मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Muscle Pain: हिवाळ्यात शरीराच्या या अवयवांमध्ये होतात सतत वेदना; हे उपाय ठरतील गुणकारी

Muscle Pain: हिवाळ्यात शरीराच्या या अवयवांमध्ये होतात सतत वेदना; हे उपाय ठरतील गुणकारी

या ऋतुत तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ सकस आहार घेणं आणि मजबूत प्रतिकारशक्ती असणं पुरेसं नाही, तर स्नायूंच्या आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. अवघडून बसणं किंवा वावरणं (बॅड पोस्चर - Bad posture) आणि व्यायाम न केल्यामुळं, तुम्हाला स्नायू दुखण्याची समस्या होऊ शकते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 डिसेंबर: हिवाळ्यात आपण अनेकदा हात, पाय, कंबर आणि पाठदुखीच्या समस्येनं त्रस्त होतो. तज्ज्ञांच्या मते, या ऋतुत तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ सकस आहार घेणं आणि मजबूत प्रतिकारशक्ती असणं पुरेसं नाही, तर स्नायूंच्या आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. अवघडून बसणं किंवा वावरणं (बॅड पोस्चर - Bad posture) आणि व्यायाम न केल्यामुळं, तुम्हाला स्नायू दुखण्याची समस्या होऊ शकते. हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. त्यामुळं काही गोष्टींची काळजी (Muscle Pain in Winter Season) घ्यावी. खांदा आणि मान दुखणं हिवाळ्यात, तुम्ही तुमचा बहुतेक वेळ घरी घालवता आणि कामाच्या ठिकाणी तासनतास एकाच स्थितीत बसता. खराब स्थितीमुळे मणक्याचं नुकसान होतं आणि हळूहळू तुमच्या शरीराची ठेवण बिघडते. यामुळं पाठ, खांदं आणि मान दुखू शकतात. नेहमी ताठ स्थितीत बसा आणि पाय जमिनीवर सपाट (upwards position) ठेवा. कामाच्या दरम्यान ब्रेक घेत राहा. टीव्ही पाहताना सोफ्यावर बसण्याऐवजी योगा बॉलचा वापर करा. दररोज 20 मिनिटं व्यायाम करा. यामुळं स्नायू सक्रिय राहण्यास मदत होईल. पाठदुखी पाठदुखीमुळे तुम्हाला चालण्यात आणि बसण्यात खूप त्रास होऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या आसनाची विशेष काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. व्यायाम अति प्रमाणात करू नका. या समस्येत योग आणि पोहण्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे स्नायूंची ताकद निर्माण होईल. जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका आणि मध्येच वेगवेगळ्या स्थितीत स्ट्रेचिंगचा व्यायाम करत रहा. यामुळं सांधे आणि स्नायू दुखण्यात आराम मिळेल. हे वाचा - Pro Kabaddi League : पहिल्याच दिवशी इतिहासातला महागडा खेळाडू मैदानात, असं आहे रेकॉर्ड! पाय आणि घोट्यात वेदना बसताना किंवा चालताना आपला पाय आणि घोट्यावर नेहमी ताण पडतो. खराब आसनामुळं घोट्यातही वेदना होऊ शकतात. यामुळं हाडं आणि अस्थिबंधन खराब होतात. नेहमी योग्य स्थितीत बसा आणि काही वेळ अशी क्रिया करणं टाळा, ज्यामुळं पायांवर ताण येतो. गुडघेदुखी गुडघेदुखी टाळण्यासाठी नियमित चालावं. तुम्ही स्ट्रेचिंगचे व्यायाम आरामात करू शकता. यामुळं लवचिकता सुधारेल आणि स्नायूंचा ताण कमी होईल. हे वाचा - Bedroom असतं शुक्राचं स्थान, तिथं चुकूनही ‘या’ गोष्टी ठेवू नका नाहीतर… हात आणि मनगटात वेदना हात आणि मनगटात दुखत असेल तर उभं राहताना, बसताना आणि चालताना खांदे शिथिल ठेवा. कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या आणि एका हातानं कीबोर्ड वापरणं टाळा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Winter, Winter session

    पुढील बातम्या