मुंबई, 25 डिसेंबर: पपई (Papaya) हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. ते विविध गुणांनी परिपूर्ण आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी विशेषतः पपई खाण्याची शिफारस केली जाते. तुम्हालाही पपईचे अनेक फायदे माहीत असतीलच, पण तुम्हाला पपईच्या बियांचे फायदे माहीत आहेत का? काळ्या मिरीच्या दाण्यांसारख्या दिसणाऱ्या पपईच्या बिया आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. यामध्येही पपईप्रमाणेच औषधी गुणधर्मांचा खजिना आहे. नकळत आपण पपईच्या बिया निरुपयोगी म्हणून फेकतो, पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पपईच्या बिया पाहाल, तेव्हा या बातमीमुळे तुम्हाला त्याचे फायदे (Papaya Seed Benefits) नक्कीच आठवतील.
पपई हे जगभरात सर्वत्र मिळणारे फळ आहे. लिब्रेटच्या बातमीनुसार, अनेक संशोधनांमध्ये याची पुष्टी झाली आहे की पपईच्या बियांचं नियमित सेवन केल्यानं शरीराला खूप फायदा होतो. बिया असलेली आणि बिया नसलेली दोन्ही पपई बाजारात उपलब्ध आहेत, परंतु ज्या पपईच्या आत बिया असतात, ती अधिक फायदेशीर मानली जाते. आज आम्ही तुम्हाला पपईच्या बियांचे फायदे सांगत आहोत.
पपईच्या बियांचे फायदे
1. पचन (Digestion) - ज्याप्रमाणे पपई पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे, त्याच प्रकारे पपईच्या बिया देखील पचन सुधारण्यास मदत करतात. पचनाशी संबंधित समस्यांसाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पपईच्या बियांचा समावेश करू शकता.
2. यकृत (Liver) - पपईच्या बिया आपल्या यकृतासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. काही प्रकरणांमध्ये, लिव्हर सिरोसिसचा उपचार पपईच्या बियांनी केल्याचं देखील नोंदवला गेलं आहे. पपईच्या बिया तुम्ही कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. त्याची बारीक पूड करूनही खाता येते.
हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी
3. नैसर्गिक जन्म नियंत्रण - पपईच्या बिया नैसर्गिक गर्भनिरोधक म्हणून काम करतात. जर एखाद्या जोडप्याला गर्भधारणा (Natural Contraceptive) नको असेल आणि ती टाळण्यासाठी औषध घ्यायचे नसेल, तर पपईच्या बिया हा एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. तथापि, ते घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
4. मूत्रपिंड (Kidney) - जर तुम्हाला मूत्रपिंडांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर यासाठी पपईच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. यामुळं मूत्रपिंडे निरोगी राहण्यास मदत होते. मूत्रपिंडे निरोगी ठेवण्यासाठी पपईच्या 7 बिया दिवसातून 7 वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो. त्या चघळूनही खाता येतात.
हे वाचा - Kitchen Tips: मळलेलं पीठ जास्त काळ राहील एकदम मऊसूत; या सोप्या ट्रिक्स वापरून पहा
5. स्थूलपणा - वाढत्या स्थूलपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी पपईच्या बिया एक आरोग्यदायी पर्याय असू शकतात. पपईच्या बिया शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतात, असा पुरावा देणारे अनेक दाखले उपलब्ध आहेत.
6. डेंग्यू ताप – पपईच्या बिया खाल्ल्यानं डेंग्यूच्या तापातही आराम मिळतो. जर एखाद्याला डेंग्यू झाला आणि त्यानं पपईच्या बिया खाल्ल्या तर त्याच्या रक्तपेशींची वाढ झपाट्यानं होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips