Osho Birthday : Sex ला समाधीचा मार्ग म्हणवणाऱ्या आचार्यांविषयी या गोष्टी माहीत आहेत का?

देश-विदेशात हजारो शिष्य असणाऱ्या आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचा 11 डिसेंबर हा जन्मदिवस. पुण्यातलं ओशो कम्युन आजही अनेकांचं आकर्षण ठरत आहे. काय आहे या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख? त्यांचे विचार आणि त्यांच्या गूढ मृत्यूविषयी माहिती...

देश-विदेशात हजारो शिष्य असणाऱ्या आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचा 11 डिसेंबर हा जन्मदिवस. पुण्यातलं ओशो कम्युन आजही अनेकांचं आकर्षण ठरत आहे. काय आहे या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख? त्यांचे विचार आणि त्यांच्या गूढ मृत्यूविषयी माहिती...

  • Share this:
    नवी दिल्ली,  11 डिसेंबर: संभोग से समाधी की ओर (From Sex to Superconsciousness) नावानं भाषणं देत पुस्तक लिहिणाऱ्या आणि आयुष्याविषयी, जीवनशैलीविषयी खूप वेगळ्या कल्पना मांडणाऱ्या आचार्य रजनीश (Rajneesh) उर्फ ओशो (Osho) यांचा 11 डिसेंबर हा जन्मदिवस. त्यांचा भारतातच नाही, तर जगभरात मोठा शिष्य समुदाय होता. आजही त्यांच्या मृत्यू पश्चात 30 वर्षं झाल्यानंतरही त्यांचे हजारो अनुयायी जगभर पसरलेले आहेत. पुण्यातलं ओशो कम्युन आजही अनेकांचं आकर्षण ठरत आहे. काय आहे या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख? जाणून घ्या ओशोंचं आयुष्य, त्यांचे विचार आणि त्यांच्या गूढ मृत्यूविषयी माहिती.. भारतातील सर्वात वादग्रस्त गुरूंमध्ये आचार्य रजनीश ओशोंचं (osho) नाव घेतलं जातं. भारताला मोठी संत परंपरा आहे. परंतु ओशो हे नेहमीच वादात राहिलेले धर्मगुरू होते. आपल्या विलक्षण चातुर्य बुद्धीने आणि वाणीने ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करत. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 ला मध्य प्रदेशातील कुचवाडामध्ये झाला. ‘संभोग से समाधी की ओर’ या त्यांच्या भाषणमालेने त्यांना वेगळीच ओळख मिळवून दिली.  ते अतिशय मोकळ्या विचारांचे आणि सेक्सचे समर्थन करणारे धर्मगुरू होते. ओशोंनी नेहमीच मुक्त सेक्सचं समर्थन केलं. त्यांच्या या मोकळ्या विचारांमुळे अनेकदा समाजाचा मोठा विरोध सहन करावा लागला. त्यांना सेक्स गुरु (Sex Guru) म्हणून देखील ओळखलं जात असे. पण त्यांना ही ओळख कधीच मान्य नव्हती. चंद्रमोहन होतं खरं नाव 1931 मध्ये जन्म झाल्यानंतर त्यांचं नाव चंद्रमोहन (Chandramohan Jain) ठेवण्यात आलं. बीबीसीने (BBC) या संदर्भात वृत्त दिले असून त्यांच्या Glimpses of a Golden Childhood या पुस्तकात त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे लहानपणापासूनच त्यांचा ओढा अध्यात्माकडे होता. ओशो यांचं जीवन   11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातल्या कुचवाडामध्ये रजनीश यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव चंद्रमोहन जैन असं होतं. लहान असल्यापासूनच त्यांना गूढ आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये ओढ वाटू लागली होती असं रजनीश यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीश जबलपूर विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करू लागले. त्यांनी विविध धर्मांवर आणि विचारप्रणालींवर प्रवचन देण्यासही सुरुवात केली. प्रवचनासोबतच त्यांनी ध्यानधारणा शिबिरंही घ्यायला सुरुवात केली. देशभरात त्यांचे अनुयायी वाढू लागले. त्यानंतर ते आचार्य रजनीश (Acharya Rajneesh) म्हणून प्रसिद्ध झाले. नोकरी सोडून घेतला संन्यास   अनुयायी वाढत असल्याचं लक्षात आल्यावर रजनीश यांनी नोकरी सोडून संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी धर्मगुरू म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुण्यातील कोरोगाव पार्क परिसरात स्वतःचा आश्रम सुरु केला. स्वतःत्यांनी ओशो हे नाव धारण केलं. कालांतराने या आश्रमाविषयी वाद झाल्यानंतर त्यांनी 80 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये त्यांनी स्वतःचं शहरच उभं केलं होतं. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास वादग्रस्त होता. ओरेगॉनमध्ये (oregon) त्यांच्या शिष्यांनी रजनीशपुरम नावाने एक शहरच उभारलं होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी देखील त्यांचा आश्रम कायम वादग्रस्त राहिला. या आश्रमात प्रत्येक अनुयायी महिन्याला 90 लोकांबरोबर सेक्स करत असे असं म्हटलं जायचं. परंतु त्यासंबंधी कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. गूढ मृत्यू पुण्यातल्या आश्रमात ओशो यांचं 19 जानेवारी 1990 ला निधन झालं. त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याची नोंद असली, तरी त्यावर एकमत नाही. त्यांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. त्यांचे अनुयायी त्यांचा पुनर्जन्म झाल्याचंही सांगतात. ओशोंच्या मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही त्यांच्या अचानक जाण्याचं कुठलंही ठोस कारण समोर आलेलं नाही. त्यांच्यावर विषप्रयोग झाला, अशीही वदंता आहे. पण कुठलंही कारण अद्याप सिद्ध होऊ शकलेलं नाही.
    First published: