Home /News /lifestyle /

Optical Illusion: चेहऱ्यावरून जाणून घ्या तुमच्या व्यक्तिमत्वातली ‘ही’ गोष्ट

Optical Illusion: चेहऱ्यावरून जाणून घ्या तुमच्या व्यक्तिमत्वातली ‘ही’ गोष्ट

ऑप्टिकल इल्युजनचे भौतिक (Physical), शारीरिक (Physiological) आणि आकलनात्मक म्हणजेच कॉग्निटिव्ह (Cognitive) असे प्रकार आहेत. या ऑप्टिकल इल्युजन्समुळे तुमच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो त्यामुळे हे ऑप्टिकल इल्युजन्स (Optical Illusions) मनोवनिश्लेषणासाठीही (Psychoanalysis) वापरले जातात.

पुढे वाचा ...
मुंबई, 03 जुलै:  आपल्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी मानसशास्त्रामध्ये विविध प्रकारचे सिद्धांत आहेत. काही सिद्धांत, थिअरीज वापरून मानसशास्त्रज्ञ अनेक प्रयोगही करतात. ऑप्टिकल इल्युजन हा त्यापैकीच एक आहे असं म्हणावं लागेल. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एखाद्या वस्तू किंवा चित्र किंवा फोटोने मानवी मनानी केलेले विश्लेषण आहे. हे चित्र, वस्तू किंवा फोटो वेगवेगळ्या स्वरुपात असतं आणि ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ऑप्टिकल इल्युजनचे भौतिक (Physical), शारीरिक (Physiological) आणि आकलनात्मक म्हणजेच कॉग्निटिव्ह (Cognitive) असे प्रकार आहेत. या ऑप्टिकल इल्युजन्समुळे तुमच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो त्यामुळे हे ऑप्टिकल इल्युजन्स (Optical Illusions) मनोवनिश्लेषणासाठीही (Psychoanalysis) वापरले जातात. विविध प्रकारचे Optical Illusion आपल्याला विविध गोष्टी सांगतात. आपण आनंदी आहोत का दु:खी, आपल्याला कशामुळे एकटेपणा वाटतो, आपल्याला एखाद्या नात्यातून काय हवं असतं, अशा अनेक गोष्टी Optical Illusions मधून समोर येतात. अशाच प्रकारचं अत्यंत वेगळं Optical Illusion दर्शवणारी एक Optical Illusion Image म्हणजेच चित्र आर्टिस्ट ऑलेग शुपिलक याने तयार केली होती. जागरण जोशच्या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. तुम्ही या चित्रातील जे चेहरे सगळ्यात आधी पाहता त्यातून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे स्पष्ट होतं. वरच्या चित्रात एक म्हातारा माणूस आणि एक मोठा लाल पडदा दिसतो. त्यावरून आपल्याला आपल्या रोमँटिक जोडीदाराबद्दल खरोखरंच काय वाटतं याबद्दलच्या मनातील भावना समजू शकतात. आर्टिस्ट ऑलेग शपिलाक याने ही ऑप्टिकल इमेज तयार केली आहे. तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला सगळ्यांत कमी आकर्षित करणारी गोष्ट कोणती ही गुप्त गोष्टही या इमेजवरून समजू शकते. या प्रत्येक समजुतीमागे नेमका काय अर्थ आहे जाणून घेऊया. या optical illusion मध्ये तुम्हाला किती चेहरे दिसतात? हे optical illusion म्हणजे एक प्रकारची व्यक्तिमत्व चाचणी (Personality Test) आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या व्यक्तिमत्वातील कोणत्या गोष्टी आकर्षित करत नाहीत हे स्पष्ट होतं. या optical illusion मधील तुम्ही पाहू शकणारे चेहरे आणि गोष्टी खालीलप्रमाणे -

1. प्रोफाइलमधील माणसाचा चेहरा

2. लाल पडदा

3. रागावलेला माणूस

4. गुडघ्यावर बसलेला माणूस

या इमेजमध्ये सगळ्यात आधी तुम्ही कोणती माणसं पाहू शकता त्यावरून तुमच्या जोडीदाराची कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नाही हे स्पष्ट होतं. 1. लाल पडदा- नाटकी व्यक्तिमत्वाचा तिरस्कार (The red curtain) जर या optical illusion मधील लाल पडदा तुम्हाला ससगळ्यांत आधी दिसला तर त्याचा अर्थ अत्यंत नाट्यमय परिस्थितीत असताना तुमचा जोडीदार घेत असलेली भूमिका तुम्हाला अजिबात आवडत नाही. म्हणजेच त्यावेळच्या त्याच्या भूमिकेचा तुम्ही गुप्तपणे तिरस्कारच करता. तुमचा जोडीदार कशाप्रकारे लक्ष वेधून घेतो आणि आजूबाजूच्या लोकांचं मनोरंजन करतो हे तुम्हाला कदाचित सुरुवातीच्या काळात आवडत असेल. पण जेव्हा तुमच्यात वाद होतात तेव्हा हेच आकर्षण तुमच्यासाठी उलट विषारीही ठरू शकतं. त्यावेळेस तुमच्या जोडीदाराची भूमिका तुम्हाला अजिबात आवडत नाही. 2. प्रोफाईलमधील माणसाचा चेहरा: हट्टी व्यक्तिमत्त्वाचा तिरस्कार (The man's face in profile) जर हे optical illusion पाहिल्याबरोबर तुम्हाला प्रोफाईलमधील माणसाचा चेहरा दिसला तर त्याचा अर्थ तुमच्या जोडीदारामधील हट्टीपणा किंवा ताठरपणा तुम्हाला अजिबात आवडत नाही. म्हणजेच प्रेमात असताना तुम्हाला तुमच्या जोडीदारामधील हट्टीपणा किंवा अजिबात जुळवून न घेण्याचा स्वभाव सगळ्यांत कमी आकर्षित करतो, असा याचा अर्थ होतो. एखादा कठोर किंवा आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीबरोबर राहणं तुम्हाला आवडतं. पण एखाद्याने सांगूनही जर त्यांनी जुळवून घ्यायला नकार दिला किंवा ते त्यांच्याच भूमिकेवर ठाम राहिले तर मात्र तुम्हाला ते अजिबात पटत नाही. त्यांची भूमिका चुकीची किंवा अयोग्य असेल तर ते तुम्ही अजिबात स्वीकारू शकत नाही. 3.रागावलेला माणूस : पटकन राग येणाऱ्या व्यक्तिमत्वाचा तिरस्कार (The Angry Man: Hate Short-tempered Personality Trait) जर या optical illusion image मधील रागावलेला माणूस जर तुम्हाला सगळ्यांत आधी दिसला तर याचा अर्थ पटकन रागावणारी व्यक्ती तुम्हाला अजिबात आकर्षित करत नाही. म्हणजेच तुम्ही प्रेम करत असलेल्या जोडीदाराचा स्वभाव जर पट्कन राग येणारा असेल तुम्ही त्या गोष्टीचा गुप्तपणे तिरस्कारच करता. अत्यंत उत्कट व्यक्तिमत्वाचे लोक तुम्हाला आवडतात, तुमचा जोडीदारही अशापैकीच एक असतो याच शंका नाही. पण त्याना रागही फार पटकन येतो.

4. गुडघ्यावर बसलेला माणूस: गरजू व्यक्तिमत्वाचा तिरस्कार (The man on his knees: Hate Neediness Personality Trait)

जर या optical illusion मध्ये गुडघ्यावर बसलेला माणूस तुम्हाला सगळ्यांत आधी दिसला तर गरज ही तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत सगळ्यांत कमी आकर्षित करणारी गोष्ट वाटते, असं स्पष्ट होतं. तुम्हाला तुम्ही कोणीतरी विशेष आहात हे जाणवून देणं खूप आवडतं, पण कधीकधी हे लक्ष वेधून घेणं खूप जास्त थकवणारं आणि गुदमरून टाकणारंही ठरू शकतं. Optical illusions नेहमीच आपला मेंदू कशाप्रकारे काम करतो याबद्दल काहीतरी अशा अत्यंत वेगळे दृष्टीकोन देते. रंग, प्रकाश आणि विविध प्रकारचे नमुने यांची काही विशिष्ट प्रकारची संगती असेल तर त्यातून आपल्या मेंदूला चालना मिळते आणि अनेकदा तिथे प्रत्यक्षात नसलेली गोष्टही आपल्याला प्रत्यक्ष असल्यासारखी वाटते. त्यामुळे तुम्हाला या Optical illusions मधील कोणता चेहरा सगळ्यांत आधी दिसतो ते त्याचा विचार करा.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या