Home /News /lifestyle /

खतरनाक हजामत! कैचीऐवजी सुरा, हातोडा, काच आणि आग; हेअर कटिंगचा हा VIDEO पाहूनच फुटेल घाम

खतरनाक हजामत! कैचीऐवजी सुरा, हातोडा, काच आणि आग; हेअर कटिंगचा हा VIDEO पाहूनच फुटेल घाम

या बार्बरकडून (Barber) केस कापून (Hair cutting) घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त पैसे असणं पुरेसं नाही तर तुमच्याकडे तितकी हिंमतही असणं गरजेचं आहे.

    इस्लामाबाद, 18 मार्च : केस कशाने कापतात (Hair cutting) असं विचारलं तर अगदी लहान मूलही सांगेल की कैचीने. कोणत्याही सलूनमध्ये गेलात तरी तुमचे केस कैचीनेच कापले जातात. पण या सलूनमध्ये तुमचे केस कैचीने नाही तर चक्क सुरा, हातोडा आणि काचेच्या तुकड्याने कापले जातात. या सलूनमधून केस कापून घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त पैसे असणं पुरेसं नाही तर तुमच्याकडे तितकी हिंमतही असणं गरजेचं आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये हे सलून आहे. या सलूनमधील बार्बर अली अब्बास (Pakistan Lahor barber).  प्रत्येक बार्बरची केस कट (Hair cutting video) करण्याची आपलीच एक वेगळी स्टाइल असते. अली अब्बास देखील आपल्या  या हटके स्टाइलमुळेच फेमस आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अली अब्बाज जो खतरनाक पद्धतीने केस कापतो. त्याच्या हातात तुम्हाला कैची नाही तर हातोडा, चाकू दिसेल. व्हिडीओत पाहू शकता, अली काचेच्या तुकड्याने व्यक्तीच्या केसांची स्टाइल करतो आहे. एका ग्राहकावर त्याने हातोड्याचीही वापर केला आहे. हे वाचा - चिमुरड्यांच्या झोपाळ्यावर झुलता झुलता हवेत उंच गेले आजोबा आणि...; VIDEO VIRAL आता अशा बार्बरकडून केस कापून घ्यायचे म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखंच आहे. कोण बरं याच्याकडून केस कापून घेईल असंच तुम्हाला वाटेल. सुरुवातीला काही ग्राहक त्याच्याकडून केस कापून घ्यायला घाबरतात पण त्यानंतर मात्र ते बिनधास्तपणे त्याच्याकडूनच आपले केस कापून घेतात. अली अब्बास यांच्याकडून केस कापून घेण्यासाठी खूप जण येतात. केस कापताना तो कुणालाही दुखापत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. त्याची ही हटके स्टाईल अनेकांना आवडते. त्यांच्या हेअर कटिंगमुळे त्याचे ग्राहकही आनंदात असतात. हे वाचा - अजब! 5 इंच लांबीचं मधलं बोट असलेल्या मुलीचा VIDEO VIRAL पाकिस्तानी न्यूज चॅनेल ARY ने आपल्या यूट्युबवर अली अब्बासचा व्हिडीओ टाकला आहे. आपल्या क्षेत्रात काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, असं अलीने सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Pakistan, Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या