मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

धक्कादायक: दूषित हवा ठरतेय बाळांच्या मृत्यूचं कारण; आकडेवारी ऐकून थक्क व्हाल !

धक्कादायक: दूषित हवा ठरतेय बाळांच्या मृत्यूचं कारण; आकडेवारी ऐकून थक्क व्हाल !

आपल्या देशात नवजात अर्भकांचा मृत्यू होणं ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. दूषित हवा बाळांच्या मृत्यूचं कारण ठरत आहे. यू ग्लोबल स्टडीमधील अभ्यासातून समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत.

आपल्या देशात नवजात अर्भकांचा मृत्यू होणं ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. दूषित हवा बाळांच्या मृत्यूचं कारण ठरत आहे. यू ग्लोबल स्टडीमधील अभ्यासातून समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत.

आपल्या देशात नवजात अर्भकांचा मृत्यू होणं ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. दूषित हवा बाळांच्या मृत्यूचं कारण ठरत आहे. यू ग्लोबल स्टडीमधील अभ्यासातून समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 22 ऑक्टोबर: न्यू ग्लोबल स्टडीमध्ये नवजात बालकांसंबंधी महत्वाचा मुद्दा समोर आला आहे. या अभ्यासानुसार, बाहेरील आणि घरातील प्रदूषणाचा नवजात बालकांना सर्वात जास्त फटका बसत आहे. या प्रदूषणामध्ये असणाऱ्या particulate matter मुळे 2019 मध्ये जन्मल्यानंतर पहिल्या महिन्यात 1,16,000 भारतीय नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर या संशोधनात घरामधील प्रदूषणात घट झाली आहे. पण बाहेरील प्रदूषणामध्ये PM2.5 इतकी वाढ आढळून आली आहे. Global Air 2020 या रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार, यामधील निम्मे मृत्यू हे बाहेरील प्रदूषणामुळे झाले असून बाकीचे मृत्यू कोळशाचा वापर, लाकूड, आणि जनावरांच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवऱ्या स्वयंपाकासाठी वापरल्याने त्यातून तयार झालेल्या धुरामुळे झाले आहेत. 2019 मध्ये या प्रदूषणामुळे जवळपास 1 कोटी 67 लाख मृत्यू झाले आहेत. यामध्ये प्रदूषणाचा फटका बसल्याने हृदयविकाराचा झटका, डायबेटीस, यकृताचा कर्करोग, यकृताचे आजार आणि इतर नवीन आजार होऊन मृत्यू झाले आहेत. HEI ही अमेरिकेच्या Environmental Protection Agency, फाउंडेशन्स, उद्योग आणि डेव्हलपमेंट बँकेच्या आर्थिक पाठिंब्यावर काम करत असते. ही एक नॉन प्रॉफिट आणि स्वयंभू रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचं या रिपोर्टमध्ये हायलाईट करण्यात आलं आहे. सर्वात जास्त प्रदूषण असणाऱ्या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ या राष्ट्रांचा पहिल्या दहा देशांमध्ये समावेश आहे. 2010 ते 2019 दरम्यान या दहा देशांमध्ये प्रदूषणाची पातळी PM2.5 इतकी वाढली आहे. घरातील स्वयंपाकासाठी लाकडाचा आणि इतर गोष्टींचा वापर वाढल्याने 2010 पासून 5 कोटी नागरिकांना या प्रदूषणाचा फटका बसला आहे. परंतु आता पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये मोफत गॅस कनेक्शन देण्यात आल्याने प्रदूषणाच्या पातळीमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे. गरोदरपणातदेखील प्रदूषणापासून महिलांचं रक्षण गरजेचे आहे. यामुळे बालकांचा जन्म लवकर आणि कमी वजन असणं असे परिणाम दिसून येऊ शकतात. त्यामुळे या प्रदूषणाचा फटका बसल्याने या दोन्ही गोष्टींमध्ये नवजात बालकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. यामुळे सर्वात जास्त मृत्यू होत असून 2019 मध्ये 4,55,000 हजार मृत्यू झाले आहेत. या रिपोर्टमध्ये आलेली माहितीनुसार एकूण मृत्यूंपैकी जवळपास 21 टक्के मृत्यू हे घरातील प्रदूषणामुळे होतात. प्रदूषण आणि आरोग्यतज्ज्ञ कल्पना बालकृष्णन यांनी याविषयी चिंता व्यक्त करताना नवजात बालकांचा मृत्यू रोखणं आणि प्रदूषण रोखणं हे अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांसाठी महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे. केवळ जन्माला आल्यानंतर कमी वजन, मुदतीपूर्व जन्म आणि मुलाच्या वाढीतील तूट यांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच या असुरक्षित गटांसाठी काही आखणी करणंदेखील महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर The State of Global Air 2020 चा हा वार्षिक रिपोर्ट वॉशिंग्टन विद्यापीठातील  Institute for Health Metrics and Evaluation यांच्या मदतीने HEI ने डिझाईन केला आहे. तसेच द लॅन्सेट मधील इंटरनॅशनल मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या  Global Burden of Disease Study याचा आधार घेऊन तयार करण्यात आला आहे.
First published:

Tags: Air pollution, Small baby

पुढील बातम्या