• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • लाखो रुपये कमावणारी बोल्ड मॉडेल आहे सिंगल, हवाय परफेक्ट लाइफ पार्टनर; काय आहेत अपेक्षा पाहा

लाखो रुपये कमावणारी बोल्ड मॉडेल आहे सिंगल, हवाय परफेक्ट लाइफ पार्टनर; काय आहेत अपेक्षा पाहा

या बोल्ड मॉडेलला आतापर्यंत खरं प्रेम मिळालेलं नाही.

  • Share this:
मुंबई, 05 ऑगस्ट : जगातील प्रत्येक माणसाला त्याच्या मनासारख्या गोष्टी मिळतातच असं नाही. एखाद्याकडं भरपूर पैसा असेल म्हणजे तो वैयक्तिक जीवनात सुखी असतोच असं नाही. दुसरीकडे मनाला त्रास होणारं आयुष्यात काही नसतं पण पैशांची चणचण जाणवत राहते. एका मॉडेलची (Model) कहाणी काहीशी अशीच आहे. ही मॉडेल लाखो रुपये कमवते, परंतु तिला जीवनात आतापर्यंत खरं प्रेम (Boyfriend) मिळालेलं नाही. लाखो रुपये कमावणारी ही मॉडेल एका परफेक्ट लाइफ पार्टनरच्या (Life partner) शोधात आहे. 27 वर्षीय अमेंडा सोमर (Amanda Sommer) तिचे बोल्ड फोटोज (Bold Photos) ऑनलाइन विक्री करून त्यातून लाखो रुपये कमवते. खरंतर हे ऐकायला खूप मनोरंजक आणि सोपं वाटतं. परंतू हा जॉब (Job) अमेंडासाठी अडचणीचा ठरत आहे. या जॉबमुळे तिला भरपूर पैसे मिळत असले तरी एकटेपणाचा सामना करावा लागत आहे. तिचा जॉब तिच्या खासगी आयुष्यात अडसर ठरत आहे. या जॉबमुळे तिला अनेक पुरुषांनी नकार दिला आहे. हे वाचा - Shocking! रात्री अज्ञातासोबत तरुणीने केलं असं काही, काही क्षणातच पुतळा बनली अमेंडा सोमर ही रायन एअरमध्ये (Ryan Air) एअर होस्टेस (Air Hostess) म्हणून नोकरी करत होती. मागील वर्षी तिने एअर होस्टेसची कंटाळवाणी नोकरी सोडून पूर्णवेळ ओन्ली फॅन्स मॉडेलचं (Only Fans Model) काम सुरू केलं. या अॅडल्ट साइटवर (Adult Site) आपले सेक्सी, न्यूड फोटो टाकून अमेंडा महिन्याला 15,000 पाऊंड कमवते. एवढा पैसा कमवूनही ती खासगी जीवनात (Personal Life) आनंदी नाही. ती सध्या प्रेमाच्या शोधात असून तिला अद्यापही खरं प्रेम गवसलेलं नाही. जेव्हा एखाद्या पुरुषाला माझ्या जॉबविषयीची माहिती कळते, तेव्हा तो लगेच माझ्याशी संबंध तोडून टाकतो असं अमेंडानं सांगितलं. रिलेशनशिपमध्ये असताना माझ्या जोडीदाराला माझं ओन्ली फॅन्सवर अन्य पुरुषांशी संवाद साधणं आवडलं नाही. मी अनेक वेळा खोटं बोलले, परंतु जेव्हा खरी स्थिती समोर आली तेव्हा नात्यातील पुरुषांना हे सारं आवडलं नाही आणि ते माझ्यापासून दुरावले, असं तिने सांगितलं. हे वाचा - फ्लाइट कॅन्सल होताच महिलेने केला असा टाइमपास; मिळाले तब्बल 7 कोटी द सनच्या रिपोर्टनुसार अमेंडा म्हणते, "मला असं वाटतं की पुरुषांनी थोडं ओपन माईंडेड म्हणजेच खुल्या मनोवृत्तीचं असावं. मी आतापर्यंत खूप पैसा कमवला. पण आता मला अशा एका व्यक्तीची गरज आहे की जो माझ्यावर प्रेम करेल"
First published: