मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /साखर खाऊ शकत नाही म्हणू गोड खाण्याची इच्छा मारू नका; तुमच्यासाठी आहेत 5 पर्याय

साखर खाऊ शकत नाही म्हणू गोड खाण्याची इच्छा मारू नका; तुमच्यासाठी आहेत 5 पर्याय

मीठ आणि साखर बदलत्या वातावरणामुळे लवकर खराब होतात.

मीठ आणि साखर बदलत्या वातावरणामुळे लवकर खराब होतात.

पांढऱ्या साखरेपासून (White Sugar) बनलेले कोणतेही पदार्थ म्हणजे अतिरिक्त कॅलरीज आणि शून्य पोषणमूल्य. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

मुंबई, 06 जानेवारी : आनंदाची घटना घडली, धार्मिक कार्यक्रम, सण समारंभ असले की आपल्या देशातील घरात काहीतरी गोड (Sweet) पदार्थ असलाच पाहिजे, पंचपक्वानांचे भोजन असले पाहिजे अशी आपली संस्कृती आहे. अनेकांना जेवल्यावर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. त्यामुळे आपल्याकडे साखरेचा (White Sugar) वापर मोठ्या प्रमाणात होतो. ही साखर आपल्या पोटात जाते त्यातील कॅलरीज (Calories) म्हणजे उष्मांकामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

पांढऱ्या साखरेपासून बनलेले कोणतेही पदार्थ म्हणजे अतिरिक्त कॅलरीज आणि शून्य पोषणमूल्य. अशा पदार्थांचं सेवन म्हणजे उच्च रक्तदाब(High Blood pressure), वजन वाढणे (Weight), डोकेदुखी (Headache), दाताचे दुखणे, अशा आरोग्याच्या अनेक तक्रारींना आमंत्रण. त्यातून मधुमेह (Diabetes), कर्करोग (Cancer)असे घातक आजारही होऊ शकतात. त्यामुळे साखर खाणं बंद करणं किंवा साखरेच्या आरोग्यदायी पर्यायांचा वापर करणं आरोग्यासाठी हितावह ठरू शकते. साखरेला वेगळे पर्याय आहेत. त्याचा वापर करून तुम्ही गोड पदार्थ करू शकता.

मध (Honey) : भारतीय संस्कृतीत औषधोपचारात मधाचा वापर पूर्वापार केला जात आहे. यामध्ये फ्रुक्टोजची पातळी अधिक असते, रिफाईन्ड साखरेपेक्षा याची गोडी अधिक असते. त्यामुळे मध घालून पदार्थ बनवताना त्याचं प्रमाण कमी ठेवावं लागतं. मध चहात घालता येतं, टोस्टवर लावता येतं. मधात फ्लेवोनाईड असतं म्हणजेच यात अँटी ऑक्सिड्न्टसचं प्रमाण अधिक असतं. यात अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. मधानं रक्तातील साखरेची पातळी वाढते त्यामुळं मधुमेही लोकांसाठी हा योग्य पर्याय नाही.

हे वाचा - जेवताना तुम्हीही करता का या चुका? होऊ शकतात गंभीर परिणाम

डेट शुगर (Date Sugar) :  डेट शुगर म्हणजे खजुरापासून बनवलेली साखर. सुकलेल्या खजुरावर प्रक्रिया करून ही साखर बनवली जाते. यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिड्न्टस आणि फायबर असतात. त्यामुळे बाईन्डिन्ग आणि मिश्रण करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळं ही साखर स्मूदी तसंच कुकीज बनवण्यासाठी वापरली जाते. बेकिंग करण्याचे पदार्थ, केक यामध्ये खजूर सिरप एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

कोकोनट शुगर (Coconut Sugar) :  नारळापासून बनवलेली ही साखर असते. यामध्ये नारळाला एक चीर पाडून तो बाष्पीकरण करण्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर क्रिस्टलायझेशन प्रक्रिया करून ही साखर बनवली जाते. याला स्वतःची नैसर्गिक चव, स्वाद असतो. त्यामुळे कोणत्याही पक्वानाला एक वेगळा स्वाद येतो. ही साखर चहा-कॉफीत घालता येते. वॅफल, पॅनकेकवर हिचा वापर केला जातो. यात इन्श्युलीन फायबर असते. त्यामुळं आतड्यांच्या स्वास्थ्यासाठी ही साखर चांगली असते. नारळातील पोषक घटक यात असल्यानं ही साखर आरोग्यासाठी उत्तम ठरते.

हे वाचा - वाढत्या वजनाला रोखण्यासाठी जिरे ठरतील प्रभावी, जाणून घ्या 5 कारणं

गूळ (Jaggery): गूळ हे साखरेचं प्राथमिक स्वरूप मानलं जातं. रिफाईन रुपात नसल्यानं यात व्हिटॅमिन, खनिज, आयर्न आणि अँटी ऑक्सिड्न्टसचा मोठा स्रोत मानला जातो. जेवणानंतर गुळाचा छोटासा खडा खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते. अशक्त, रक्त कमी असणाऱ्या लोकांसाठी गूळ उत्तम मानलं जातं. गुळानं हिमोग्लोबिन वाढतं. गुळापासून हलवा, पोळी, लाडू, चिक्की असे अनेक पदार्थ बनवले जातात. थंडीच्या दिवसात गूळ खाणं फायदेकारक मानलं जातं. सर्दी, खोकला, फ्लूवर गुळाचा चांगला उपयोग होतो.

First published:

Tags: Health, Lifestyle, Sugar