डायबेटिज आणि हृदयाच्या समस्यांना दूर ठेवेल हा ज्युस, संशोधकांचा दावा

डायबेटिज आणि हृदयाच्या समस्यांना दूर ठेवेल हा ज्युस, संशोधकांचा दावा

संत्र्याचा ज्युस (Orange juice) प्यायल्याने वजन कमी होतं, शिवाय वाढलेल्या वजनामुळे बळावणाऱ्या समस्याही दूर होतात, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

ओटावा, 07 मार्च :  वाढतं वजन (weight), डायबेटिज (dibeties) आणि हार्ट प्रॉब्लेम (heart problem) या आजारांनी सध्या अनेकांना ग्रासलं आहे. मात्र या समस्यांना आता दूर ठेवणार तो म्हणजे संत्र्यांचा ज्युस (orange juice). हा ज्युस प्यायल्याने वजन कमी होतं, शिवाय वाढलेल्या वजनामुळे बळावणाऱ्या समस्याही दूर होतात, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

दिवसाला दोन ते अडीच ग्लास संत्र्याचा ज्युस प्यायल्याने वजन कमी होऊ शकतं आणि त्यासोबतच हृदयाच्या समस्या आणि डायबेटिजचा धोकाही कमी होतो. कॅनडातील वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या (Western University) संशोधकांनी हा अभ्यास केला. लिपिड रिसर्च जर्नलमध्ये (Journal of Lipid Research) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हे वाचा - दररोज दूध पिताय सावधान ! हाडं मजबूत ठेवणाऱ्या दुधामुळे होतोय जीवघेणा आजार

संशोधकांच्या मते, संत्र्यामध्ये नोबिलेटिन (Nobiletin) हा घटक असतो, जो वजन कमी करण्यात आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांपासून मुक्ती देण्यात मदत करतो.

संशोधकांनी वजन जास्त असलेल्या उंदरावर प्रयोग करून पाहिला. एका उंदराला हाय फॅट, हाय कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांसह नोबिलेटिन दिलं तर दुसऱ्या उंदराला फक्त हाय फॅट, हाय कोलेस्ट्रॉलयुक्त अन्न दिलं गेल त्यांचं वजन कमी झालं. ज्या उंदाराला नोबिलेटिन दिलं गेलं त्याचं वजन नोबिलेटिन न दिलेल्या उंदारापेक्षा कमी झाल्याचं दिसलं. शिवाय त्याच्यातील इन्सुलिन प्रतिरोध आणि रक्तातील फॅटची पातळीही कमी झाली.

हे वाचा - Cooking oil चा तुमच्या आरोग्यावर होतो परिणाम, तुम्ही योग्य तेल वापरताय ना?

त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल, डायबेटिज आणि हृदयाच्या समस्यांना दूर ठेवायचं असेल, तर संत्र्याचा ज्युस प्या. मात्र त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

First published: March 7, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या