Oxford च्या कोरोना लशीचा कसा होतोय परिणाम; ट्रायलबाबत समोर आली नवी माहिती

Oxford च्या कोरोना लशीचा कसा होतोय परिणाम; ट्रायलबाबत समोर आली नवी माहिती

ऑक्सफोर्डची कोरोना लस (oxford corona vaccine) दिल्यानंतर एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याची बातमी सप्टेंबरमध्ये आली होती. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात लशीचं ट्रायल थांबवण्यात आलं होतं, जे आता पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

  • Share this:

लंडन, 26 ऑक्टोबर : संपूर्ण जगाला आता ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीकडून (Oxford corona vaccine) आशा आहे. भारतातही या लशीचं ट्रायल सुरू आहे. सप्टेंबरमध्येच ही लस दिल्यानंतर एका व्यक्तीची तब्येत बिघडली होती आणि या लशीची चाचणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती. दरम्यान आता या लशीच्या ट्रायलबाबत नवी माहिती समोर येते आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) आणि अॅस्ट्राझेनका (AstraZeneca) कंपनीने तयार केलेली ही लस. या लशीत भारताच्या सीरम इन्स्टिट्युटचीही भागीदारी आहे. या लशीच्या परिणामाबाबत अॅस्ट्राझेनका कंपनीने माहिती दिली आहे. या लशीमुळे वयस्कर आणि तरुण दोन्ही वयोगटातील व्यक्तींच्या शरीरात प्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचं कंपनीनं सांगितलं.

ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या लशीमुळे प्रौढ व्यक्तींमध्ये कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज आणि टी-सेल्स विकसित झाले आहेत.  असं द फायनॅन्शियल टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.

अॅस्ट्राझेन्काच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितलं,  "वयस्कर आणि तरुणांमध्ये इम्युनोनेजेसिटी रिस्पॉन्स म्हणजे परिणामकारकता चांगली आहे आणि वयस्करांमध्ये रिअक्टोजेनेसिटी रिस्पॉन्स म्हणजे दुष्परिणामही कमी आहे. कोविड -19 ज्येष्ठांमध्ये अधिक प्रमाणात गंभीर होऊ शकतो त्यामुळे हा निष्कर्ष खूप दिलासादायक आहे. AZD1222 ही लस सुरक्षित आणि इम्युनोजनिसिटी आहे, याचा हा ठोस पुरावा असेल.

हे वाचा - तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

या संशोधनाची सविस्तर माहिती लवकरच एका क्लिनिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध केली जाईल असं फायनॅन्शियल टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे. त्यांनी प्रकाशनाचं नाव सांगितलेलं नाही. ब्रिटिश आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले, "लस अद्याप तयार झालेली नाही तरीही आम्ही तिच्या वितरणाची तयारी सुरू करत आहोत. 2021 च्या पहिल्या सहा महिन्यांत ही लस उपलब्ध होईल"

हे वाचा - लशीकरणाचा मार्ग खडतर ! कोरोना लस लोकांपर्यंत पोहोचवण्यात 'हे' अडथळे येणार

दरम्यान ही लस नोव्हेंबरमध्ये मिळण्यची शक्यता आहे. लंडनमधील रुग्णालयांना कोरोना लशीसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. द सनच्या बातमीचा हवाला देत रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे. रिपोर्टनुसार लवकरच रुग्णालयांना कोरोना लशीची पहिली बॅच पुरवली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

Published by: Priya Lad
First published: October 26, 2020, 7:43 PM IST

ताज्या बातम्या