सोशल मीडिया स्टार पाकिस्तानी मुलगा भारती सिंहवर फिदा; म्हणाला, I Love You

सोशल मीडियावर फेमस असलेल्या पाकिस्तानी मुलानं (pakistan child) व्हिडीओ शेअर करत भारती सिंहवरील (bharti singh) आपलं प्रेम व्यक्त केलं, त्यावर भारतीनं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहा.

सोशल मीडियावर फेमस असलेल्या पाकिस्तानी मुलानं (pakistan child) व्हिडीओ शेअर करत भारती सिंहवरील (bharti singh) आपलं प्रेम व्यक्त केलं, त्यावर भारतीनं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहा.

 • Share this:
  मुंबई, 22 डिसेंबर : कॉमेडियन भारती सिंहनं  (Bharti Singh) एका पाकिस्तानी मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून भारती आपल्या प्रतिक्रिया देण्यापासून स्वतला रोखू शकली नाही. तिनं व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर लगेच प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातील हा क्युट मुलगा (Pakistan Cute Child) म्हणजे अहमद शाह (Ahmed Shah). हा तोच मुलगा ज्याने याआधी सोनू सूदसाठीही व्हिडीओ बनवला होता. अहमद शाह हा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे एवढ्या कमी वयात त्याचे स्वत:चे देखील जगभरात लाखो चाहते आहेत. जेवढं प्रेम त्याला पाकिस्तानातून मिळतं आहे तेवढचं प्रेम त्याला भारतातून देखील मिळतं. सोनू सूदनंतर त्याने आता भारती सिंहसाठीही व्हिडीओ बनवला आहे.
  अहमद शाह या व्हिडीओत म्हणतो, "नमस्कार भारती मॅम तुम्ही कशा आहे. मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो. अल्लाह तुम्हाला आनंदात ठेवो. आय लव्ह यू" अहमदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. भारतीनं हा व्हिडीओ पाहताच तिनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारती म्हणाली, "बेबी तुझ्यामुळे माझा दिवस सार्थकी लागला" हे वाचा - प्रतीक्षा संपली! 'जयललिता' कंगनाच्या थलायवी सिनेमात हा आहे MGR च्या भूमिकेत अहमदचा पहिला व्हिडीओ तेव्हा व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या स्कूल टीचरना धमकावत होता. मस्ती करणाऱ्या या मुलाकडून त्याची बॅग काढून घेतल्यावर अहमदला राग आला होता. अहमदचा हा अंदाज इतका क्यूट होता की त्याच्या शिक्षकाने त्याचा व्हिडीओ केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तो व्हायरल झाला होता. 'पिछे तो देखो...' हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्यावर आजवर अनेक मीम्स देखील बनवण्यात आले आहेत. त्यानंतर अहमद शाहचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्या भाषेतील गोडी, त्याच्या Cuteness सोशल मीडिया युजर्सच्या पसंतीस पडतो. सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जाते.
  सोनू सूदबाबत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. सोनूच्या कामाबाबत त्याने त्याचे कौतुक केलं होतं. अहमद शाह (Ahmed Shah) ने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं, 'हेलो सोनू सूद सर, तुम्ही कसे आहात, ठीक आहात? मी देखील ठीक आहे. मी अहमद शाह आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप सारे प्रेम. तुम्ही खूप चांगले काम करत आहात. आय लव्ह यू. खूश राहा.'
  Published by:Priya Lad
  First published: