हर्बल टी घेणं चांगलं, पण सारखा प्याल तर होतील 'हे' दुष्परिणाम

हर्बल टी घेणं चांगलं, पण सारखा प्याल तर होतील 'हे' दुष्परिणाम

हल्ली हर्बल म्हणजे नैसर्गिक पदार्थ आहारात जास्त घेण्याकडे कल आहे. पण त्याचं सेवन करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

  • Share this:

मुंबई, 28 मे : हल्ली हर्बल म्हणजे नैसर्गिक पदार्थ आहारात जास्त घेण्याकडे कल आहे. अगदी हर्बल टी लोकप्रिय आहे. अनेक जण सकाळी हर्बल टीच घेतात. पण नुकत्याच कॅनडीयन मेडिकल असोसिएशन जनरलमध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनावरून हे पुढे आलंय की नैसर्गिक पदार्थांच्या अतिसेवनाचे साइड इफेक्ट्सही आहेत.  कॅनडामध्ये एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता, म्हणून हाॅस्पिटलमध्ये भरती केलं होतं. त्यावेळी तो हर्बल टी पित असल्याचं समोर आलं.

HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या

कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीत केलेल्या संशोधनात हर्बल प्राॅडक्टसचे साइड इफेक्ट्स समोर आलेत. नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेल्या चहाच्या अतिसेवनामुळे ब्लडप्रेशरबरोबर डोकेदुखी आणि छातीतही दुखू लागलं.

सरकार देतेय नोकरीच्या नव्या संधी, करतेय 'हे' बदल

कॅनडामध्ये 84 वर्षांच्या व्यक्ती हाॅस्पिटलमध्ये भरती झाले. ते नियमित liquorice root पासून तयार होणारा चहा पित असायचे. त्यांना सतत डोकेदुखी, थकवा, छातीत दुखणं हे सुरू झालं होतं. शिवाय उच्च रक्तदाबही होता.

कचऱ्यापासून व्यवसाय सुरू करून करतायत कोटींची कमाई, तुम्हालाही आहे संधी

त्यांना रोज 1-2 ग्लास हर्बल टी पिण्याची सवय होती. Liquorice tea हा मध्य पूर्व आणि युरोपात लोकप्रिय आहे. तो जास्त प्यायला जातो.  इजिप्तमध्येही तो जास्त प्यायला जातो.

या संशोधनातून हेही पुढे आलंय की हर्बल टी पिऊन हायपर टेंशनही जास्त होतं.

अर्थात, कुठल्याही पदार्थांचा अतिरेक वाईटच. अति सेवनाचा परिणाम हा नेहमी होतोच. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचं सेवन करताना त्याचा अतिरेक टाळला, तर उत्तमच.


VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: चुकीला माफी नाही, कठोर कारवाई करणार- गिरीश महाजन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या