मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पाकिस्तानलाही चीनवर विश्वास नाही? मित्र असूनही चिनी लस घेण्याची भीती

पाकिस्तानलाही चीनवर विश्वास नाही? मित्र असूनही चिनी लस घेण्याची भीती

पाकिस्तानी (pakistan) नागरिक चीनची कोरोना लस (china corona vaccine) घ्यायला थेट नकार देत आहेत.

पाकिस्तानी (pakistan) नागरिक चीनची कोरोना लस (china corona vaccine) घ्यायला थेट नकार देत आहेत.

पाकिस्तानी (pakistan) नागरिक चीनची कोरोना लस (china corona vaccine) घ्यायला थेट नकार देत आहेत.

  • Published by:  Priya Lad
इस्लामाबाद, 09 नोव्हेंबर : काही देशांमध्ये कोरोनाव्हायरस (coronavirus) संक्रमणाची दुसरी लाट आली आहे. हिवाळ्यात हा धोका अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतेक देश आता लवकरात लवकर कोरोना लस (corona vaccine) आणण्यासाठी ट्रायल करत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे चीन (china). मात्र जगभरात कोरोना व्हायरस पसरण्यास चीनचा मोठा हात आहे असं मानणाऱ्या कित्येक देशांनी ही लस खरेदी करण्यास नकार दिला आहे. आता तर चीनचा जवळचा मित्र असलेल्या पाकिस्तानलाही (pakistan) चिनी लशीची (china corona vaccine) भीती वाटू लागली आहे. चीनची लस चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आणि त्यासाठी त्यांना आता लोकांची गरज लागणार आहे. क्लास नॅशनल टेस्टिंग अंतर्गत चीन अनेक देशांत कोरोना लशीच्या चाचण्या करत आहे. जानेवारी 2021 पर्यंत Ad5-nCoV ही लस सुमारे 40 हजार विदेशी लोकांना दिली जाणार आहे यामध्ये अर्जेंटिना, चिली मेक्सिको, सौदी अरेबिया, रशिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे. मात्र पाकिस्तानमधील लोक चीनकडून लस घेण्यास नकार देत आहेत. या चाचण्या स्वतःवर करून घेण्यासाठी कुठलेच लोक तयार होत नसल्याने चीनला या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. युरेशियन टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सोशल मीडियावर या लशीबाबत बऱ्याच अफवा पसरल्यामुळे कुठलंही रुग्णालये या लशीच्या चाचणीसाठी लोकांना भरती करून घेण्यासाठी तयार नाहीत. हे वाचा - तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत कोरोना लस 90% प्रभावी; याच महिन्यात मिळणार मंजुरी लशीबाबतीतचा एक भ्रम म्हणजे ही लस घेतलेल्या माणसाची भावी पिढी नपुंसक बनते किंवा अशक्तपणालाबळी पडावं लागतं.  या भीतीनंच कराची, लाहोर आणि इस्लामाबादमधील लोक या लशीचा भाग होण्यापासून दूर पळत आहेत. तसंच पाकिस्तानमध्ये तर सरळ सरळ ह्या गोष्टीसाठी नकारच दिला जात आहे. यापूर्वी पोलिओ लशीबाबतीतसुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यामुळेच पाकिस्तान हे जगातील निवडक देशांपैकी एक आहे जिथे अजूनही पोलिओ संपुष्टात आलेला नाही. अशाप्रकारे जगभरातील बरेच लोक लस घेण्याच्या विरोधात आहेत. त्यांना ॲंटी वॅक्सर्ससुद्धा म्हटलं जातं. त्यांचा असा विश्वास आहे की या जगाला लशीची गरजच नाही मानवी शरीर या अशा धोकादायक आजारांचा सामना करू शकतं. लस शरीराची प्रतिकारशक्ती कमी करते आणि त्यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात, असं त्यांना वाटतं. अगदी गरोदरपणात आईनं घेतलेल्या लशीवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले जातात. आईनं लस घेतल्यानं तिला होणाऱ्या बाळामध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते, असं त्यांना वाटतं. हे वाचा - आता सहजासहजी शरीरात घुसू शकणार नाही CORONA; शास्त्रज्ञांनी शोधला उपाय काही देशात लशीकरणाला इतक वरोध होत आहे ही लशीकरण मोहीम राबवण्यासाठी सरकारला कायदा लागू करावा लागला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशाच कायद्याअंतर्गत लशीकरण केलं जातं.
First published:

Tags: China, Corona vaccine

पुढील बातम्या