मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Optical Illusion : जंगलात लपलंय अस्वल! कोणी हुशारच शोधू शकेल, हातात फक्त आठ सेकंदाचा वेळ

Optical Illusion : जंगलात लपलंय अस्वल! कोणी हुशारच शोधू शकेल, हातात फक्त आठ सेकंदाचा वेळ

optical illusion

optical illusion

ज्यांनी अगदी बारकाईने हा फोटो पाहिला असेल, त्यांना अस्वल सापडलंच असेल; मात्र ज्यांना ते सापडलं नाहीये, त्यांच्यासाठी एक हिंट आहे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 27 जानेवारी :    सोशल मीडियावर जवळपास दररोज दृष्टिभ्रम अर्थात ऑप्टिकल इल्युजनची चित्रं किंवा फोटोज व्हायरल होत असतात. अशा प्रकारची दृष्टिभ्रम घडवणारी चित्रं किंवा छायाचित्रं मेंदूला उत्तम व्यायाम देतात, असं म्हटलं जातं. इंटरनेटवर अशा किती तरी चित्रांच्या माध्यमातून दर आठवड्याला वाचकांना आव्हानं दिली जातात. आताही असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो एका जंगलाचा असून, त्यात लपलेलं अस्वल शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

    या वेळी जे ऑप्टिकल इल्युजनचं छायाचित्र व्हायरल झालं आहे, ते दिसायला खूप सोपं दिसतंय; मात्र पाहणाऱ्याला गोंधळात टाकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी त्यात आहेत. या छायाचित्रात जंगलाचं एक सुंदर दृश्य दिसत आहे. त्यात असं आव्हान देण्यात आलं आहे, की त्यातून एक अस्वल शोधून काढायचं आहे. त्यातही या अस्वलाला शोधण्यासाठी अवघ्या 8 सेकंदांचा अवधी देण्यात आला आहे. अर्थात, चाणाक्ष नजर असलेल्यांनाच हे कोडं सोडवता येईल, हे यावरून स्पष्ट होतं.

    हेही वाचा -  Pregnancy tips : अशा पद्धतीने करा प्रेग्नन्सी प्लॅनिंग; नैसर्गिक गर्भधारणेत अडचणी येणार नाहीत

    काही प्राणी माणसांच्या सान्निध्यात राहतात. काही प्राणी जंगलात राहतात. जंगलात राहणारे प्राणी नैसर्गिक अधिवासात असल्याने खूप सुंदर असतात. त्यातलाच एक प्राणी म्हणजे छानशी फर असलेलं अस्वल. हे जे छायाचित्र व्हायरल झालं आहे, त्यात असंच एक सुंदर अस्वल लपलेलं आहे. आता वरकरणी असं वाटू शकतं, की त्यात काय एवढं कठीण आहे? अस्वल कुठे तरी झोपलेलं असेल किंवा जमिनीवर चालत असेल! त्याला सहज शोधता येईल, असं वाटत असेल, तर तो भ्रम आहे. कारण प्रत्यक्षात छायाचित्रात अस्वल सहजासहजी कुठेही दिसत नाहीये. अत्यंत चाणाक्ष नजर आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असेल, तरच 8 सेकंदांत या सुंदर प्राण्याला शोधता येऊ शकेल.

    ज्यांनी अगदी बारकाईने हा फोटो पाहिला असेल, त्यांना अस्वल सापडलंच असेल; मात्र ज्यांना ते सापडलं नाहीये, त्यांच्यासाठी एक हिंट आहे. अस्वलाला केवळ जमिनीवरच शोधू नये. ते झाडांवरही असू शकतं, असा विचार करूनही शोधून पाहा.

    आठ सेकंदांत तुम्ही फोटोतलं अस्वल शोधून काढलं असेल, तर तुम्ही नक्कीच जीनियस आहात; मात्र तुम्ही शोधू शकला नसलात, तर सोबत दिलेल्या फोटोत पाहू शकता. बसला का धक्का! तुमच्या पुढच्या क्विझसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक.

    First published:

    Tags: Lifestyle, Social media, Video viral