ऑनलाइन खाणं ऑर्डर करताना सावधान! सॉफ्टवेअर इंजिनिअरचे 2.28 लाख झाले गायब

ऑनलाइन खाणं ऑर्डर करताना सावधान! सॉफ्टवेअर इंजिनिअरचे 2.28 लाख झाले गायब

Online food App वरून ऑर्डर करणं तुम्हाला पडू शकतं महाग. ऑनलाईन ऑर्डर करताना सावधान! कारण, सायबर हॅकर तुमच्यावर लक्ष ठेऊन आहेत. चार दिवसातली दुसरी फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : काही दिवसांपूर्वीच झोमॅटोवरून खाणं ऑर्डर केलं आणि PayTm द्वारे पैसे भरल्यानंतर एका छोट्याशा चुकीमुळे एका मुलीचे 80000 रुपये गायब झाले होते. हरियाणाच्या रोहतक शहरात ही ऑनलाईन फसवणुकीची ही घटना घडल्यानंतर आता त्याच पद्धतीची आणखी एक घटना उघड झाली आहे. एका हॅकरने ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यानंतर त्या कस्टमरचं अकाउंट हॅक करून 2.28 लाख रुपये चोरले. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यानंतर सव्वा दोन लाखांचा गंडा घातला. त्यामुळे ऑनलाईन खाणं ऑर्डर करताना सावधान! ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं तुम्हाला पडू शकतं महाग. फूड ऑर्डरिंग अ‍ॅपवरून खाणं ऑर्डर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, सायबर हॅकर तुमच्यावर लक्ष ठेऊन आहेत. हरियाणामधील घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भातली बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं साक्षीला पडलं महाग, चक्क 80 हजारांचा गंडा!

मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आहार नावाच्या अॅपवरून ऑनलाईन खाणं मागवल्यावर 2.28 लाखांची फसवणूक झाली. फूड डिलीव्हरी अ‍ॅपवरून खाणं ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर काही कारणाने तक्रार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच ही फसवणूक झाली.

रिफंडच्या मागणीमुळे झाली अडचण

हरयाणातल्या साक्षीबरोबर जे घडलं तेच इथे इंदौरमध्येही घडल्याचं लक्षात येतंय. साक्षीनं झोमॅटोवरून ऑर्डर केली होती. इंदौरच्या संजय दुबे यांनी आहार नावाच्या अॅपवरून ऑनलाईन खाणं ऑर्डर केलं. खाण्याची ऑर्डर केल्यानंतर इंजिनियरच्या लक्षात आलं की, पहिल्या काही ट्रान्झॅक्शनमुळे त्यांच्या खात्यामधून एकूण 280 रुपये वजा झाले होते. अकारण जास्तीचे पैसे कट झाल्याने त्यांनी पेमेंट गेट वेच्या कस्टमर केअरला फोन केला. आपल्याला या अधिकच्या रकमेचा रिफंड मिळावा याची त्यांनी मागणी केली.

अॅप डाऊनलोड करायला सांगितलं आणि...

कस्टमर केअरमध्ये तक्रार नोंदविल्यावर दोन दिवसांनी संजय यांना एक फोन आला. फोनवर तक्रार घेणाऱ्या व्यक्तीने तो स्वतः अधिकारी असल्याचं सांगितलं. आणि लवकरचं पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं.

मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? कशी घ्याल खबरदारी?

फोन केलेल्या अधिकाऱ्याने सर्व्हरमध्ये बिघाड असल्याचं कारण सांगत इंजिनियरला एक रिमोट डिवाइस कंट्रोल अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे संजय यांनी अ‍ॅप डाउनलोड केलं. कथित अधिकाऱ्याने त्या अ‍ॅपचे लॉगईन आयडी आणि डिटेल्स मागितले. नव्यानेच उघडलेलं अॅप असल्याने संजय यांनी ते डिटेल्स दिले. काही वेळाने मात्र सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या संजय यांना शंका आली आणि आपल्याकडून काही चूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी लगेच खात्यातला बॅलन्स चेक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या खात्याला धोका आहे असं लक्षात आल्यावर त्यांनी पैसे त्यांच्या पत्नीच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. पण, व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. ट्रान्झॅक्शन फेल असा मेसेज येत राहिला.

एकूण 15 ट्रान्झॅक्शनमध्ये झाली चोरी

झालेला प्रकार लक्षात आल्यावर संजय यांनी बॅंकेमध्ये फोन केला. खातं डिसेबल करण्यास सांगितलं आणि डेबिट कार्ड ब्लॉक करण्यास सांगितलं. बॅंकेने डेबिट कार्ड तर ब्लॉक केलं. पण नेट बँकिंग आणि खातं तसचं अ‍ॅक्टिव्ह राहू दिलं. दुसऱ्या दिवशी बॅंक खात्यामधून 15 ट्रान्झॅक्शन होऊन एकूण 2.28 लाख रुपये चोरी झाल्याचं उघडकीस आलं.

चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारे 80000 झाले होते लंपास

चार दिवसांपूर्वी साक्षी नावाच्या विद्यार्थिनीच्या बाबतीच अशीच घटना घडली होती. झोमॅटोवरून मागवलेलं खाणं चांगलं नसल्याने तिने तक्रार करण्यासाठी झोमॅटोच्या कस्टमर केअरचा नंबर Google वरून शोधला. आणि त्या फोनवर रिफंडची मागणी केली. कस्टमर केअरचा अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या त्या फोनवरच्या व्यक्तीने पैसे रिफंड होत आहेत त्यामुळे फोन चालू ठेवण्यास सांगितला. यावर विश्वास ठेवत सांगितल्याप्रमाणे तिने फोन चालूच ठेवला आणि त्याने मागितलेले डिटेल्स दिले. मात्र, लगेचच तिला एका मागोमाग एक बॅंक खात्याच्या ट्रानझॅक्शनचे मेसेज येण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांतच तिच्या खात्यातील 80 हजार रुपये गेले.

---------------------------------------------------

VIDEO: पुण्यात जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या