Instagram Addicted असाल तर या आजारांना देताय निमंत्रण

Instagram Addicted असाल तर या आजारांना देताय निमंत्रण

सोशल मीडियाशिवाय आजची तरूण पिढी राहूच शकणार नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

  • Share this:

व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामशिवायही अशा अनेक सोशल साइट आहेत, ज्याच्यावरून फोटो, व्हिडीओ शेअर करणं, मेसेज करण्यासाठीचे अॅप वापरतात. या सोशल मीडियाशिवाय आजची तरूण पिढी राहूच शकणार नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण इन्स्टाग्राम तुमच्या शरीरासाठी किती घातक आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? जे सतत इन्स्टाग्राम अॅपवर सक्रिय असतात, त्यांना हे माहीत नाहीये की त्यांच्या नकळतच ते अनेक आजारपणांना आपलसं करत आहेत.

इन्स्टाग्राम आरोग्यासाठी आहे घातक-

काही दिवसांपूर्वी प्रत्येक अॅपच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावाची रेटिंग झाली. यात सर्वात घातक अॅप इन्स्टाग्रामला सांगण्यात आलं आहे. यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे इन्स्टाग्राम अॅप मुली आणि महिलांच्या बॉडी शेप आणि सुंदरतेला असुरक्षित बनवतं. इन्स्टाग्रामनंतर दुसऱ्या स्थानी सर्वात घातक अॅप कोणतं असेल तर ते आहे स्नॅपचॅट. याच्या उपयोगाचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. हे अॅप वापरल्यामुळे तरुणांना झोप लवकर येत नाही याशिवाय नैराश्यग्रस्त होतात.

मूल आई- वडिलांपासून दुरावतं-

इन्स्टाग्रामवर तरुण मंडळी प्रत्येक फोटो परफेक्ट दाखवण्याचे सर्व प्रयत्न करतात. त्यामुळे फोटो फिल्टर करण्यात त्यांना सर्वात जास्त वेळ लागतो. याचमुळे घरात अनेकदा जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर घालवण्यामुळे पालक आणि मुलांमध्ये वाद होतात. या सगळ्या प्रकारात मुलं आई- वडिलांपासून दूर जातात आणि मोबाइलला आपलंस करतात.

वास्तव आयुष्यात जगण्यापेक्षा काल्पनिक जीवनात जगायला लोकांना आवडतं- अनेकांना या गोष्टीचं गांभीर्य नाहीये की जर हे असंच चालत राहिलं तर आयुष्य जगणं कठीण होऊन जाईल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

यापुढे मोमोज खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार, कारण...

घरात चुकूनही आणू नका या गोष्टी, पैसा फिरवेल पाठ

रक्षाबंधन: बहिणीचं टिळा लावणं असतं आरोग्यदायी, वाचा हे 7 फायदे

तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जांभया येतात तर व्हा सावधान!

VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...

First published: August 15, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading