ घन पदार्थ खाण्यास सुरुवात करते. कुटुंबातील लोक आणि मित्र हे आपल्याला बाळ सहा महिन्यांचे झाल्यावरच त्याच्या आहारात मसाले घालण्याची शिफारस करतात, परंतु बहुतेक डॉक्टर सांगतात की, बाळ आठ महिन्यांचे झाल्यावरच त्याच्या आहारात मसाले सुरू करावेत. बाळाला पोटदुखी तसेच ऍलर्जी त्यामुळे होत नाही. 'मसाला' म्हणजे फक्त लाल किंवा काळी मिरी असा अर्थ नाही तर त्यात लसूण, आलं, हिंग, जिरे, बडीशेप, धणे, मोहरी, मेथी आणि हळद इत्यादी सगळं आलं. हे मसाले बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त मानले (Add Spices in kids Food) जातात. बेबीसेंटरच्या माहितीनुसार, हिंग, आले, बडीशेप, ओवा आणि जिरे यांचा वापर मुलांची पोटदुखी कमी करण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी बनवलेल्या औषधांमध्ये केला जातो. तज्ज्ञांच्या मते, लसूण आणि हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी असे घटक असतात, जे लहान मुलांसाठीही खूप फायदेशीर असतात. हळद - आपण डाळी आणि भाज्यांमध्ये चिमूटभर हळद घालून मुलांना खायला देऊ शकता. हळदीचे सेवन केल्याने त्यांचे पचन सुधारते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ऍलर्जीपासून संरक्षण होते. हा मसाला बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मिरची पावडर - दीड वर्षानंतरच मुलांच्या जेवणात तिखट वापरावे. त्यानंतरही तिकटाचे प्रमाण फार कमी असावे. लसूण आणि आले - लहान मुलांसाठी चिकन किंवा डाळ शिजवताना लसणाची एक पाकळी वापरू शकता किंवा आल्याचा एक छोटा तुकडा किसून टाकता येतो. यामुळे गॅस्ट्रिकच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे घटक प्रतिजैविक एजंट म्हणून काम करतात. आपण 8-10 महिन्यांनंतर मुलांना आहारात लसूण देऊ शकता, मात्र, आलं हे 2 वर्षांच्या वयानंतरच दिले पाहिजे. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम जिरे - जिऱ्याचे सेवन 8 महिन्यांनंतरच्या मुलांसाठीही सुरक्षित असते. जिरे अनेकदा एका लहान चमचा तुपात मिसळून डाळी, तांदूळ आणि भाज्यांमध्ये घालता येतात. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार मेथीचे दाणे - 18 महिन्यांनंतर तुम्ही मुलांच्या आहारात मेथीचा समावेश करू शकता. हे इडली-डोसा पिठात, भाज्या आणि करीमध्ये कमी प्रमाणात वापरले जाऊ शकते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या