सोशल मीडियावर पडिक असता? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

सोशल मीडियावर पडिक असता? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

सोशल मीडियावर सतत राहिलात तर डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल 70 टक्क्यांहून कमी होऊन जाईल.

  • Share this:

हार्वर्ड, 21 डिसेंबर : सोशल मीडिया (social media) जगभरातच जणू सगळ्यांचीच आता प्राथमिक गरज बनला आहे. 'फोमो' अर्थात फिअर ऑफ मिसिंग आऊट सारख्या समस्याही यामुळे उद्भवत आहेत. मात्र तरीही फेसबुक (Facebook) इन्स्टाग्राम (Instagram),  ट्विटरसारख्या (twitter), सोशल मीडियाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका रिसर्चच्या माध्यमातून मात्र युजर्सना एक गंभीर इशारा मिळालाय. तुम्ही जर दिवसरात्र ऑलनाइन असाल, तर बऱ्याच घातक गोष्टी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. 'जर्नल ऑफ क्लिनिकल अँड सोशल सायकॉलॉजी'नं हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटलंय, की सोशल मीडियाच्या व्यसनाचा अ‍ॅग्जायटी आणि डिप्रेशनशी थेट संबंध आहे. जास्त वापर केल्याने शरीरात कॉर्टीसॉल आणि अ‍ॅड्रीनॅलिनसारख्या संप्रेरकांची पातळी वाढते. ही तणाव वाढवणारी मुख्य संप्रेरकं आहेत.

हार्वर्ड मेडिकल स्कूलचं एक संशोधन सांगतं, की जेव्हा एखादा माणूस काम करताना स्क्रीनमध्ये जास्तच गुंतून पडतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या पापण्याची हालचाल 70 टक्क्यांहून अधिक कमी होऊन जाते. याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो.

हेल्थ मॅगझीन 'हेल्थलाइन'नं सोशल मीडियाच्या व्यसनापासून वाचण्याचे काही उपाय दिले आहेत. डिजीटल डिटॉक्सबाबत यात सांगितलंय. तो सोप्या पद्धतीनं कसा करता येऊ शकेल?

सोशल मीडिया मोबाइलवर नाही, तर संगणकावर वापरा

हा एक प्रभावी उपाय अमलात आणा. याशिवाय गरजेची नसलेली नोटिफिकेशन्स बंद करून ठेवा. त्यातून सतत फोन चेक करण्याच्या सवयीपासून स्वत:चा बचाव करता येईल.

रोजचा वेळ ठरवा

यातून तुम्ही स्वयंशिस्त लावू शकाल. त्यासाठी आधी आपला स्क्रीन टाइम समजून घ्या. वेळ ठरवून ती अचूक पाळण्याची सवय लावून घ्या. यातून तुमच्या कामाचाही दर्जा वाढेल.

काही नियम बनवा

नाश्ता आणि जेवणावेळी फोन कटाक्षानं लांब ठेवा. झोपताना मोबाइल हातापासून लांब असू द्या. आवडते खेळ खेळणं, दोस्तांसोबत वेळ घालवणं याचाही उपयोग होईल.

Published by: News18 Desk
First published: December 21, 2020, 11:17 PM IST

ताज्या बातम्या