Home /News /lifestyle /

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये होणार बदल; लिंगभेद करणारे हे शब्द काढले जाणार

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये होणार बदल; लिंगभेद करणारे हे शब्द काढले जाणार

जगभरातील सर्वात महत्त्वाची डिक्शनरी असलेल्या ऑक्सफर्डमध्ये (Oxford Dictionary) देखील महिलांसोबत असलेला भेदभाव दिसून आला. विरोधानंतर यामध्ये बदल करण्याचं काम सुरू आहे.

    मुंबई, 09 नोव्हेंबर: लैंगिक भेदभाव हा केवळ समाजापुरता मर्यादित नाही. पुस्तकांमध्ये देखील यासंदर्भातील काही उदाहरणे दिसून येतात. जगभरातील सर्वात महत्त्वाची डिक्शनरी असलेली ऑक्सफर्डमध्ये देखील महिलांसोबत असलेला भेदभाव दिसून आला. यामध्ये उदाहरण देताना महिलांना पुरुषांपेक्षा  कमी क्षमतेचं समजण्यात आलं असून हजारो लोकांनी याला विरोध केला आहे. त्यानंतर आता या डिक्शनरीमध्ये महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत.  भेदभावाविरोधात याचिका यामध्ये याचिकाकर्त्या मारिया बेट्रिस जियोनावार्डी यांनी 2019 पासून डिक्शनरीमध्ये होत असलेल्या स्त्री पुरुष भेदभावाविरोधात ऑनलाइन मोहीम सुरु केली होती. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये देण्यात आलेली उदाहरणं स्त्री-पुरुष भेदभावाचं सर्वांत मोठं उदाहरण आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या दाव्यात तथ्य देखील होते. सह्यांची मोहीम उदाहरणादाखल विचार करायचा झाल्यास नर्स किंवा सेक्रेटरीची भूमिका ही केवळ महिलांची दाखवली जाते. त्यामुळे या भूमिका केवळ महिलांच्याच आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. पण प्रत्यक्षात नर्स आणि सेक्रेटरीचं काम पुरुषही करतात. घरकामासंबंधी देखील महिलांचीच उदाहरणे दिली जातात. यामध्ये जवळपास 30 हजार नागरिकांनी सह्या केल्या. त्यामुळे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये अनेक शब्दांची परिभाषा बदलण्यात आली आहे. ट्रान्सजेंडरला मिळाली जागा ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनमध्ये आलेल्या माहितीनुसार ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली. मॅन, हाऊसवाईफ आणि हाय मेंटेनन्स सारख्या शब्दांचे अर्थ बदलले गेले आहेत. यामध्ये महिलांच्या कामाचा आवाकादेखील वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर ट्रान्स जेंडर्सनाही डिक्शनरीत स्थान देण्यात आलं आहे. याआधी महिलांना पुरूषांची प्रेमिका किंवा पत्नी दाखवण्यात म्हटलं गेलं होतं. परंतु आता पुरुषाच्या जागी पर्सन हा शब्द वापरण्यात येणार आहे. महिलादेखील शक्तिशाली आता अनेक सकारात्मक उदाहरणे देण्यात आली आहेत. यामध्ये शक्तीशाली महिला स्वत:च्या पैशांनी घर खरेदी करू शकतात. तसंच दोन मुलांचं कॉलेजपर्यंतचं शिक्षणदेखील पूर्ण करू शकतात. याआधी मालमत्तेची खरेदी आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पुरुषांकडे दाखवण्यात आली होती. त्यामुळे सध्या महिला देखील पुरुषांच्या बरोबर आहेत हा बदल डिक्शनरीत येणं गरजेचं आहे. मुलांच्या मनात शिकतानाच महिला आणि पुरुषांबाबत भेदभाव निर्माण होऊ नये म्हणून बदल करण्यात आले आहेत. तसेच महिलांप्रती वापरले जाणारे मेड आणि बिच हे शब्द देखील बदलण्यात आले आहेत. हो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत महिलेला  समानार्थी शब्द बिच म्हणजे चेटकी होता. त्यामुळे हे शब्द बदलल्याने मोठा फरक पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गुगलवरदेखील लागले आरोप सर्च इंजिन गुगलवर देखील लैंगिक भेदभाव करण्याचे आरोप लागले आहेत. बिच शब्द टाकल्यानंतर गुगलवर आसपासच्या जवळच्या गर्ल्स हॉस्टेलचा पत्ता दिसत असे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचबरोबर नर्स किंवा सेक्रेटरीची भूमिका ही केवळ महिलांची दाखवली जाते. तसेच ताकदवर कामेही पुरुषाची दाखवली जातात. गुगलने या आरोपांबाबत कधीही स्पष्टीकरण दिले नाही. पण काही बदल केले. जेंडर न्यूट्रलचे प्रयत्न लैंगिक भेदभाव कमी करण्याबरोबरच जेंडर न्यूट्रल मेकअप करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. यालाच जेंडरलेस मेकअप म्हटले जाते. उदाहरण म्हणजे सध्या परफ्युम महिला आणि पुरुषांसाठी वेगळे आहेत. त्यामुळे ही संकल्पना बदलण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या