Elec-widget

सावधान! तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपता? आजच बदला ही सवय

सावधान! तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपता? आजच बदला ही सवय

काही लोक असेही असतात ज्यांना कितीही झोप मिळाली तर ती अपुरीच असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, अतिरिक्त झोप घेण्याचे तोटे हे सर्वाधिक आहेत.

  • Share this:

निरोगी आयुष्यासाठी झोप फार महत्त्वाची आहे. योग्य झोप झाली की थकवा तर दूर होतोच शिवाय अनेक आजारांपासून आपण दूर होतो. सामान्यपणे दिवसाला सात ते आठ तासांची झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. पण अनेकदा व्यग्र वेळापत्रक आणि कामाच्या ताणामुळे लोक रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठावं लागत असल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. या सगळ्यात काही लोक असेही असतात ज्यांना कितीही झोप मिळाली तर ती अपुरीच असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, अतिरिक्त झोप घेण्याचे तोटे हे सर्वाधिक आहेत. याबद्दलच आज आपण अधिक माहिती घेऊ...

thehealthy.com या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या प्रिन्सटन यूनिवर्सिटीच्या रिपोर्टनुसार, Princeton Computational Memory Lab येथील एलीजाबेथ मॅकडेविट (Elizabeth McDevitt) या संशोधकाने सांगितले की, गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्याने वजन वाढतं. तसेच टाइप 2 मधुमेह आणि लठ्ठपणा हे दोन आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

एवढ्या तासांची झोप असावी-

झोप ही वयोमानानुसार घेतली जावी. जर तुमचं वय 50 ते 60 एवढं किंवा त्याहून जास्त आहे तर तुम्हाला सहा ते आठ तासांची गाढ झोप घेणं आवश्यक आहे. पण जर तुमचं वय 20 वर्ष किंवा त्याहून जास्त आहे तर तुम्हाला सात तासांची झोप घेतली पाहिजे. काहीवेळा तुम्ही एखाद्या गोष्टीवरून चिंतेत असतात तेव्हा वेळेवर झोपण्याची सवय बिघडते. याचा प्रकृतीवर फार वाईट परिणाम होतो. याचमुळे झोपही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे.

VIRAL VIDEO: या गावात दिसली सात तोंडी सापाची कात, लोकांनी वाहिलं हळद- कुंकू

Loading...

मेंदूशी निगडीत या 10 खोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल...

देशातील या शहरातील लोक देतात सर्वाधिक कर, जाणून घ्या मुंबईचं स्थान

हा 'Jeasus Shoes' काही मिनिटांत विकले गेले, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...