मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सेक्स करताना वेदना; काय आहेत कारणं आणि उपाय

सेक्स करताना वेदना; काय आहेत कारणं आणि उपाय

महिला आणि पुरुषांमध्ये वेदनांची कारणं वेगवेगळी आहेत.

महिला आणि पुरुषांमध्ये वेदनांची कारणं वेगवेगळी आहेत.

महिला आणि पुरुषांमध्ये वेदनांची कारणं वेगवेगळी आहेत.

  • myupchar
  • Last Updated :
संभोग करताना व्यक्तीला आनंदाची अनुभूती येते, पण अनेकदा अचानक होणाऱ्या वेदना आनंदावर विरजण घालतात. संभोग करताना होणाऱ्या वेदनांची अनेक करणं असू शकतात. ते कधी शरीरातील पाण्याच्या कमतरतेने होतात तर कधी संसर्गामुळे देखील होतात. महिला आणि पुरुषांमध्ये वेदनांची कारणं वेगवेगळी असू शकतात. संभोग करताना होणाऱ्या या वेदनांना वैद्यकीय भाषेत डिस्परेयुनिया असं म्हटलं जातं. जर संभोग करताना पोट किंवा गुप्तांगाच्या आसपास वेदना होत असतील तर त्याच्या मुळाशी जायला हवं. द जर्नल ऑफ पेनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, संभोग करताना वेदनांची तक्रार अधिकतर महिला करतात. याचं कारण म्हणजे शरीराची ठेवण, महिलांचं जननांग अधिक जटिल असतात. महिलांना अनेक कारणांनी संभोगानंतर वेदनादायक आखडण अनुभवायला येते. संभोगाच्या वेळी लिंग खूप आतपर्यंत जाणं, अंडाशयामध्ये गाठ असणं किंवा अल्सर, गर्भाशयात फाइब्रॉएड, अँडोमेट्रियोसिस, सूज, ओव्हॅल्युएशन इत्यादी कारणं असू शकतात. तर पुरुषांमध्ये वेदनेचं एकमेव कारण म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी सुजणं हे आहे. संभोगाच्या काळात किंवा नंतर होणाऱ्या वेदनेची सामान्य कारणं संभोग एक प्रकारचा व्यायाम आहे. हा व्यायाम जास्त वेळ केला तर शरीर थकतं आणि वेदना जाणवतात. या काळात स्नायूमध्ये ताण येतो. ह्या वेदना आपोआप ठीक पण होतात. पण जर असं वारंवार व्हायला लागलं तर मात्र डॉक्टरांना दाखवायला हवं. डिहायड्रेशन अथवा पचनसंबंधी समस्यापण वेदनेचे कारण बनतात. जेवणानंतर लगेच संभोग करू नये. लक्षात ठेवा शरीरात पाणी योग्य हवं. ज्यांचे पचन चांगले नसते त्यांना संभोग करताना वेदना होणं सामान्य आहे. अनेकदा मूत्रमार्गात संसर्ग झालेला असतो, हे संभोगाच्या वेळी होणाऱ्या वेदनांमुळे कळते. या संसर्गाला यूटीआई म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हटलं जातं. जर असं असेल तर संभोगाच्या आधी यूटीआयचा उपचार करून घ्यावा. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजेच एसटीडीमुळे सुद्धा वेदना होतात. संभोग, मुख मैथुन आणि इतर अंगाना स्पर्श केल्यानेसुद्धा लैंगिक रोगांचे संक्रमण (एसटीआय) होऊ शकतं. सुरक्षित संभोग केल्याने एसटीडीपासून बचाव करता येतो. कधी कधी संभोगाचे पूर्वानुभवपण वेदनेचे कारण ठरतात. अगदी रोजच्या जीवनातील तणाव, चिंता, शरीर संबंध ठेवतांना स्नायूंमध्ये येणारे तणाव, आखडणं हेदेखील वेदना होण्याची कारणं आहेत. myupchar.com च्या अनुसार, महिलांमध्ये योनीमधील कोरडेपणा वेदनेचं कारण ठरतो. रजोनिवृत्ती किंवा प्रसूतीनंतर ही समस्या जास्त जाणवते. ल्युब्रिकेंट्सचा वापर करून या समस्यांपासून वाचता येते. काही महिलांमधे जन्मता योनीमध्ये दोष असतो. त्यांची योनी पूर्ण विकसित झालेली नसते, त्यामुळे पुढे जाऊन त्यांना संभोग करताना वेदना होतात. पाळीच्या काळात संभोग करताना काही महिलांना वेदना होतात. तसेच गर्भावस्थेनंतर पण काहींना शरीर संबंध ठेवायला कठीण जातं. पण अशा घटनांमध्ये नंतर सर्व सामान्य होतं. नेहमीच वेदना होत असतील तर काय करावे जर वेदना स्नायूंच्या थकव्यासंबंधी असतील तर त्या थोड्या वेळात दूर होतात. पण अवयव पूर्णपणे विकसित न होणं, इतर संरचनात्मक कारणं किंवा संसर्गामुळे वेदना होत असतील तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. डॉक्टरांना आपल्या समस्या मनमोकळेपणे सांगायला हव्या. औषधांनी या समस्यांचे निवारण करता येते. या शिवाय समुपदेशन आणि सेक्स थेरेपीच्या सहाय्य्याने देखील उपचार करता येतात. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - लैंगिक शिक्षण आणि आरोग्य न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Health, Pain, Sexual relationship

पुढील बातम्या