मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Optical Illusion : पार्टीतल्या पाहुण्यांमध्ये लपलंय एक भूत; 10 सेकंदांत दाखवा शोधून

Optical Illusion : पार्टीतल्या पाहुण्यांमध्ये लपलंय एक भूत; 10 सेकंदांत दाखवा शोधून

Optical Illusion

Optical Illusion

हे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही. पार्टीतले सगळेच पाहुणे छान तयार होऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यापैकी कोण भूत आहे हे ओळखता येणं अवघड आहे

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 27 मार्च :   काही फोटो किंवा चित्रं नजरेला फसवणारी असतात. एकसारखी नक्षी, रंगसंगती आणि आकार यांच्या माध्यमातून दृष्टिभ्रम अर्थात Optical Illusion तयार करण्यात आलेलं असतं. या चित्रांमध्ये लपलेली गोष्ट शोधण्यासाठी बुद्धी आणि नजरेचा ताळमेळ बसवावा लागतो. बरेचदा आपल्या डोळ्यांसमोर फसवी प्रतिमा तयार केलेली असते. त्यामुळे उत्तर समोर असूनही सापडत नाही. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या आताच्या चित्रामध्येही असंच काहीसं आहे. एका पार्टीमध्ये उभ्या असलेल्या काही जणांचं हे चित्र आहे. त्या लोकांमध्ये एक भूतही आहे. ते 10 सेकंदांमध्ये शोधण्याचं काम वाचकांना करायचं आहे.

  ऑप्टिकल इल्युजनच्या या कोड्यामध्ये पार्टीतल्या व्यक्तींमध्ये लपलेलं भूत शोधण्याचं आव्हान आहे. या कोड्याचं उत्तर शोधताना तुम्ही कसं निरीक्षण करता हेही दिसून येईल. Bright Side ने हे चित्र शेअर केलं आहे. पार्टीसाठी काही पुरुष व काही स्त्रिया आलेल्या आहेत, असं चित्रात दिसत आहे. सर्वच जण छान तयार होऊन आलेले आहेत. पार्टी छान सुरू आहे, असं दिसतंय; मात्र त्यांच्यातच एक भूत लपलंय हे बहुधा त्यांना माहीत नसावं. कारण भुतानंही त्यांच्यासारखेच पार्टीचे कपडे घातले आहेत किंवा कदाचित भूत त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी लपलं असेल. म्हणूनच तुम्हाला 10 सेकंदांमध्ये हे कोडं सोडवायचं आहे.

  हेही वाचा - Hair Care : पातळ केसांसाठी या 5 पद्धतींनी वापरा कांद्या, काही दिवसात केस होतील दाट आणि मजबूत

  हे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही. पार्टीतले सगळेच पाहुणे छान तयार होऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यापैकी कोण भूत आहे हे ओळखता येणं अवघड आहे; मात्र तुम्हाला ते शोधणं अवघड वाटत असेल, तर सगळ्या पाहुण्यांच्या पायांचं निरीक्षण करा. कदाचित भूत कुठे आहे, हे समजू शकेल. तरीसुद्धा भूत सापडलं नाही, तर सोबत दिलेल्या चित्रामध्ये पाहा. डाव्या बाजूच्या दुसऱ्या महिलेचे पाय इतरांपेक्षा वेगळे दिसत आहेत. तेच भूत आहे. चित्र पाहिल्यास उत्तर स्पष्टपणे समजेल.

  ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम तयार करणं हे तितकं सोपं नाही. तसंच ते सोडवणंही खूप अवघड असतं. मेंदूच्या विकासासाठी हा खूप चांगला सराव असतो. एखादी गोष्ट खरोखरच आहे की नाही, हे तपासणं मेंदूला अधिक सक्षम बनवतं. ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोजचा किंवा चित्रांचा उपयोग मानसोपचारांमध्ये केलेला असतो. माणसाचं मन समजून घेण्यासाठी आजवर अनेक प्रयोग शास्त्रज्ञांनी केले आहेत. ऑप्टिकल इल्युजनचा वापरही त्या दृष्टीनं केला जातो. या चित्रांमधली नेमकी कोणती गोष्ट आधी दिसली, कोणकोणत्या गोष्टींचं निरीक्षण मेंदूनं केलं, कोडं सोडवायला किती वेळ लागला अशा निरीक्षणांमधून एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व उलगडता येऊ शकतं.

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle