Home /News /lifestyle /

Optical Illusion: या फोटोतला जो मार्ग निवडाल तो सांगेल तुमची पर्सनॅलिटी आणि भविष्य

Optical Illusion: या फोटोतला जो मार्ग निवडाल तो सांगेल तुमची पर्सनॅलिटी आणि भविष्य

खाली दिलेले जंगलातील रस्त्यांचे चार फोटो बघून तुम्हाला एकदम शांत-निवांत वाटेल. या चार रस्त्यांपैकी एका रस्त्याची निवड करण्यास सांगितलं तर तुम्ही कोणता मार्ग निवडाल? तुम्ही कोणता मार्ग निवडाल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात येऊ शकतं.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 27 मे : आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर (social media) अकाऊंट्स असतील. दिवसातील बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. काहींना तर जवळपास त्याचं व्यसन लागल्यासारखंच आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर असतात. कारण सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाईमपासचा (Time pass) मुख्य पर्याय बनला आहे. विविध प्रकारच्या गमतीशीर व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज् (Tricky Viral Photo), रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न या ठिकाणी व्हायरल होतात. आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोदेखील खूप चर्चेत आहेत. अशा फोटोंमध्ये आपल्याला पाहताक्षणी काय दिसतं किंवा सर्वांत अगोदर आपलं लक्ष कोणत्या फोटोकडे जातं, त्यावरून आपल्या पर्सनॅलिटीचा म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जातो. सध्या तर इंटरनेटवर अशा पर्सनॅलिटी फाईंडर ऑप्टिकल इल्युजन्सचा ट्रेंडच दिसत आहे. या ठिकाणीदेखील चार रस्त्यांचे फोटो देण्यात आले आहेत आणि त्यापैकी तुम्ही जो निवडाल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे लक्षात येईल. जागरण जोशनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आपल्या जीवनात कधीकधी अनेक पर्याय उपलब्ध होतात. पुढे जाण्यासाठी आपल्याला त्यापैकी एक पर्याय निवडणं आवश्यक असतं. अगदी लेखिका लैला गिफ्टी अकिता (Lailah Gifty Akita) यांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, 'तुम्हाला तुमचं नशीब आणि आयुष्याचा मार्ग (Life Path) स्वत:च निवडायचा असतो.' पण, काही वेळा आपण कोणता पर्याय निवडावा हे आपल्याला ठरवता येत नाही. खाली दिलेले जंगलातील रस्त्यांचे चार फोटो बघून तुम्हाला एकदम शांत-निवांत वाटेल. या चार रस्त्यांपैकी एका रस्त्याची निवड करण्यास सांगितलं तर तुम्ही कोणता मार्ग निवडाल? तुम्ही कोणता मार्ग निवडाल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात येऊ शकतं. फोटो क्रमांक 1 फोटोंमध्ये दिसणाऱ्या चार रस्त्यांपैकी जर तुम्ही पहिला रस्ता निवडला तर तुमचा स्वभाव मृदू आणि दयाळू (Kind Nature) आहे. तुम्हाला सौंदर्य आवडतं आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. जेव्हा तुमच्या आजूबाजूला आवडत्या गोष्टी असतात तेव्हा तुम्ही सर्वांत जास्त आनंदी असता. तुम्ही परंपरा (Traditions) आणि भूतकाळातील गोष्टींना महत्त्व देता. पहिल्या फोटोमधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर फुलं आहेत. याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला गोष्टींचा हळूवारपणे अनुभव घेणं आणि जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींचं कौतुक करणं आवडतं. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साहसीपणाची एक हलकी किनारही (Adventurous Streak) आहे. तुम्हाला बदल आवडतो. तुम्हाला काहीतरी नवीन अनुभवण्यास मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित आणि सुरक्षितता दोन्ही मिळेल. शांत राहण्‍याचा आणि स्‍वत:च्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्‍याचा प्रयत्‍न करा. तुमच्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. फोटो क्रमांक 2 तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या फोटोतील रस्ता निवडला तर याचा अर्थ तुम्हाला साहस, नवीन संवेदना आणि नवीन अनुभवांचा आनंद घेण्याची आवड आहे. तुम्ही धाडसी आहात आणि तुम्हाला खेळ खेळायला आवडत नाही. तुमचं व्यक्तिमत्व अतिशय मजबूत (Strong Personality) आहे. तुम्ही एखाद्याला वाईट वाटेल हा विचार न करता अगदी थेट आणि प्रामाणिकपणे बोलता. तुम्ही प्रामाणिक (Loyal) आणि विश्वासू (Trustworthy) आहात. तुमच्याकडून कधीही मित्राची दिशाभूल होणार नाही. तुम्हाला संकटात असलेल्या मित्रांना मदत करण्याची सवय आहे. तुम्ही खडकाळ मार्ग निवडला आहे. म्हणजेच तुम्हाला आव्हानांचा (challenges) आनंद घेण्याची आवड आहे आणि तुम्ही कोणत्याही लढाईला सामोरं जाण्यास तयार आहात. आयुष्यामध्ये सर्वोच्च ठिकाणी काहीतरी आपली वाट पाहत आहे याची तुम्हाला सतत जाणीव होत राहेत आणि तुम्ही नेहमी त्या गोष्टींसाठी प्रयत्न करता. नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करत राहा, तुम्ही निराश होणार नाही. तुमचा धाडसी (Courage) स्वभाव तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी प्रेरणा देणारा आहे. परंतु, तुमच्या स्वभावातील मृदू बाजूदेखील त्यांना बघू द्या. शेवटी तुम्ही माणूसच आहात आणि तुम्हाला दोघांची गरज आहे.

हे वाचा - Optical Illusion : तुमच्या प्रेमातला वीकनेस कोणता? 'या' चित्रावरून ओळखा!

रस्ता क्रमांक 3 तुम्ही तीसरा मार्ग निवडला आहे याचा अर्थ तुम्हाला तुमचा वेळ घ्यायला आवडतं. तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता. तुमच्यामध्ये प्रश्न विचारण्याची आणि त्यांची उत्तरं शोधण्याची धमक आहे. त्यामुळं कधी रस्ता चुकलात तर हरकत नाही. काही लोकांना शांततेची आणि अज्ञाताची भीती वाटते पण कधी कधी त्यातच तुमची भरभराट होते. तुम्ही जंगलातील मार्ग निवडला आहे. तुम्ही एक इंट्रोव्हर्ट (introvert) व्यक्ती आहात आणि तुम्हाला फिरण्याची आवड आहे. तुमच्यासाठी आयुष्य म्हणजे एक मोठं साहस आहे. तुम्ही त्यामार्गावर जाता पण तो शेवटी कुठे जात आहे हे दिसत नाही. म्हणून, एक स्पष्ट मार्ग तयार करण्याची वेळ आली आहे. तुमच्यासाठी तुमचा शांत स्वभाव (Quiet Energy) ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कधीकधी इतरांना देखील तुमच्यासोबत बोलवा. रस्ता क्रमांक 4 तुम्ही चौथ्या क्रमांकाचा मार्ग निवडला आहे म्हणजे, तुम्ही गंभीर आणि व्यावहारिक (Practical) नसून खेळकर, असामान्य आहात. समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनाचा ठाव (Unpredictable) घेता येता नाही. तुमची विनोदबुद्धी अतिशय चांगली आहे. तुमचं आयुष्य रंगीबेरंगी गोष्टींनी भरलेलं आहे. तुम्ही अद्वितीय आहात. तुमची पर्सनॅलिटी व्हायब्रंट (Vibrant Personality) आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्ही उत्साही आहात.
First published:

पुढील बातम्या