पंडित नेहरुंच्या बहिणीलाही करायचं होतं मुस्लीम व्यक्तीशी लग्न पण...

पंडित नेहरुंच्या बहिणीलाही करायचं होतं मुस्लीम व्यक्तीशी लग्न पण...

विजयालक्ष्मी पंडित आणि सय्यद हुसेन यांना लग्न करायचं होतं पण कुटुंबियांच्या विरोधामुळे त्यांना लग्न करता आलं नाही. पण त्यांच्यात नेहमीच मैत्रीचे संबंध होते.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर: उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादसाठी नवीन कायदा करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या धर्मांतील व्यक्तींचं जबरदस्ती लग्न लावण्यात आलं तर ते कायद्याचा आधार घेऊ शकतील. पण इतिहास असं सांगतो की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण इतर धर्मातल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. परंतु दोघांच्याही घरातील लोकांनी याला विरोध केल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

तो मुलगा मुस्लिम होता. अतिशय हुशार, समृद्ध कुटुंबातील आणि शिकलेला हा मुलगा नंतर भारताचा राजदूतदेखील झाला. दोघांना लग्नदेखील करायचं होतं. परंतु विजयालक्ष्मी यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी या लग्नाला विरोध केला. अलाहाबादमध्ये राहणारं मोतीलाल नेहरू यांचं कुटुंब आधुनिक विचार आणि जीवनशैलीसाठी परिचित होतं. पण तरीही विजयालक्ष्मी यांच्या लग्नाला विरोधच झाला.

विजयालक्ष्मी पंडित सोव्हिएत रशियामध्ये भारताच्या पहिल्या राजदूत होत्या. त्यानंतर अमेरिकेतदेखील त्यांनी राजदूत म्हणून काम केलं. याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघातदेखील भारताच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. 18 ऑगस्ट 1900 ला अलाहाबादमध्ये त्यांच्या जन्म झाला. मोतीलाल नेहरू यांनी त्यांच्या मुस्लिम व्यक्तीबरोबरच्या लग्नाला नकार दिल्यानंतर त्यांचं लग्न 1921 मध्ये काठियावाडचे सुप्रसिद्ध वकील रणजीत सीताराम पंडित यांच्याशी झालं. त्यांचे पती देखील स्वातंत्र्याच्या लढाईत आघाडीवर होते.

मोतीलाल नेहरू यांच्या वृत्तपत्रात संपादक

विजयालक्ष्मी ज्या तरुणाच्या प्रेमात पडल्या होत्या त्याचं नाव सय्यद हुसेन असं होतं. मोतीलाल नेहरू यांनी त्यांच्या "इंडिपेंडेंट" या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांना अलाहाबादमध्ये बोलावले होते. महात्मा गांधींचीही यांच्याशी त्यांची जवळीक होती.  हुशार आणि प्रतिभावान व्यक्ती असलेल्या हुसेन यांचे जवाहरलाल नेहरू यांच्याशीदेखील चांगले संबंध होते.

विजयलक्ष्मी त्यांच्याकडे आकर्षित झाल्या

सय्यद हुसेन संपादकपदी आल्यानंतर "इंडिपेंडेंट" खूप चर्चेत आले. त्यांची हेडिंग खूप आकर्षक असायची. त्यावेळी विजयालक्ष्मी 19 वर्षांच्या होत्या. त्या दररोज वृत्तपत्र कार्यालयात येत असत. संपादनाचे काम त्या शिकण्याचा प्रयत्न करत असत. तर हुसेन हे 31 वर्षांचे होते. त्याचदरम्यान दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले.

हुसेन यांच्याशी लग्न करण्याची इच्छा होती

विजयालक्ष्मी हुसेन यांच्या प्रेमात पडल्या होत्या. सुरुवातीला हुसेन यांनी यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर ते देखील प्रेमात पडले. विजयलक्ष्मी या प्रेमाबद्दल खूप गंभीर होत्या. त्यांना हुसेन यांच्याशी लग्न करायचे होते. कुटुंबासमोर आपल्या प्रेमाबद्दल त्यांनी सांगितलं होतं.

हुसेन इंग्लंडला गेले

त्याचदरम्यान या दोघांचे अफेअर मीडियात देखील खूप चर्चिले गेले. 1920 मध्ये हुसेन यांनी अलाहाबाद सोडले. खिलापत आंदोलनाचा भाग म्हणून ते इंग्लंडला गेले. त्या ठिकाणीदेखील त्यांनी आपला स्वातंत्र्याचा लढा सुरूच ठेवला. लंडनमधील काँग्रेसच्या अधिकृत प्रकाशित होणाऱ्या मासिकाचे संपादकपद सांभाळले. त्यानंतर इंग्लंडहून ते अमेरिकेला गेले. त्या ठिकाणी 1946 पर्यंत ते राहिले.

हुसेन आणि विजयालक्ष्मी यांच्यात मैत्री कायम

नेहरू यांचे वैयक्तिक सचिव  एमओ मथाई यांनी आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, 1945 मध्ये हुसेन आणि विजयालक्ष्मी हे अमेरिकेत एकत्र  दिसले होते. भारत स्वत्रंत झाल्यानंतर नेहरूंनी हुसेन यांना इजिप्तचे पहिले राजदूत म्हणून नियुक्त केले होते. तर विजयालक्ष्मी यांना रशियाच्या राजदूत म्हणून नियुक्त केले होते.

हुसेन यांनी कधीही लग्न केले नाही

हुसेन यांनी कधीही लग्न केले नाही. इजिप्तमध्येदेखील त्यांच्या राहणीमानामुळे लोकं प्रभावित होतं. 1949 मध्ये त्यांना अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले. परंतु याचदरम्यान इजिप्तमधील हॉटेलमध्ये हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 28, 2020, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading