Home /News /lifestyle /

तुमच्या या वाईट सवयी मुलाचे आयुष्य कायमचे खराब करू शकतात; पालकांनी ही खबरदारी घ्यावीच

तुमच्या या वाईट सवयी मुलाचे आयुष्य कायमचे खराब करू शकतात; पालकांनी ही खबरदारी घ्यावीच

त्यांचे काका-काकी आणि आजी-आजोबा त्यांचा सांभाळ करतात. त्यामुळेच घराबाहेर निश्चिंतपणे काम करता येतं आणि स्वतःला वेळही देता येतो.

त्यांचे काका-काकी आणि आजी-आजोबा त्यांचा सांभाळ करतात. त्यामुळेच घराबाहेर निश्चिंतपणे काम करता येतं आणि स्वतःला वेळही देता येतो.

पालक आपले संपूर्ण आयुष्य मुलांना योग्य गोष्टी शिकवण्यात घालवतात, पण नकळत ते मुलांना काही वाईट गोष्टी शिकवतात, ज्याचा मुलांवर खूप नकारात्मक (parenting mistakes) परिणाम होतो. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा मुलांवर मानसिक परिणाम होतो.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 30 सप्टेंबर :  लहान मुलं त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या पालकांसोबत घरी घालवतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकतात. चांगल्या किंवा वाईटासाठी पालक त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीचे उदाहरण असतात. पालक आपले संपूर्ण आयुष्य मुलांना योग्य गोष्टी शिकवण्यात घालवतात, पण नकळत ते मुलांना काही वाईट गोष्टी शिकवतात, ज्याचा मुलांवर खूप नकारात्मक (parenting mistakes) परिणाम होतो. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा मुलांवर मानसिक परिणाम होतो. वाद घालणे - जर तुमचे मुल तुम्हाला दररोज वाद घालताना किंवा घरात वारंवार भांडताना पाहत असेल तर त्याचे वर्तन आपोआप हिंसक होईल. घरात होणारी मारामारी पाहून मुले स्वतःला कुठेतरी दोष देऊ लागतात. जर पालकांनी आपापसात एखाद्या गोष्टीवरून वाद घातला असेल तर त्याबद्दल मुलांशी बोलताना तो मुद्दा अगदी चांगल्या भाषेत सांगावा. जेणेकरून मुलांना त्यातून हे समजते की भांडण्यापेक्षाही शांततेनं बोलूनही कोणत्याही गोष्टीवर उपाय करता येतो. हिंसा - घरात कोणत्याही प्रकारची हिंसा मुलांचे आयुष्य कायमचे खराब करू शकते. कोणत्याही प्रकारची हिंसा, अपमानास्पद असो किंवा शारीरिक, मानसिकदृष्ट्या वाढणाऱ्या मुलांवर खोल परिणाम (negative things kids learn from their parents) होतो. मुले आधी त्यांच्या पालकांकडून गैरवर्तन करायला शिकतात. अशी मुले मोठी झाल्यावर त्यांना ड्रग्स किंवा अल्कोहोलचे व्यसन होण्याची शक्यता असते. हे वाचा - IPL 2021: मैदानातील वादावर अश्विनचं खणखणीत उत्तर, मॉर्गनला समजावली ‘Spirit of the game’ ची व्याख्या कठोर शिस्त - पालक आपल्या मुलांना शिस्त कशी शिकवतात, याचा मुलांच्या वागण्यावरही खूप परिणाम होतो. जेव्हा पालक जबरदस्तीने मुलावर दबाव टाकतात, तेव्हा मुलाचे वर्तन बदलू लागते आणि तो हळूहळू त्याच्या पालकांपासून दूर जाऊ लागतो. कडक शिस्तीखाली मुले अनेकदा आक्रमक होतात आणि याचा त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. समाजविरोधी असणे- शिकागो विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही समाजविरोधी पालक असाल, तर तुमच्या मुलांना ही वाईट सवय लागण्याची शक्यता आहे. मुले पालकांच्या त्याच सवयी स्वीकारतात आणि त्यांच्या असामाजिक असण्याचाही मुलांवर समान परिणाम होतो. यामुळे, मुलांचे सामाजिक कौशल्य बिघडते आणि ते कोणाशीही सामाजिक बनू शकत नाहीत. तणाव चांगल्या प्रकारे हाताळणे - पालक कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक दबावात कसे वागतात, ही मुले त्यांच्याकडून चांगले शिकतात. जर तुम्ही खूप लवकर अस्वस्थ व्हाल आणि बऱ्याचदा तणावाखाली असाल तर तुमचे मूल सुद्धा कोणत्याही प्रकारचा दबाव हाताळू शकणार नाही. अशा स्थितीत तो तुम्हाला असे करताना पाहतो आणि तसेच वागेल. रागाच्या भरात ओरडणे, उद्धटपणे बोलणे आणि वस्तुंची आदळाआपट करणे अशा गोष्टी मुले त्यांच्या पालकांकडून शिकतात. हे वाचा - Explainer: गेल्या 7 वर्षांत काँग्रेसमध्ये भलंमोठं खिंडार, 177 नेत्यांनी केला पक्षाला रामराम, कोण थांबवणार नेत्यांचं Outgoing मुले मोठी होतात, परंतु पालक नेहमीच त्यांच्यासाठी आदर्श असतात. पालकांनी आपल्या मुलांसमोर नेहमीच चांगले उदाहरण ठेवणे महत्वाचे आहे. तुमच्या काही वाईट सवयी मुलाचे आयुष्य कायमचे खराब करू शकतात. आपल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी लावा आणि चांगले पालक बनण्याचा प्रयत्न करा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Parents, Small baby

    पुढील बातम्या